Chia Seeds For Weight Loss : सततच बैठी काम आणि अनियमित शेड्यूल मुळे अनेकांची पोट सुटली आहेत, त्यात अनेक महिलांना PCOD चा त्रास असतो त्यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढत असतं. वजन कमी करण्यासाठी चिया सीड्स खूप मदत काम करते. ते तुमच्या पोटाची हालचाल तर वाढवतातच, पण ते तुमच्या शरीरात अडकलेल्या फॅट्सच्या कणांना सुद्धा बाहेर काढण्यात आणि ते पचवण्यात मदत करतात.
चिया सीड्सची विशेष गोष्ट म्हणजे त्या पोट साफ करण्यास मदत करतात. याशिवाय या सीड्सचे सेवन केल्याने तुमची भूक आणि हार्मोनल आरोग्य संतुलित राहण्यास मदत होते. चला तर मग, वजन कमी करण्यासाठी चिया सीड्स kखाण्याचा सर्वात प्रभावी मार्ग जाणून घेऊया.
वजन कमी करण्यासाठी चिया सिड्स कसे खावे? (How to use chia seeds to reduce belly fat)
अॅपल सायडर व्हिनेगर चिया सीड्ससोबत घेण्याची पद्धत वजन कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी ठरु शकते. तुम्हाला फक्त अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये चिया सिड्स भिजवा. नंतर अर्ध्या तासानंतर ते पाणी मिसळून प्या.
चिया सीड्स आणि ऍपल सायडर व्हिनेगर वजन कमी करण्यासाठी (Apple Cider Vinegar With Chia Seeds Benefits)
1. तुमची भूक नियंत्रित करते
वजन कमी करण्यासाठी, चिया सीड्स आणि अॅपल सायडर व्हिनेगर दोन्ही भूक नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त आहेत. चिया सिड्समध्ये प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात जे पोट भरण्यास मदत करतात. तसेच, हे हार्मोनल हेल्थ जपत फॅट्सला कंट्रोल करण्यास मदत करते.
2. फॅट्स बर्न करते
जेव्हा तुम्ही अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये मिसळलेल्या चिया सिड्सचे सेवन करता तेव्हा ते वजन कमी करण्यास गती देते. याने आपली पचनशक्ती वाढवायला आणि फॅट्स बर्न करायला मदत करते. अॅपल सायडर व्हिनेगर तुमच्या फॅट्स बर्न करायला गती देते.
3. शरीर डिटॉक्स करतात
जेव्हा तुम्ही अॅपल सायडर व्हिनेगरसोबत चिया सीड्स घेता तेव्हा ते तुमच्या शरीराला आतून डिटॉक्स करण्यास मदत करते. हे रौगेजसारखे कार्य करते आणि आतड्याची हालचाल वेगवान करून पोट डिटॉक्स करते. अशाप्रकारे, दोन्ही एकत्रितपणे चरबी कमी करण्यास मदत करू शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.