Gas Pain in Chest esakal
health-fitness-wellness

गॅसमुळे छातीत दुखत आहे, 'या' 4 गोष्टी खाल्ल्याने मिळेल आराम

सकाळ डिजिटल टीम

पोटात तयार झालेल्या गॅसमुळे पोटात दुखणे तर होतेच, पण त्याचा परिणाम छातीवरही होतो, त्यामुळे छातीत जळजळ आणि वेदना होतात. छातीत गॅसने दुखणे सर्वांनाच होणे गरजेचे नाही आणि ते फारसे सामान्यही नाही, पण जर वेदना होऊ लागल्या तर असे काही घरगुती उपाय आहेत जे खूप उपयुक्त आहेत. गॅस व्यतिरिक्त, ऍसिड रिफ्लक्स असला तरीही छातीत दुखते कारण पोटातून बाहेर पडणारा ऍसिडिक गॅस श्वसनमार्गाद्वारे थेट छातीपर्यंत पोहोचतो. जाणून घेऊया हे उपाय ज्यामुळे छातीत होणाऱ्या दुखण्यापासून सुटका मिळते. (Chest Pain Home Remedies)

गॅसमुळे छातीतील दुखण्यावर घरगुती उपाय

आले (अदरक)

गॅस, अॅसिडिटी, पोटदुखी यांसारख्या समस्यांवर अदरक अद्भुत प्रभाव दाखवते. यातील अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म अनेक समस्या दूर करतात. गॅसमुळे होणाऱ्या छातीत दुखण्यापासून सुटका मिळवण्यासाठीही आल्याचे सेवन केले जाऊ शकते. यासाठी तुम्ही आले उकळून हे पाणी गरम करून पिऊ शकता किंवा आले साधे खाऊ शकता, दोन्ही प्रकार फायदेशीर आहेत.

बडीशेप

बडीशेप पोटात ताजेपणा भरण्यासोबतच वेदना आणि गॅसही दूर करते. गॅस निघून गेल्यावर छातीत दुखण्यापासूनही आराम मिळतो. बडीशेप चावुन खावु शकता किंवा बडीशेप पाण्यात उकळून ते गाळून प्यावे.

लिंबूपाणी

लिंबू पाणी पोटाशी संबंधित समस्यांमध्ये खूप उपयुक्त आहे, विशेषत: जेव्हा गॅस असेल तेव्हा त्याचे सेवन करणे चांगले आहे. ग्लासमध्ये काळे मीठ आणि लिंबू पिळून प्या. त्यामुळे छातीपर्यंत पोचणारा गॅसही कमी होईल.

ओवा

छातीतील गॅससाठी ओवाचे सेवन केले जाऊ शकते. तुम्हाला फक्त एक चमचा ओवा भाजून घ्यायच्या आहे आणि त्यात थोडेसे काळे मीठ मिसळून चघळायचे आहे किंवा पाण्यात टाकुन गिळायचे आहे. ओवा पावडरनी बनवलेला गरम चहा देखील फायदेशीर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तासगावात खडाजंगी! खासदार विशाल पाटलांच्या अंगावर धावून गेले संजयकाका समर्थक; दोन्ही नेत्यांत जोरदार वादावादी

John Abraham : अनिल कपूरने गोळी मारल्यामुळे जॉनचा जीव जाता जाता राहिला ; काय घडलं नेमकं ? जाणून घेऊया

Nobel Prize 2024: फिजिओलॉजी अन् मेडिसिनसाठी नोबेल जाहीर; व्हिक्टर अँब्रॉस अन् गॅरी रुव्हकून यांच्या नावावर शिक्कामोर्तब

RG Kar Case: ''त्या' ट्रेनी डॉक्टरवर गँगरेप झाला नव्हता'', CBIच्या चार्जशीटमध्ये मोठा खुलासा; धक्कादायक माहिती आली समोर

Latest Maharashtra News Updates : रश्मी शुक्लांना पोलीस महासंचालक पदावरून हटवा - पटोले

SCROLL FOR NEXT