नागपूर : अनेक नैसर्गिक पानांपासून निघालेल्या तेलाने सुंदरता वाढण्यासोबतच आरोग्यासाठी देखील लाभदायक असतात. कोणत्याही तेलाचा वापर योग्य प्रमाणात केला तर त्याने छोटे-मोठे आजार दूर होण्यास मदत होते. यामध्ये लेमन ऑईल, कैमोमाइल ऑईल आदी तेलांचा समावेश होतो. यामुळे सूजन देखील दूर होते तसेच केसगळतीची समस्या देखील दूर होण्यास मदत होते. याप्रमाणेच उपयोगी तेल आहे, ते निलगिरीचे. त्याचे फायदे पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.
सूजन आणि दुखणे कमी करण्यासाठी उपयोगी -
आजकाल बदलती जीवनशैली आणि वर्क कल्चरनुसार सजून आणि दुखण्याच्या समस्या अनेकांना असतात. त्यासाठी निलगिरीचे तेल उपयोगी ठरते. यामध्ये अँटी-इफ्लांमेटर गुण असतात. त्यामुळे सूजलेल्या भागावर लावल्यास सूजन लगेच कमी होण्यास मदत होते.
माऊथवॉश -
निलगिरीच्या तेलाने तुम्ही माउथवॉश देखील करू शकता. दात आणि हिरड्यांच्या समस्यांसाठी निलगिरीचे तेल रामबाण उपाय आहे. यामध्ये असलेल्या अँटी-ऑक्सिडंट्सच्या गुणामुळे जिवाणूचे संक्रमण होत नाही.
सर्दी-तापासाठी -
बदलत्या वातावरणानुसार, सर्दी-ताप होत असतो. तुम्हीही सर्दी-तापापासून त्रस्त असाल तर या तेलाचा वापर करा. यामध्ये असलेल्या अँटी-इंफ्लामेटरी गुणांमुळे सर्दी-तापाची समस्या दूर होईल. कोमट पाण्यामध्ये दोन थेंब निलगिरीचे तेल घाला आणि त्याने गरारे करा.
हेही वाचा - घनदाट जंगलात अजूनही उभा आहे अष्टकोनी वाडा, २०० एकर जमीनदारी असलेला परिवार एका रात्रीत...
पिंपल्स दूर करण्यास मदत -
निलगिरीचे तेल फक्त पिंपल्स दूर करतात, असे नाही. त्वचेवरील प्रत्येक समस्येवर ते रामबाण उपाय आहे. पिंपल्समुळे तयार झालेली जखमी देखील निलगिरीच्या तेलामुळे लवकर भरण्यास मदत होते. तसेच बॅक्टेरिया, फंगस यापासून झालेला संसर्ग देखील थांबविता येतो.
(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.