Devayani-M 
health-fitness-wellness

कार्यक्षमता वाढवण्यासाठीचे चार पैलू 

देवयानी एम., योगप्रशिक्षक

तुम्ही आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर असाल; विद्यार्थी, नोकरी किंवा व्यवसाय करणारे, किंवा गृहिणी असाल तरी काम थांबत नाही. त्याचे स्वरूप मात्र वेगवेगळे असते. सर्वांनाच कार्यक्षमता कशी वाढवावी याबद्दलचे प्रश्न असतातच. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांना वाटते कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता अजून कशी वाढेल, शिक्षकांना त्यांच्या विद्यार्थ्यांविषयी हेच वाटते. आपल्या सर्वांकडे तेच चोवीस तास, एक शरीर आणि मेंदू हे सर्व असले, तरी त्याचा कसा वापर करून क्षमता कशा उंचावायच्या हे त्या त्या व्यक्तीच्या हातात आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मुळात कार्यक्षमता म्हणजे काय? तर किती तास काम करतो, दिवसात किती वेळ बिझी असतो, किती मल्टिटास्किंग करतो हे कार्य क्षमतेचे निकष नाहीत. ऑफिसमध्ये आठ ते नऊ तास काम करून किती आउटपुट दिले आहे, हे पाहिल्यास अनेकदा समजते की आपण नुसतेच आणि उगीचच बिझी असतो. आज कॉर्पोरेट कंपन्यांच्या समस्या याच आहेत, की आठ ते नऊ तास लोक उपस्थित राहूनही कार्यक्षमता खूपच कमी आहे. वेळेचे नियोजन (time management) आणि नि:संदिग्धता (clarity) यांनी कामात गुणात्मक वृद्धी होते, फक्त क्वांटिटेटिव्ह नाही. काळ हा सापेक्ष असल्याने वेळेवर कार्यक्षमता अवलंबून असू शकत नाही, निष्पन्न काय होते ते महत्त्वाचे. आपण आठ तासात करतो हे चार तासांत होऊ शकले, तर उगाचच उरलेला वेळ भरून ठेवण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे कार्यक्षमता ही प्रत्येकाने स्वतः ठरविण्याची गोष्ट आहे. प्रत्येकाची परिमाणे एक असू शकणार नाहीत. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कार्यक्षमता वाढवण्यासाठीचे चार पैलू 
१. उद्देश (Purpose) 

आपल्या कामात अर्थपूर्णता आणि उद्देश महत्त्वाचा आहे. आपल्यापेक्षा मोठे-उदात्त असा उद्देश व ध्येय असल्यास मन संकुचित राहत नाही. उद्देशाला धरून काम केल्यास कार्य साफल्य आणि यशस्वितेची भावना तितकी मोठी असेल. योग आपल्याला आपल्याच विचारांच्या डबक्यातून बाहेर काढतो. आपल्यातल्या ‘मी’च्या जाणिवेला वारंवार योगाभ्यासाने 'वैश्विक' जाणिवेशी स्वतःला जोडल्यास आपल्या मनाची, बुद्धीची, क्षमतेची उदात्तता व विशालता वाढते आणि आपणच आखून ठेवलेल्या कुंपणाच्या बाहेर जाण्याची भूक लागू लागते. ही अमर्यादता कामात येऊ लागली, की कार्यक्षमता वाढल्याशिवाय राहणार नाही. 

२. एक तत्त्व अभ्यास (Focus) 
आज अनेक उपकरणांमुळे आणि सतत कुठे काय चालू आहे याची माहिती असण्याची गरज भासत असल्याने मन सारखे बाहेर धावत असते. काही न काही कारणाने मन विचलित होण्याने एका जागी केंद्रित करणे अवघड होते. याला योगसूत्रात 'अलब्धभूमिकत्व' म्हटले आहे. अष्टांग योगातील ‘प्रत्याहार’ आणि ‘धारणा’ हा आपले लक्ष एका जागी केंद्रित ठेवण्यासाठीचा अभ्यास आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

३. एकाग्रता (Concentration) 
अनेकदा आपले लक्ष एका ठिकाणी थांबते, पण ते टिकत नाही. ही एकाग्रता एकाजागी दीर्घकाळ टिकवण्याची सवय नियमित ध्यान केल्याने लागेल. आपले चित्त एका ठिकाणी दीर्घकाळ एकाग्र न राहता परत परत विचलित होण्याला योगसूत्रात 'अनवस्थितत्व' म्हटले आहे. 

४. आरोग्य (Health)  
शरीरच लक्ष वेधत राहिल्यास मनाची एकाग्रता कशी साधता येईल? निरोगी आणि सुखदायक स्थितीत शरीर असण्यासाठी चार महत्त्वाच्या बाबी कारणीभूत आहेत. आहार, व्यायाम, झोप आणि योग्य जीवनशैली. असे समजा आहार म्हणजे गाडीत घालतो ते इंधन, नुसतं इंधन घालून गाडी बंद ठेवणे गाडीसाठी हानिकारक आहे, त्यामुळे तिला चालनात ठेवणे म्हणजे व्यायाम. गाडीचे नियमित केलेले सर्व्हिसिंग म्हणजे झोप आणि ती गाडी व्यवस्थित, प्रेमाने चालवणे म्हणजे योग्य जीवनशैली असणे. यातील प्रत्येक विषयावर वेगवेगळ्या लेखांमध्ये मी अगोदरच सविस्तर माहिती दिलेली आहेच. या चार गोष्टींची काळजी रोज घेतली तर त्या आपली काळजी घेतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची अचानक एक्झिट; आता 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

Uddhav Thackeray Mumbai: ठाकरेंचा गड खालसा करण्यात येणार का भाजपला यश? मोदी शहांसह डझनभर मंत्री मुंबईत

Devendra fadnavis: योगींच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला देवेंद्र फडणवीसांचे समर्थन, म्हणाले- हा तर देशाचा इतिहास

Latest Maharashtra News Updates : पवारांसोबत जाण्याची वेळ येणार नाही, महायुतीला बहुमत मिळेल-एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT