Covid Omicron Variant symptoms esakal
health-fitness-wellness

तुम्हाला ओमिक्रॉन झालाय हे कसं ओळखाल? अशी लक्षणे दिसल्यास सावधान

भारतात ओमिक्रॉनचे ८७ रूग्ण आढळले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

जगभर ओमिक्रॉन व्हायरस खूप वेगाने पसरत आहे. त्यामुळे जगभरातील आरोग्यतज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच प्रत्येकाला या व्हायरस (Omicron Variant) विरोधात आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.

भारतात(India), ओमिक्रॉनची 14 नवीन केसेस नोंदवली गेली आहेत, ज्यामुळे एकूण रूग्णसंख्या 87 वर पोहोचली आहे. यूकेमध्ये, 78,610 प्रकरणांसह, महामारीच्या सुरुवातीपासून दैनंदिन COVID-19 प्रकरणांची सर्वाधिक संख्या नोंदवली गेली आहे. रूग्णांची संख्या वाढतच राहिल्याने पुढील काही आठवड्यांत रेकॉर्ड मोडले जातील, असे ब्रिटनचे मुख्य वैद्यकीय अधिकारी प्रोफेसर ख्रिस व्हिट्टी यांनी सांगितले.

cough

या लक्षणांकडे दुर्लक्ष नको (Covid Omicron Variant symptoms)

कोविड काळात ताप, खोकला, थकवा, वास आणि चव जाणे, अशा लक्षणांबद्दल सर्व लोकं जागरूक आहेत. पण ओमिक्रॉन प्रकारतील लक्षणे वेगळी आणि अधिक असामान्य असू शकतात, असे तज्ज्ञांना वाटते. ओमिक्रॉन प्रकार सापडलेल्या दक्षिण आफ्रिकन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. अँजेलिक कोएत्झी यांनी सांगितले की लोकांमध्ये 'सौम्य' लक्षणे आढळून येत आहेत. तर ज्यांना याची लागण झाली त्यांना कोणत्याही प्रकारचे गंभीर परिणाम आढळले नाहीत. मात्र काहींनी ताप येण्याची तक्रार केली. काहींना घसादुखी, थकवा आणि अंगदुखी अशी लक्षणे आढळली.

दक्षिण आफ्रिकेच्या आरोग्य विभागाच्या जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टर अनबेन पिल्ले म्हणाले की रात्री खूप घाम येत असल्यास ते लक्षण नवीन ओमिक्रॉन प्रकारामधील असू शकते. त्याचबरोबरीने अनेकांमध्ये जी लक्षणे दिसत आहेत, त्यात अंग खूप दुखण्याची समस्याही एक आहे.

omicron variant

क्वारंटाईन होण्याचा काळ कोरोनासारखाच

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या म्हणण्यानुसार, एखाद्याला विषाणूची लागण झाल्यावर लक्षणे दिसण्यासाठी सरासरी पाच ते सहा दिवस लागतात, परंतु ओमिक्रॉनमध्ये 14 दिवस लागू शकतात. कोविड-संक्रमित व्यक्ती लक्षणे दिसू लागण्यापूर्वी सुमारे दोन दिवसांपासून आणि त्यानंतर 10 दिवसांपर्यंत SARs-COV-2 विषाणू इतरांना कार्यक्षमतेने प्रसारित करू शकतात. एखाद्या व्यक्तीला लक्षणे असली किंवा नसली तरीही, तो संसर्ग इतरांना होण्याची शक्यता असते.

लक्षणे इतर कोरोनाव्हायरस प्रकारासारखी लगेच दिसतात का?

या संदर्भात संशोधन अजूनही चालू आहे. मात्र, ओमिक्रॉनची लक्षणे पूर्वीच्या कोविड-19 प्रकारांपेक्षा लवकर दिसू शकतात. यूकेचे आरोग्य सचिव साजिद जाविद याबाबत म्हणाले की, "यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सीच्या अलीकडील विश्लेषणात असे सूचित होते की डेल्टा व्हेरियंटपेक्षा ओमिक्रॉन प्रकारासाठी संसर्ग आणि संसर्गजन्यता यांच्यातील दरी लहान असू शकते.

Corona Patient

ही काळजी घ्या

कोविड १९ ची लागण झाल्यावर दोन दिवसात लक्षणे दिसायला लागतात. त्यानंतर 10 दिवसांपर्यंत संसर्ग वाढतो, याचा अर्थ या दरम्यान, तुमच्यामुळे इतरांना संसर्ग होतो. त्यामुळे तुम्ही अशा व्यक्तींच्या संपर्कात आल्यावर स्वत:ला क्वारंटाईन करणे गरजेचे आहे. मात्र त्यासाठी तुम्ही तुमची कोरोना टेस्ट करून घ्या. जोपर्यंत चाचणीचा अहवाल येत नाही तोपर्यंत कोणाच्याही संपर्कात येऊ नका. तुमची टेस्ट पॉझिटिव्ह आली तर कोणाच्याही संपर्कात येऊ नका. स्वत:ला अलग ठेवा, तुमच्या लक्षणांवर लक्ष ठेवा आणि जर श्वास लागणे, छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होत असल्यास किंवा ऑक्सिजन कमी असल्यास ताबडतोब वैद्यकीय मदत घ्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT