chaat esakal
health-fitness-wellness

पाणी पुरी,भेळ खा! वजन घटवा

त्यातील घटकांमुळे वजन कमी करण्यास चालना मिळते

भक्ती सोमण-गोखले

पाणी पुरी, भेळ तुम्हाला आवडते. पण त्यामुळे वजन वाढेल अशी चिंता तुम्हाला सतावत असेल. तर ही चिंता सोडा. कारण हेच पदार्थ तुमचे वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी फायद्याचे ठरत आहेत. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे. हे क्लासिक भारतीय स्ट्रीट फूड (Street Food) खाऊन लोकांना मनापासून आनंद मिळतोच. शिवाय त्यातील घटकांमुळे वजन कमी होण्यासही मदत होते. हे पदार्थ वजन कमी करण्यास कसे कारणीभूत होतात ते पाहूया.

Pani Puri

पाणीपुरी (Pani Puri)

पाणीपुरी (Pani Puri) न आवडणारा माणूस विरळाच. आबालवृद्धांपासून सर्वांनाच ती आवडते. तुम्ही पाणी पुरी खाल्ल्याचे फायदे वाचून चकीत व्हाल. एक प्लॅट पाणी पुरी खाल्ल्याने ४ ग्रॅम फॅट असते. त्यापैकी 2 ग्रॅम हे मुळात पुरी तळण्यासाठी वापरले जाणारे तेल आहे. विशेष म्हणजे, चणे असल्याने प्रोटीन मिळतेच. शिवाय कार्बोहायड्रेट्स असलेल्या बटाट्यांसोबत भाजलेले जिरे, हिंग, पुदिना, लाल मिरची, कोथिंबीर आणि पावडर यांसारखे मसाले असल्याने योग्य प्रमाणात खनिजे मिळतात. त्याशिवाय पोटॅशियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी यांसारखी जीवनसत्त्वेही मिळतात. तुम्ही एक किंवा दोन प्लॅट पाणी पुरी सहज खाऊ शकता.

Bhelpuri

भेळपुरी (​Bhelpuri)

भेळपुरी (​Bhelpuri)कुरमुरे, काकडी, बटाटे, टोमॅटो, स्प्राउट्स, शेंगदाण्यांपासून बनविली जाते. ती व्हिटॅमिन आणि अँटिऑक्सिडंट असलेल्या विविध घटकांचे त्यात मिश्रण आहे. लाल चटणी आणि पुदिना आणि कोथिंबीर घालून बनवलेली हिरवी चटणी भेळेचा स्वाद वाढवतात. त्यामुळे फायबरही मिळते. तसेच वजन कमी होते.

Raj Kachori

राज कचोरी (Raj Kachori )

एक प्लॅट राज कचोरीमध्ये (Raj Kachori )४ ग्रॅम फायबर,7 ग्रॅम फॅट, 6 ग्रॅम प्रथिने आणि 25 ग्रॅम कार्बोहायड्रेट असते. त्यामुळे ते खाऊन समाधान तर मिळेतच. शिवाय पौष्टीक घटक असल्याने पोटही भरते. प्रोबायोटिक रिच दही, फायबर असलेले कडधान्य, चिरलेल्या भाज्या, टोमॅटो, काकडी आणि डाळींब या पदार्थांमध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. तसेच जे मसाले यात वापरले जातात त्यामुळे पदार्थाचा स्वादिष्टपणा वाढतो आणि चयापचय क्रिया गतिमान तसेच सुधारण्यास मदत होते. यामुळे आपले वजन कमी होऊ शकते.

Peanut Chaat

दाण्याची भेळ (Peanut Chaat)

ही पौष्टीक रेसिपी दाणे, लिंबाचा रस, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर पेरून केली जाते. यात तुम्ही आवडीच्या भाज्या आणि मसालेही घालू शकता. प्रोटीन आणि फायबर असल्यामुळे हा सोपा पदार्थ एकदम हेल्दी होतो. हा पदार्थ खाल्ल्याने तुम्हाला २३३ कॅलरीज आहेत. त्यातून तुम्हाला दिवसाला २००० कॅलरीज मिळू शकतात. त्यामुळे हा पदार्थ खाऊन तुम्ही निरोगी तर व्हालच पण वजनही कमी होईल.

Sprouts Chaat

कडधान्यांचे चाट (Sprouts Chaat)

हा सर्वात पौष्टीक आणि आरोग्यदायी चाट आहे. तो कडधान्य, तिखट, ताज्या लिंबाचा रस, भाज्या आणि कोथिंबिरीपासून तयार केला जातो. कडधान्ये पौष्टीक तर असतातच शिवाय त्यातून फायबर आणि प्रथिने मिळतात. पण लिंबाच्या रसामुळे व्हिटॅमीन सी मिळते. तसेच पौष्टीक पदार्थ खाल्ल्याने वजनही नियंत्रणात राहते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Latest Maharashtra News Updates : एक्झिट पोलनुसार महायुतीचे सरकार स्थापन होणार : रामदास आठवले

SCROLL FOR NEXT