figs and its benefits  esakal
health-fitness-wellness

अंजीर खा, वजन कमी करा

कच्चा आणि वाळलेला अंजीर आरोग्यासाठी फायदेशीर आहे

सकाळ डिजिटल टीम

मॅक्रो आणि मायक्रोन्युट्रिएंट्सचा समावेश असल्याने चयापचय वाढवण्यास, तुमची क्षमता वाढविण्यास तसेच किलोत वजन कमी अंजीर खाल्ल्याने मदत होऊ शकते.

तुम्ही वजन कमी करण्यासाठी योग्य डाएट प्लॅन आखलाय का? असे डाएट करताना शक्यतो आरोग्यदायी आणि पौष्टीक ( Nutritious Food) पदार्थ खाण्याचा विचार करणे गरजेचे आहे. त्यासाठी काही आहारतज्ज्ञ अंजीर (Fig) खाण्याचा सल्ला देतात. मॅक्रो आणि मायक्रोन्युट्रिएंट्सचा समावेश असल्याने चयापचय वाढवण्यास, तुमची क्षमता वाढविण्यास तसेच किलोत वजन कमी अंजीर खाल्ल्याने मदत होऊ शकते. कच्चा आणि वाळलेला अंजीर तुम्हाला आरोग्यासाठी फायदेशीर असून तो वजन कमी करण्यास अशाप्रकारे मदत करू शकतो.

Weight

असा होईल फायदा (Help For Weight Loss )

तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तेव्हा तुमची भूक कमी करणे गरजेचे आहे. अशावेळी तुम्ही जेवणादरम्यान ताजे किंवा वाळलेले अंजीर घेऊ शकता. फायबर आणि प्रथिनांनी भरलेले अंजीर खाल्ल्याने तुमचे पोट भरलेले राहते. तसेच अनहेल्दी पदार्थ खाण्यापासून तुम्ही दूर राहता. जर तुम्ही सुके अंजीर खात असाल तर ते आधी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. असे केल्याने ते लवकर पचू शकतात. तसेच पोषक तत्वही मूबलक प्रमाणात मिळतात. महत्वाचे म्हणजे अंजीरमध्ये कॅलरीज कमी असतात. त्यामुळे कॅलरीज वाढत नसल्याने साहजिकच वजनही फारसे वाढत नाही.

Health

स्टॅमिना वाढतो (Increase Stamina)

अंजीरात कॅल्शियम, लोह आणि पॉटेशियम मुबलक प्रमाणात असल्याने तो खाऊन तुमचा स्टॅमिना वाढतो. थोडेसे काम केल्याने ज्यांना थकवा जाणवतो त्यांनी तर शक्ती वाढण्यासाठी अंजीर नक्कीच खावा. सकाळी एक ग्लास दुधाबरोबर अंजीर नियमित खाल्ल्यास तुमच्या स्टॅमिनात वाढ होऊन तुम्हाला उर्जा मिळते. एका ग्लास दुधात फक्त एक अंजीर उकळून प्यायल्याने फायदा होईल.

dry anjeer

दिवसाला किती अंजीर खावेत ?(How many figs you must eat in a day)

कच्चे अंजीर खायचा विचार करत असाल तर तुम्ही दिवसाला २-३ अंजीर सहज खाऊ शकता. वाळलेले अंजीर खायचा विचार असेल तर तीन अंजीर पुरेसे आहेत. मात्र ते रात्रभर भिजवून ठेवा. त्यामुळे पोषक द्रव्ये आणखी मिळतील. मात्र, ज्या लोकांना मधुमेह , रक्ताशी संबंधित समस्या, यकृत आणि पचनाशी संबंधित समस्या आहेत त्यांनी अंजीर खाताना काळजी घेणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Election Results : 'जयकुमार तुमचा तो शब्द अखेर खरा ठरला'; आमदार गोरेंचं कौतुक करत असं का म्हणाले फडणवीस?

Latest Marathi News Updates : मिलिंद नार्वेकर वर्षा बंगल्यावर गेलेच नाहीत, राजकीय चर्चा खोट्या

Chhagan Bhujbal : घड्याळाच्या टिकटिकने तरले भुजबळ..! येवला, लासलगाव, विंचूरसह प्रमुख गावाच्या मताधिक्क्याने विजय सोपा

ST Mahamandal : एसटी महामंडळाला दिवाळीत मिळाले २० कोटींचे उत्पन्न

Eknath Shinde Resignation: CM एकनाथ शिंदे यांचा राजीनामा , बनणार काळजीवाहू मुख्यमंत्री, कोणते अधिकार कमी होणार ?

SCROLL FOR NEXT