भारतात डाळी, भाज्या, फळे, कडधान्ये यांचा अतिशय उत्तम असा पोषण खजिना उपलब्ध आहे. या घटकांमुळे होणाऱ्या आरोग्यविषयक फायद्यांमुळे आणि फास्ट फूडचे अतिमार्केटिंग झाल्यामुळे भारतीय पदार्थांमधला त्यांचा वापर कमी होत चालला आहे. आधीच्या आठवड्यांत आपण अळू आणि कवठ यांची माहिती घेतली. आता आज शेवग्याची माहिती घेऊ.
- शेवग्याला ‘वंडर ट्री’ असंही म्हटलं जातं आणि ते योग्यही आहे. शेवग्याला ‘पॉवरहाउस’ म्हणतात. कारण, त्याचा प्रत्येक भाग हा आहारात विशिष्ट पद्धतीने समाविष्ट करता येऊ शकतो.
- शेवग्याच्या शेंगा किंवा मोरिंगा हे ‘सुपर फूड’ म्हणून गृहीत धरले जाते!
- शेवग्याच्या शेंगांचे फायदे खूप असल्याने त्या कोणत्या ना कोणत्या मार्गाने पोटात जाणे आवश्यक आहे.
- शेवगा हे अतिशय दुर्मीळ ज्याच्या बिया, फुलं, पाला आणि खोड या सगळ्या गोष्टींमध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणावर असतात.
- शेवग्यामध्ये नियासिन, रायबोफ्लॅविन आणि व्हिटॅमिन ‘बी १२’सारखे व्हिटॅमिन ‘बी’ घटक भरपूर प्रमाणात असतात; जे तुमच्या पचनसंस्थेचे आरोग्य वाढविण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात.
- त्यांच्यात अँटिइन्फ्लेमेटरी म्हणजे सूज कमी करण्याचे गुणधर्म असतात आणि तसेच व्हिटॅमिन ‘सी’ भरपूर असते. त्यामुळे एकूण प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी शेवगा उपयुक्त.
- शेवग्यामध्ये कॅल्शिअम आणि लोह भरपूर प्रमाणात असते.
हेल्दी रेसिपी
शेवग्यामध्ये असलेले व्हिटॅमिन ‘बी’, व्हिटॅमिन ‘ए’, फॉलिक ॲसिड आणि इतर पोषक घटक त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात.
- शेवग्याच्या शेंगांमधील कॅल्शिअम आणि लोह हाडे सशक्त आणि आरोग्यपूर्ण होण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
- शेवगा प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मदतशील ठरतो.
- शेवग्याचा पाला आणि शेंगा या गोष्टी मधुमेहींसाठी वरदान असते. कारण, त्यामुळे रक्तातली वाढलेली साखरेची पातळी लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते.
- चांगल्या हाडांसाठी शेवगा खूप चांगला आहे.
- आरोग्यपूर्ण त्वचा आणि केस यांच्यासाठी शेवगा मदत करतो.
शेवग्याच्या फुलांचे रायते : शेवग्याची फुले मिठाच्या पाण्यात उकळून घ्या. ती फुले गाळून घ्या आणि गार करा. बीट, योगर्ट, मीठ आणि रोस्टेड जिरा पावडर त्यात घाला. बास, झाले तुमचे रायते तयार!
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.