देशात सध्या कोरोनाची (corona) दुसरी लाट असून या लाटेचा फटका कमी-अधिक प्रमाणात सगळ्यांनाच बसला आहे. याच लाटेत असंख्य जणांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहे.तर, अद्यापही अनेक जण या विषाणूसोबत लढा देत आहेत. म्हणूनच, कोरोनाचं कोणतंही लक्षण दिसलं की लगेच डॉक्टांशी संपर्क साधा असा सल्ला देण्यात येत आहे. आता कोरोनाची सर्वसाधारण लक्षण साऱ्यांनाच ठावूक आहेत. यात ताप, सर्दी, खोकला,श्वास घेण्यास अडथळा निर्माण होणे ही सर्वसाधारण लक्षण आहेत. त्यामुळे एखाद्याला खोकला किंवा सर्दी जरी झाली तरीदेखील अनेक जणांचा भीतीने थरकाप उडतो. परंतु, जर तुम्हाला वारंवार सर्दी होत असेल तर कोरोनापासून तुमचं संरक्षण होऊ शकतं, असं नुकतंच एका संशोधनातून समोर आलं आहे. (corona-protection-against-those-infected-with-the-common-cold-virus)
ज्या व्यक्तींना वरचेवर सर्दी होत असते म्हणजे ज्यांच्यामध्ये सर्दीच्या विषाणूचा प्रादुर्भाव होत असतो. अशा व्यक्तींमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता खूपच कमी असते. असं ‘जर्नल एक्सपिरिमेंटल मेडिसीन’ या नियतकालिकात नमूद करण्यात आलं आहे.
सर्दीचा ऱ्हायनोव्हायरस हा विषाणू कायम श्वसन मार्गात आढळून येतो. त्यामुळे या विषाणूचा संसर्ग आधीच झाल्यामुळे शरीरातील जनुकांना ‘इंटरफेरॉन’ची क्रिया सुरु करण्याची सवय लागलेली असते. ही जनुके प्रतिकारशक्ती प्रणालीतील इंटरफेरॉन रेणूंना सार्स सीओव्ही २ वाढीविरोधात क्रिया सुरू करण्यास प्रेरणा देतात. त्यामुळे कायम श्वसनमार्गात संसर्ग करणारे सर्दीच्या विषाणूमुळे सार्स सीओव्ही २ म्हणजेच कोरोनाची बाधा होत नाही.
"कोरोना विषाणूचा शरीरात प्रवेश झाल्यानंतर ही जनुके इंटरफेरॉन्स रेणूंचा मारा करतात व त्याच जागी कोरोनाला रोखलं जातं", असं अमेरिकेतील येल स्कूल ऑफ मेडिसीन या संस्थेचे सहायक प्राध्यापक एलेन फॉक्समन म्हणाले.
पुढे ते म्हणतात, "अलिकडेच झालेल्या जनुकीय अभ्यासानुसार, इंटरफेरॉन्सचा वापर कोरोनाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच शक्य असतो. त्यात कोरोना विषाणूला रोखण्याची क्षमता असते. त्यामुळे ज्यांना वारंवार सर्दी होते त्यांच्यात इंटरफेरॉनच्या मदतीने नैसर्गिक व वेळेवर प्रतिकार होत असतो. म्हणूनच, त्यांना कोणत्याही औषधांची गरज नसून वेळेवर त्यांचे सर्दीचे विषाणू मारले जातात. तशीच क्रिया कोरोनाबाबती घडते."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.