Kapur Tree Health Benefits esakal
health-fitness-wellness

पूजेसाठी वापरला जाणारा 'कापूर' कशापासून तयार केला जातो? काय आहेत फायदे, झाड का होतंय दुर्मिळ; जाणून घ्या..

मंदिरे, घराघरांत किंवा धार्मिक उत्सवांत आरतीवेळी हमखास कापूर लावला जातो.

मधुकर कांबळे

छत्रपती संभाजीनगर : मंदिरे, घराघरांत किंवा धार्मिक उत्सवांत आरतीवेळी हमखास कापूर लावला जातो. अनेक औषधी गुणधर्म असलेला, प्रदूषण कमी करणारा, नकारात्मकता घालवून सकारात्मक वातावरण तयार करणारा हा कापूर नेमका बनतो कसे, याबाबत अनभिज्ञता असते.

कापूर झाडापासून (Camphor Tree) तयार होतो! अर्थात कापूर देणारे, उपयुक्त झाड नामशेष होत चालले आहे. त्याच्या पुनरुज्जीवनाची गरज आहे. कापूर हा विषाणूरोधक, बुरशीनाशक आहे. हवा शुद्ध करण्याचे गुणधर्म त्यात आहेत. कापूर उघडा ठेवला तरी आपले काम करत राहतो.

आरतीच्या निमित्ताने कापूर लावल्यास त्याचे गुणधर्म अनेक पटीने त्वरित अनुभवास येतात. त्यामुळेच कर्पूर आरती करतात व अशी आरती घेतल्याने मन प्रफुल्लित होते. कापूर देणाऱ्या झाडाविषयी लॉर्डस वनौषधी उद्यान आणि रिसर्च सेंटरचे संचालक डॉ. दत्ता सावंत सांगतात, कापुराचे झाड आंब्याच्या झाडाएवढे मोठे होते.

‘सिनामोमम कॅम्फोरा’ (Cinnamomum Camphora) असे बॉटनिकल नाव असलेले कापूरचे झाड बाराही महिने हिरवेगार असते. ते सभोवतालच्या अर्धा किलोमीटरच्या परिसरातील हवेचे शुद्धीकरण करते. झाडाच्या सर्व भागात तेल असते. आपल्या देशात पूर्वी ही झाडे मोठ्या संख्येने होती. आता ती दुर्मिळ झाली आहेत.

औषधी गुणधर्मयुक्त

  • कापूर हा नैसर्गिक वेदनाशामक आहे. दातदुखीच्या वेदना कमी होतात

  • पुदीना, नागवेलच्या पानावर कापूर ठेवून गरम करून शेकल्यास डोकेदुखी कमी होते

  • श्‍वसनाचे विकार कमी करण्यासाठी लाभदायी

  • फंगल्स इन्फेक्शनवर गुणकारी

  • गुडघेदुखीवर कापूर झाडाची पाने फायदेशीर

  • घसा संसर्गात उपयुक्त

  • कापूरमिश्रित खोबरेल तेल तळपायाला लावल्यास शांत झोप लागते

  • डोक्यातील कोंडा, उवा घालवण्यासाठीही कापूरमिश्रित तेल गुणकारी

  • कापराची पूड पाण्यात टाकून गुळण्या केल्यास मुखदुर्गंधी जाते

  • कापराच्या पानाचा चहा पिल्याने दम्याचा त्रास कमी होतो

  • विड्याच्या पानातून अर्धा ग्रॅम कापूर दिल्यास घाम येऊन ताप कमी होतो

  • दमा विकारात कापूर आणि पावग्रॅम हिंग घेतल्यास आराम वाटतो

  • खोबरेल किंवा तिळाच्या तेलात कापूर विरघळवून तयार झालेले मिश्रण संधिवातावर उपयोगी

  • कापूर- हिंग एकत्र घेतल्यास अतिसार कमी होतो

  • कापुराचे चूर्ण तपकिरीप्रमाणे अल्प प्रमाणात ओढल्यास सर्दी, डोकेदुखी कमी होते

असा तयार होतो कापूर

कापराच्या झाडाच्या डिंकापासून आणि ऊर्ध्वपातनाच्या प्रक्रियेतून कापूर तयार केला जातो. डिंकापासूनचा असतो तो साधा कापूर. ऊर्ध्वपातनाच्या प्रक्रियेतून करण्यात आलेला शुद्ध कापूर असतो. खोड आणि पानांतून मोठ्या प्रमाणात कापूर मिळतो. पाने आणि खोडातील अर्क ऊर्ध्वपातनाने काढून त्याचे क्रिस्टिलायजेशन (स्फटिकीकरण) केले जाते, अशी माहिती डॉ. सावंत यांनी दिली.

घरात सकारात्मक ऊर्जा

नागेश मुर्तीकर गुरुजी म्हणाले, धार्मिक कार्यात कापराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नकारात्मक शक्तींचा नाश करून सकारात्मक शक्ती वाढवून वातावरण शुद्ध करण्याचे काम कापूर करतो. कापूर लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. एका विशिष्ट सुगंधाने वातावरण निरोगी राहण्यास मदत होते. त्यामुळे घरांत कापूरचा वापर केला जातो.

कर्पूरवडी सम मानस माझे निर्मळ राहू दे ।

कर्पूरवडी सम भाव भक्तीचा सुगंध वाहू दे ।।

शुद्ध कापूर कितीही प्रमाणात असला तरी तो लगेचच जळून जातो. त्याप्रमाणे आपल्या अंतःकरणात असलेले अहंकार, काम-क्रोधादी सर्व विकार नष्ट व्हावे व कापूरवडी समान मन निर्मळ व्हावे, कापूरवडीसम भावभक्तीचा सुगंध वाहून ईश्वराची प्राप्ती व्हावी या हेतूने ईश्वरास कापूर ओवाळतात.

शंभर टक्के शुद्ध भिमसेनी कापूर

भीमसेनी कापूर शंभर टक्के शुद्ध असून त्यात सर्वाधिक औषधी गुणधर्म आहेत. आयुर्वेदात त्याचा त्याचा औषधासाठी वापर केला जातो. हा साध्या कापरप्रमाणे लवकर हवेत विरून जात नाही, त्याचा सुगंध बराचवेळ दरवळत राहतो. या कापरामुळे कोणताही जीवजंतू संसर्ग होत नाही. पण तो महाग आहे. साधा कापूर फार चार तास सुगंध देतो, त्यानंतर कापूरवडी हवेत विरते, असे सावंत म्हणाले.

आता विशिष्ट रसायनापासून कापूर तयार केला जात असला तरी भीमसेनी कापूर आणि साधा कापूर झाडापासूनच तयार केला जातो. दोन्ही नैसर्गिकरीत्या तयार केलेले असतात. दोन्हीचे गुणधर्मही सारखेच असतात. त्यातल्या त्यात भीमसेनी कापूर शंभर टक्के शुद्ध असतो. कापराची झाडांचे दर उंचीनुसार आहेत. ३०० रुपयांपासून अडीच हजार रुपयांपर्यंत कापूर झाडांची रोपे वनौषधी उद्यानात उपलब्ध आहेत.

- डॉ. दत्ता सावंत

कापूर जंतू- कृमीनाशक आहे. शुद्ध कापूर अनेक औषधांत वापरला जातो. आयुर्वेदात त्याचे खूप उपयोग आहेत.

- वैद्य परेश देशमुख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “आजही तो कुटुंबासाठी काही बोलत नाही….”; सांगता सभेत अजित पवारांच्या आईचं पत्र दाखवलं वाचून

Sports Bulletin 18th November: गौतम गंभीरला हाय कोर्टाकडून दिलासा ते चेतेश्वर पुजारावर बॉर्डर-गावस्कर मालिकेत नवी जबाबदारी

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Champions Trophy पाकिस्तानमध्येच होणार, मागे हटणार नाही! PCB प्रमुखांचं रोखठोक मत; पाहा Video

Latest Maharashtra News Updates : सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

SCROLL FOR NEXT