Corona Patient Sakal
health-fitness-wellness

आणखी एक फंगसचा प्रकार; कोविड रुग्णांवर Aspergillosis चं सावट

श्वसनमार्गातून अ‍ॅस्परगिलसचे विषाणू शरीरात प्रवेश करतात.

शर्वरी जोशी

कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत अनेक नवे आजार उदयाला आले आहेत. प्रथम म्युकोरमायकोसिस म्हणजेच ब्लॅक फंगस. त्याच्यानंतर व्हाइट आणि यल्लो फंगस हे आजार दिसून आले. विशेष म्हणजे या आजारांमध्ये भर म्हणून आता अ‍ॅस्परगिलोसिस (aspergillosis) या नव्या आजाराने डोकं वर काढलं आहे. पल्मोनरी अ‍ॅस्परगिलोसिस इंफेक्शन (Pulmonary aspergillosis infection) या नव्या आजाराचे काही रुग्ण आढळून आले असून हा दुर्मिळ आजार असल्याचं म्हटलं जात आहे. (aspergillosis-is-new-infection-in-covid-19-patients)

बडोदामधील एसएसजी रुग्णालयामध्ये अ‍ॅस्परगिलोसिस या नव्या आजाराचे ८ रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे म्युकोरमायकोसिसप्रमाणेच ज्या रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, त्या रुग्णांमध्ये या नव्या आजाराची लक्षण आढळून येत आहेत.

पल्मोनरी अ‍ॅस्परगिलोसिस इंफेक्शन म्हणजे नेमकं काय?

Center for Disease Control and Prevention नुसार, अ‍ॅस्परगिलोसिस (Aspergillosis) हा अ‍ॅस्परगिलसमुळे (Aspergillus) होणारा आजार आहे. जो एक सामान्य मोल्ड इंफेक्शन आहे. या आजारात खासकरुन रुग्णाच्या श्वसनयंत्रणेवर परिणाम होतो. हा विषाणू हवेत तरंगत असल्यामुळे घरात किंवा घराबाहेरही त्याचं संक्रमण लगेच होऊ शकतं. आपल्या श्वसनमार्गातून अ‍ॅस्परगिलसचे विषाणू शरीरात प्रवेश करतात. या विषाणूमुळे व्यक्ती पटकन आजारी पडत नसला तरीदेखील त्याच्या रोगप्रतिकारकशक्तीवर विपरीत परिणाम होतो. या विषाणूमुळे गॅस्टरोइंटेस्टाइनल ट्रॅक्टवरही परिणाम होतो.

या संसर्गाचा सर्वाधिक धोका कोणाला?

हेल्थ एक्सपर्टनुसार, ज्या रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना हा आजार लवकर होऊ शकतो. उपचारादरम्यान स्टेरॉइडचा अतिरिक्त वापर, रुग्णाची कमकुवत रोगप्रतिकारकशक्ती, ऑक्सिजनची पातळी खालावणे अशा रुग्णांना या आजाराची लागण लवकर होऊ शकते.

अ‍ॅस्परगिलोसिसची लक्षणे

छातीत दुखणे

खोकतांना रक्त पडणे

ताप

सर्दी

श्वासन घेतांना त्रास होणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: नवं गृहनिर्माण धोरण अन् मुलांना मोफत शिक्षण... शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा वचननामा जाहीर

Shreyas Iyer चे द्विशतक! BCCI अन् KKR ला करारा जवाब; सिद्धेश लाडसोबत विक्रमी ३०० धावांची भागीदारी

कमी वयातच दूरदृष्टी कमी झाली असेल डोळ्याची; तर चष्माच नंबर घालवण्यासाठी करा ह्या फळांचा सेवन

Chitra Wagh : महायुती पुन्हा सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना दरमहा 'इतके' रुपये देणार; चित्रा वाघ यांची मोठी घोषणा

लाडक्या मालिकेतील अभिनेत्रीबरोबर काम करणार अशोक मामा ; या स्टारकिडचीही लागली वर्णी

SCROLL FOR NEXT