men health 
health-fitness-wellness

पुरूषांमध्ये ब्रेकअप्स, एकटेपणामुळे वाढतोय कॅन्सरचा धोका, अभ्यासात स्पष्ट

डेन्मार्कमध्ये याविषयी संशोधन करण्यात आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

ब्रेकअप झाल्याने तणाव वाढतो. ब्रेकअप झाल्याने वाढलेला तणाव हा तुमच्या मानसिक आरोग्याबरोबरच शारीरिक आरोग्यासाठीही (Health) धोकादायक आहे, असे एका संशोधनात सांगितले आहे. डेन्मार्कमध्ये याविषयी संशोधन करण्यात आले. जे पुरुष (Men) जास्त ब्रेकअप (Braekup) करतात किंवा दीर्घकाळ एकटे राहतात त्यांना जास्त त्रास होतो. यामुळे छातीत जळजळ, कर्करोग, हृदयविकार आणि टाइप 2 मधुमेह होण्याचा धोका आणखी वाढतो. या अभ्यासादरम्यान महिलांपेक्षा पुरूषांची संख्या जास्त होती. त्यामुळेही कदाचित असा निष्कर्ष निघाला असेल.

जोडीदार गमावल्यानंतर प्रतिकारशक्तीवर परिणाम

कोपनहेगन विद्यापीठाच्या टिमने एकटेपणा आणि ब्रेकअप्स दरम्यान खराब झालेले आरोग्य या संबंधावर आधारित संशोधन केले. अभ्यासात वारंवार डेट करणाऱ्यांचे ब्रेकअप होते आणि ते दीर्घकाळ अविवाहित राहतात तेव्हा काय होते हे शोधण्याचा प्रयत्न केला.StudyFinds च्या अहवालानुसार, कमिटेड लोकांवर यापूर्वी केलेल्या अभ्यासात असे आढळून आले होते की घटस्फोट, जोडीदाराचा मृत्यू किंवा एकाकीपणाचा त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत होते आणि मृत्यू होतो.

जास्त ब्रेकअप झालेल्यांना जास्त धोका

या नव्या अभ्यासात ४८ ते ६२ वयोगटातील लोकांवर संशोधन करण्यात आले. प्रत्येक व्यक्तीने ते 1986 ते 2011 पर्यंत किती वर्षे एकटे राहिले ते नोंदवले. संशोधनात, ब्रेकअप किंवा एकाकीपणाचा सामना करणाऱ्या पुरुषांवर याचा खूप वाईट परिणाम दिसून आला. एक वर्ष अविवाहित राहिलेल्या लोकांपेक्षा जास्त ब्रेकअप झालेल्यांच्या रक्तात 17 टक्के जास्त समस्या असल्याचे आढळून आले.

ब्रेकअप झाल्यावर पुरूष कसे वागतात?

जे पुरूष अनेक वर्ष एकटे राहत होते त्यांच्या रक्तात १२ टक्के जास्त समस्या आढळल्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे फक्त पुरुषांच्या रक्तातच दिसले. संशोधकांचा असा विश्वास आहे की पुरुष ब्रेकअपला वेगळ्या पद्धतीने हाताळतात म्हणून हे असू शकते. ते जास्त दारू आणि सिगारेट पिऊन ताण हलका करतात. तर, महिलांमध्ये नैराश्यासारखी लक्षणे दिसतात. त्याचवेळी, अभ्यासात पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण कमी असल्याने असे घडले असावे, असेही मानले जात होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT