Yoga 
health-fitness-wellness

योग ‘ऊर्जा’ : व्हेरिकोज व्हेन्स

देवयानी एम., योग प्रशिक्षक

पुणे आपल्या हृदयापासून रक्तपुरवठा करतात त्या रक्तवाहिन्या 'arteries' शुद्ध रक्त शरीरभर पोचवतात व 'veins'  अशुद्ध रक्त पुन्हा हृदयाकडे आणतात. पायाकडून येणाऱ्या अशुद्ध रक्त वाहिन्या (veins) उलट्या दिशेने म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध प्रवास करतात. हे करता यावे, यासाठी निसर्गाने आपल्या व्हेन्समध्ये, म्हणजे वाहिन्यांमध्ये झडपांचे प्रयोजन केले आहे. ज्याने रक्त खाली न जाता वरच्या दिशेने, म्हणजे हृदयाकडे पोचण्यास मदत होते. या झडपांमध्ये दोष निर्माण झाल्यास किंवा त्या कमकुवत झाल्यास ‘व्हेरिकोज व्हेन्स’ दिसू लागतात. ‘व्हेरिकोज व्हेन्स’ म्हणजे अशुद्ध रक्तवाहिन्या फुगून नसांमध्ये सूज व गाठी तयार होणे. त्वचेखाली या शिरा निळ्या-जांभळ्या रंगाच्या वेटोळ्यांसारख्या दिसू लागतात. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सहसा ह्या पोटऱ्यांवर, गुडघ्यामागे व मांडीच्या मागील बाजूस दिसतात. शिरांची लवचिकता कमी होऊन रक्तप्रवाह खंडित होतो. हळूहळू पायांची मागची बाजू विद्रूप दिसू लागते.

कारणे

  • वय - वय वाढेल तसे रक्तवाहिन्या लवचिकता गमावू लागतात व व्हॉल्व कमकुवत होऊ लागतात.
  • गर्भावस्था - गरोदरपणात पोटातील वाढत्या गर्भामुळे काही काळ रक्तवाहिन्या दाबल्या जातात. परंतु, त्या डिलिव्हरीनंतर पूर्ववत होतात; खासकरून व्यायाम व योगासने यांचा सराव नियमित करत असल्यास.
  • स्थूलत्व - शरीराचे अति वजन असणे रक्तवाहिन्यांवर दाब निर्माण करते.
  • दीर्घकाळ उभे राहणे - खूप काळ उभे राहण्याचे काम असल्यास रक्तप्रवाह व्यवस्थित होत नाही आणि नसांची व्हेरिकॉसिटी तयार होते.

लक्षणे

  • पाय जड होणे, दुखणे, थकणे.
  • घोटा, तळपाय, पोटऱ्यांवर सूज येणे.
  • पायाचा मागचा भाग 
  • निळा-जांभळा दिसू लागणे.
  • पायाला मुंग्या येणे, खाज सुटणे, त्वचा कोरडी पडणे.
  • पायाच्या मागील भागात वेड्यावाकड्या शिरा दिसू लागणे.
  • सुजलेल्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी तयार होणे.

नैसर्गिक उपचार

  • रक्तप्रवाह सुधारण्यासाठी नियमित व्यायाम, चालणे व स्ट्रेचिंग करावे.
  • वजन नियंत्रणात ठेवावे.
  • शक्‍यतो उंच टाचेचे शूज वापरू नयेत, फ्लॅट शूज वापरावेत.
  • नियमित सूर्यनमस्कार करावेत.
  • पायाला स्ट्रेच मिळेल अशी आसने करावीत. उदा. पश्चिमोत्तानासन, ताडासन, अधोमुखश्वानासन (टाच टेकवून), पादहस्तासन, पाठीवर झोपून सायकलिंग, गोमुखासन, पादांगुष्ठासन, वज्रासन इ.
  • गुरुत्वाकर्षणाविरुद्ध रक्तप्रवाह होण्यासाठी अर्धहलासन, विपरीत करणी, सर्वांगासन, शीर्षासन अशी आसने प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शिकून करावीत.
  • धूम्रपान टाळावे, 
  • शाकाहारी आहार असावा.
  • झोपण्यापूर्वी थोडा वेळ पायाखाली जाड उशी किंवा भिंतीवर पाय टेकवून पडावे.
  • दीर्घकाळ उभे राहणे टाळावे.
  • गरोदरपणात थोडा वेळ एका अंगावर पडावे व पाठीवर पडून उंच उशीवर पाय ठेवावेत.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: सोनं झालं 5,000 रुपयांनी स्वस्त; अवघ्या 15 दिवसांत सोन्याच्या भावात मोठी घसरण, आज काय आहे भाव?

Dehradun Accident: देहराडूनमध्ये भीषण अपघात, सहा तरुणांचा मृत्यू; काय आहे इनसाईड स्टोरी? पोलिसांकडे अद्याप तक्रार नाही

IND vs AUS: विराट कोहली जखमी? काल अचानक स्टार फलंदाज ऑस्ट्रेलियातील हॉस्पिटलमध्ये गेला अन्...

Latest Maharashtra News Updates : 'कटेंगे तो बटेंगे' हा देशाचा इतिहास- देवेंद्र फडणवीस

Sanjay Raut : भाजप एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीच काय विरोधी पक्ष नेता पण करणार नाही , संजय राऊत यांचा खोचक टोला

SCROLL FOR NEXT