pune sakal
health-fitness-wellness

चार महिने गर्भधारणा टाळावी

‘झिका’च्या पार्श्वभूमीवर बेलसरमध्ये प्रशासनाचा सल्ला

सकाळ वृत्तसेवा

खळद : झिकाचा संसर्ग झाल्यावर त्यापासून जास्त धोका हा गरोदर महिलेला व नवजात बाळाला होण्याची शक्यता वैद्यकीय विभागाच्या वतीने व्यक्त केल्यानंतर बेलसर (ता. पुरंदर) येथे किमान चार महिने महिलांनी गर्भधारणा टाळण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून, प्रशासनाकडून देण्यात आला आहे. बेलसर येथे राज्यातील पहिला झिका पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने राज्य व केंद्र सरकारने त्याची गंभीर दखल घेत वेगवेगळ्या वैद्यकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी येथे येऊन भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच हा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला व त्याला यशही आले आहे.

याबाबत तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, झिकाचा संसर्ग हा दूषित एडीस डास चावल्याने होतो. रक्ताच्या देवाण घेवाणीतून अथवा स्रीपुरूष संबंधातून झिकाचा संसर्ग होतो. झिकाचा संसर्ग झाल्यावर काही वेळा काही लक्षणे दिसत नाहीत. मात्र, पुरुषांच्या वीर्यात साधारणत: चार महिने झिकाचा विषाणू जिवंत राहू शकतो. त्यामुळे अशा पुरुषापासून झालेली गर्भधारणा झिका संसर्गग्रस्त असू शकते. यामुळे किमान तीन महिने गर्भधारणा टाळावी. पुरुषांनी शक्यतो संभोग टाळावा किंवा सुरक्षित संभोग करावा, असे वैद्यकीय विभागाचे म्हणणे आहे. यासाठी येथील आरोग्य विभागाकडून गर्भधारणा टाळण्यासाठी आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.

केंद्र सरकार व राज्य सरकारकडून मिळालेल्या सूचनेनुसार, येथे ग्रामपंचायत व बेलसर प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्यावतीने डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करण्यात आली. तर गावात जनजागृतीसाठी भोंगा गाडीचा वापर करून दारोदारी खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. गावात सर्वठिकाणी फवारणी केली, गावातल्या २४ गरोदर महिलांना मच्छरदाणी आणि डास प्रतिबंधक मलम देण्यात आला आहे. या महिलांचे रक्ताचे नमुने तपासले असल्याचे उपसरपंच धीरज जगताप यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT