corona hearing capacity 
health-fitness-wellness

कोरोना देऊ शकतो बहिरेपणा; ऐकण्याच्या क्षमतेवर करु शकतो गंभीर परिणाम

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : देशात गेल्या एका वर्षापासून कोरोना व्हायरसचा कहर सुरु आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आलाय, असं वाटत असतानाच पुन्हा एकदा संपूर्ण देशभरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढताना दिसून येत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत भारतात एका दिवसांत 62 हजार 714 नवीन कोरोना रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 1 कोटी 19 लाख 71 हजार 624 वर पोहचलीय. कोरोना संक्रमणामुळे गेल्या 24 तासांत 312 रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर कोरोना महामारीमुळे जीव गमावणाऱ्या व्यक्तींची संख्या 1 लाख 61 हजार 552  वर पोहचलीय. एका रिपोर्टनुसार कोरोना व्यक्तीच्या श्रवणक्षमतेवर प्रभाव टाकताना दिसत आहे. ब्रिटनमध्ये झालेल्या एका शोध अभ्यासाला इंटरनॅशनल जर्नल ऑफ ऑडियोलॉजीमध्ये प्रकाशित केलं गेलं आहे.

या अभ्यासाच्या निष्कर्षात म्हटलं गेलंय की, कोरोना व्हायरस व्यक्तीच्या श्रवणक्षमतेवर विपरित परिणाम करु शकतो. वेल्समध्ये 56 हून अधिक प्रकरणांवर रिसर्च केल्यानंतर हा दावा केला गेलाय. इतर अनेक संशोधनानुसार, कोरोनामुळे निव्वळ फुप्फुस नव्हे तर लिव्हर, हार्ट आणि इतर अनेक अवयवांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. मात्र, आता हा व्हायरस कानांवर देखील परिणाम करु शकण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. 

हेही वाचा - बेंगलोरमध्ये विक्रमी गतीने लहानग्यांना कोरोनाचा विळखा; देशातही उच्चांकी रुग्णवाढ
टिनीटस हा कानांशी संबंधित एक आजार आहे. यामध्ये कानात काहीतरी वाजतंय असं सतत वाटत राहतं. शिट्टी वाजल्यासारखा एकसारखा आवाज सतत ऐकू येतो. तसेच कानात जोरदार वेदना होतात. अद्याप हे कोरोनाचे लक्षण असल्यावर शिक्कामोर्तब झाला नाहीये. मात्र तरीही आपल्याला असा त्रास जाणवत असेल तर आपल्याला अधिक सजग होण्याची गरज आहे. वेल्सच्या अध्ययनादरम्यान 7.6 टक्क्यांहून अधिक लोक बहिरेपणाच्या समस्येने ग्रासलेले आहेत. मात्र, काही लोकांच्या ऐकण्याच्या क्षमतेत गडबड झालेली दिसून आली आहे. जेव्हा कोरोना रुग्णांना त्यांच्या श्रवणक्षमतेबाबत विचारले गेले तेंव्हा 121 संक्रमितांपैकी 16 लोकांमध्ये श्रवणक्षमता कमी झाली होती. तर त्यातील 8 लोकांमध्ये मोठा श्रवणदोष आढळून आला. तर त्यातील 8 जणांनी टिनीटसची तक्रार केली होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील १३१०९ मतांची आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT