Devyani-M 
health-fitness-wellness

शोध स्वतःचा : पुन्हा लहान व्हायचंय...

देवयानी एम.

काही दिवसांपूर्वी मी एका लहान मुलाला विचारलं, ‘काय रे, कसा आहेस?’ त्यावर तो म्हणाला, ‘ताई, मी मस्त आहे!’ बोलताना डोळ्यात एक चमक होती. नंतर लिफ्टमध्ये एक काका भेटले त्यांनाही मी तेच विचारलं तर ते म्हणाले, ‘ठीक आहे, बरा आहे.’ दुसऱ्या दिवशी मी प्रयोग म्हणून चार-पाच लहान मुला-मुलींना आणि चार-पाच काका-काकूंना पुन्हा तोच प्रश्न विचारला आणि त्याच प्रकारची कॉन्ट्रास्ट उत्तरं मिळाली. १-२ क्लायंटही कायम ''it’s ok'' असा कोमट प्रतिसाद देत आहेत, असं दिसून आलं. लहानपणची डोळ्यातली ती चमक नंतर कुठं गेली? ‘It''s ok, all ok, it''s fine’ अशी घुटमळणारी भाषा का होत जाते? काठावर बसून पोहू की नको, असा आपला attitude का होत जातो?

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भीती
लहान मुलाला ‘हाss आहे’ असं अनेकदा सांगून सुद्धा स्वतःचा हात भाजेपर्यंत कळत नाही. ते नवनवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करतच राहतं. पन्नासवेळा पडूनसुद्धा पुन्हा उठून उभं राहण्याचा अट्टाहास करतं. ‘मला काय उभा राहायला जमणार नाही, मी कायम रांगतच बसतो बाबा,’ असं त्याला कधीच वाटत नाही. मग आपण मोठे होतो आणि आपल्याला अपयशाची भीती वाटायला लागते. नात्यात चटके बसण्याची, व्यवसायात तोंडघशी पडण्याची, अशा अनेक गोष्टींची भीती वाटायला लागते आणि आपण नवीन गोष्टी करणं, पुन्हा उठून उभं राहणं हे सगळं सोडून द्यायला लागतो. अळी वेटोळं घालून बसते, तसं स्वतःला आखडून ठेवायला लागतो.

धरून ठेवणे
लहान मुलांना आई-बाबा ओरडले, तर ती जरा वेळ रुसतात, रडतात आणि काही वेळात सोडून देतात, विसरतात आणि पुन्हा आपल्या आयुष्यात राहतात. आपण मोठे झालो की गोष्टी अनंतकाळ धरून ठेवतो, मनात त्या पुन्हा पुन्हा चघळतो, ‘तो असं म्हणाला, तिनं असं केलं,’ यात बुडून राहतो आणि त्या विषयाचा पार चोथा होईपर्यंत रवंथ करत राहतो. छोट्याशा वादामुळं अनेक महिने अबोला धरलेली अनेक मोठी मंडळी आहेत. या विचारांमध्ये आपला वेळ, शक्ती आणि मूड हरवून बसतो. आक्रोश, द्वेष, राग यांना खत न घालता लहान मुलांसारखं पटकन सोडून देता आलं पाहिजे.

मदत घ्या
लहान मुलांना कधी काही अडलं, त्रास झाला तर ती मदत घेण्यासाठी मोठ्यांकडं धावून येतात. त्यांना मदत मागण्याचा कमीपणा वाटत नाही. इंग्रजीमध्ये एक छान म्हण आहे जी मला खूप आवडते, 'If you never ask the answer will always be No.' आपण मोठे होतो आणि आपल्याला वाटतं की आपल्याला सगळ्यांतलं सगळं कळतं आणि सुधरलं नाही तर आपल्या भावना दडपून ठेवायला लागतो. डिप्रेशन, सोशल अँझायटी, क्रॉनिक स्ट्रेस यांसारखे त्रास वाढतात कारण वेळेवर मदत घेतली जात नाही.

वर्तमानात राहा
मुलं जिथं असतात तिथं १०० टक्के असतात. या ''in the moment'' राहण्यानं ते जे करतात, त्यात पूर्ण आनंद उपभोगतात. आपण मोठे झालो, की भूतकाळाचा भार पाठीवर वाहत राहतो किंवा भविष्याच्या काळजीत गर्त असतो. ‘या क्षणात’ उपस्थित कमीच असतो. वर्तमानात अनुपस्थित राहून आपल्याच आयुष्याचा आनंद हरवून बसतो.

आनंदी राहा
मुलं छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंदी असतात. चेंडू जरी खेळायला मिळाला, तरी उड्या मारायला लागतात. चेंडू दिला तर बॅट पाहिजे, आता बॅट आहे तर स्टंप नाही, मग ग्लोव्हज, हेल्मेट मग शूज पाहिजे अशा अपेक्षा वाढवत त्यांच्या खेळण्यातला आनंद घालवत नाहीत. पण आपण अपेक्षा आणि ‘आणखी’ मिळवण्याच्या भुकेपोटी जे हाती आहे त्याच्या आनंदात रमायला विसरतो. गाडी घ्यायचं हे स्वप्न अनेक महिने-वर्ष पाहिलेलं असतं, पण गाडी आली की त्याचा आनंद किती काळ टिकतो? लगेच पुढची लिस्ट तयार! कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करताना ‘श्रीगजानन प्रसन्न, श्रीकुलदेवता प्रसन्न’ असं म्हटले जातं, पण जी व्यक्ती हे कार्य करणार असते ती प्रसन्न असते का?

तुम्ही म्हणाल मुलांना कष्ट, स्ट्रेस, जबाबदाऱ्या, पीडा, दुःख, कर्ज हे सगळं कुठं असतं? त्यांना खरं आयुष्य माहीतच नसतं. बरोबर आहे! पण आजपासून फक्त एक आठवडा जगाकडं, आजूबाजूच्या माणसांकडं, कामाकडं, प्रत्येक गोष्टीकडं लहान मुलांच्या नजरेने पाहा. ‘wonder’ घालवू नका. कारण खरं सांगायचं तर ज्या क्षणी आपण मोठे झालो, असं आपल्याला वाटतं त्या क्षणी आपली वाढ थांबते. माझे ८७ वर्षांचे एक सर आहेत. त्यांच्या डोळ्यातली ती चमक, प्रसन्न चेहरा, ऊर्जा आणि प्रचंड सकारात्मकता पाहून मला कायम प्रेरणा मिळते. व्यावसायिक दृष्ट्या अत्यंत यशस्वी, उत्तम आरोग्य आणि ओसंडणारा आनंद त्यांचात पाहिला, की मला वाटतं त्यांनी त्यांच्यातला बालकभाव टिकवून ठेवला आहे म्हणूनच हे सर्व शक्य आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेंचा पराभव निश्चित, चौदाव्या फेरी अंती तिसऱ्या स्थानी

Electronic Voting Machine : EVM मशीनवर कशी मोजली जातात मते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Atul Bhatkhalkar Won Kandivali East Assembly Election : कांदिवली पूर्व विधानसभेत बीजेपीच्या अतुल भातखळकरांची विजयी हॅट्रिक !

Maharashtra next CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? 'निकाला'नंतर तावडेंची बदलली भाषा, कोणाला दिलं विजयाचं क्रेडिट?

Kagal Assembly Election Results 2024 : मुश्रीफांनी समरजित घाटगेंचा केला टप्प्यात कार्यक्रम; कागलमध्ये लगावला 'विजयी षटकार'

SCROLL FOR NEXT