लोकांना नेहमीच चिरतारूण्य राहायला आवडते. वाढत्या वयासोबत चेहऱ्यावरील आकर्षण कमी होण्यास सुरुवात होते. तुम्ही सुरवातीपासूनच आहारात फळांचा समावेश केला असेल तर तुमचे वय जादा आहे असे लवकर लक्षात येत नाही. मात्र, अजूनही जर योग्य फूड खाण्य़ास सुरुवात केली नसेल तर तुम्ही अॅटी एजिंग फूड्सचा तुमच्या डायटमध्ये समावेश करू शकता. नियमित हे फूड्स खाल्याने तुमच्या चेहऱ्यावरील सुरुकुत्या कमी होतील. आणि तुम्ही चिरतरूण दिसाल. चला तर आहारात नेमका कशाचा समावेश करायचा हे जाणून घेऊया.
Anti Aging Foods: चिरतारूण्य आणि चमकदार त्वचेसाठी एंटी-एजिंग फूड्स गरजेचे असतात. यात बायोटीन, अॅलेजिक अॅसिड, व्हिटामिन सी, व्हिटामिन ई भरपूर प्रमाणात असतात. जे चेहरा ग्लोइंग करण्यासाठी फायद्याचे ठरतात.
अंडी (Egg For Skin)
अंडी फक्त मसल्सच मजबूत करत नाहीत तर त्वचेला तारूण्य ठेवण्यास मदत करतात. पिवळ्या बलकासह अंडी खाल्याने शरीरात प्रोटीनसह बायोटीनही मिळते. याचा फायदा केस आणि नखांना होतो.
डार्क चॉकलेट (Dark Chocolate)
डार्क चॉकलेटमध्ये भरपूर प्रमाणात अॅंटीआॅक्सिडेंट असतात. जे त्वचेला डॅमेज करण्यापासून वाचवतात. डार्क चॉकलेट खाल्याने रक्ताभिसरण चांगले होते असे संशोधनात समोर आले आहे.
गाजर :Best Anti Aging Foods
गाजरात बीटा-कॅरोटीनचे गुणधर्म असतात. जे स्किन ग्लोइंग करते. शिवाय सूर्याच्या हानिकारक किरणांपासून बचाव करतात. एंटी-एजिंग डाइटमध्ये गाजराचा समावेश करा.
शकरकंद
गाजरासारखे हे फळ असते. यात बीटा-कॅरोटीन हा घटक असतो. जो चेहऱ्याला ग्लोइंग करण्यासाठी महत्वाचे फळ आहे. याला तुम्ही उकडून थोडं मिठ टाकून खाऊ शकता.
शिमला मिर्ची
शिमला मिर्चीत व्हिटामिन सी असते. जे चेहऱ्यांवरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करते. शिमला मिर्ची ही बऱ्याचजणांना खायला नाही आवडत. पण खाण्यात याचा वापर केलात तर नक्कीच फरक जाणवेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.