भारतात पान मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. लग्नात पान खाणे अनेक ठिकाणी शुभ मानले जाते. तसेच भारतीय संस्कृतीत (Sanskruti) पूजेदरम्यान विड्याचे पान शुभ मानले जाते. अनेक ठिकाणी रात्री पान आवर्जून खाल्ले जाते. आरोग्याच्या (Health) दृष्टीनेही विड्याच्या पानाचे महत्व मोठे आहे. पुरूषांना विड्याचे पान खाल्ल्याने काही फायदे होतात.
पचनक्रिया सुधारते- जेवल्यानंतर पान खाल्ल्याने तुमची पचनक्रिया चांगली राहते. शरीराला अन्न पचण्यास मदत होते. तसेच पोटदुखी, गॅस आणि छातीत जळजळ या समस्या कमी होतात. यामुळेच देशातील अनेक भागांत जेवणानंतर पान खाल्ले जाते.
पुरूषांमधील ताकद वाढते- पानामुळे पुरूषांमधील लैंगिक शक्ती वाढते. पानामध्ये मधुमेह-विरोधी, दाहक-विरोधी, संसर्ग-विरोधी, अँटी-सेप्टिक आणि दुर्गंधीनाशक गुणधर्म असतात. पान खाल्ल्याने टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळीही वाढते. त्यामुळे पुरुषांची लैंगिक शक्ती खूप वाढते. यामुळेच विवाहित पुरुषांना रात्री झोपण्यापूर्वी पान खाण्याचा सल्ला दिला जातो.
जखम लवकर भरते- पानाचा उपयोग जखमा लवकर भरून येण्यासाठी केला जाऊ शकतो. पानात अँटिऑक्सिडंट घटक असल्यामुळे जखम लवकर भरून येण्यास मदत होते. दुखापत झाल्यास पानाचा रस काढून जखमेवर लावावा आणि पान जखमेवर बांधून ठेवावे. काही वेळाने जखम बरी होण्यास सुरुवात होईल.
बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो- बद्धकोष्ठतेचा त्रास होणे आता सामान्य गोष्ट आहे. आपल्या बिघडलेल्या जीवनशैलीमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. तुम्हालाही बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल, तर रात्री जेवणानंतर काही दिवस पान खा. तसेच एक ग्लास पाण्यात पानाचे तुकडे करून ते रात्रभर तसेच ठेवून सकाळी हे पाणी रिकाम्या पोटी प्या. यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.