समदोष: समाग्निश्च समधातु मल: क्रिया:।
प्रसन्नात्मेंद्रियमन: स्वस्थ इत्यभिधीयते।।
त्रिदोष (वात-पित्त-कफ), जठराग्नी, सप्तधातू, मल, शरीराच्या सर्व क्रिया सम आहेत, आत्मा-इंद्रिये-मन प्रसन्न आहे, तिथेच खरे ‘स्वास्थ्य’ आहे.
भगवद्गीतेसह सर्व योग ग्रंथांमध्ये व आयुर्वेदात ‘सम’ या शब्दाचा उल्लेख सर्वाधिक वेळा केला गेला आहे. हे ‘समत्व’ शारीरिक-मानसिक पातळीवर वाढवत नेण्यासाठी योगाभ्यास करणे अपरिहार्य आहे. बहुतांश वेळा योगाभ्यास म्हणजे आसने व प्राणायाम यांचा रोज केलेला एक तासाचा सराव असा समज असतो. तो तर करायलाच हवा! परंतु या योगाचा ‘उपयोग’ उरलेल्या दिवसातही व्हावा असे वाटत असल्यास योगिक जीवनशैली असायला हवी.
‘हे समत्व कशासाठी हवे? बरे चाललेय की आपले,’ असे वाटत असल्यास जरा वेळ डोळे मिटून शांत बसून पहा. शरीराच्या हालचाली, चुळबुळ, मनात विचारांची गर्दी होते का? आरोग्याच्या काही न काही कुरबुरी आहेत का? मनाची अशांतता, कंटाळा, भावनेचा उद्रेक होतो का? याचे उत्तर हो असेल तर हा ‘imbalance’ आपल्या ‘Quality of Life’च्या आड येत आहे.
असमतोलाची कारणे
असमाधानी किंवा दुःखी मन हे आपल्या असमतोलाचे कारण ठरते. सगळे ठीक सुरू असताना देखील एक प्रकारचे असमाधान वाटते, अशाने आपण आयुष्याचा आनंद पूर्णपणे घेऊ शकत नाही. आता हे मनाच्या पातळीवर असणारे अडथळे हळूहळू शरीरावर म्हणजे मज्जासंस्था, स्नायू, हार्मोन्स यांच्यात बदल घडवून आणतात आणि अनेक आंतरिक प्रणालींच्या कार्यात अडथळे निर्माण करू लागतात. हे अडथळे विविध विकारांना जन्म देतात. त्यामुळे शारीरिक-मानसिक समतोल, आनंदी आणि समाधानी असणे हाच खऱ्या अर्थाने निरोगी राहण्याचा मंत्र आहे.
आपल्या इच्छा, गरजा आणि साधनसंपत्ती यांच्यातील तफावत असमाधानाला कारणीभूत ठरते. हे असमाधान, ही निराशा-खिन्नता यांच्यातून तयार होतो ‘स्ट्रेस’. आपल्या आतील आणि बाहेरील वातावरणात विसंवाद झाला की ताण येऊ लागतो. या सर्वांना खतपाणी मिळते ते दीर्घकाळ बसून केलेले काम, चुकीचा आहार, जेवणा-झोपण्याच्या न पाळलेल्या वेळा, व्यायाम न करणे, व्यसने, नात्यांमधला ताण. हे सर्व सुरूच राहिले की चुकीची जीवनशैली बनून जाते व सवयी कडक होऊ लागतात. यांचे खंडन करून मनाला वळण लावून आरोग्याची सूत्रे हाती घेणे अत्यावश्यक आहे.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
हायपरटेन्शन, हायपर अॅसिडिटी, हृदयविकार, पचनाचे विकार, श्वसनाचे विकार, हॉर्मोन्सचे असंतुलन, झोपेचे विकार, मधुमेह, सांध्यांचे त्रास, कमकुवत प्रतिकारशक्ती यांच्या मागचे कारण म्हणजे अगदी त्यांचा उगम पाहिल्यास तो आपल्या जीवनशैलीत आहे. अनेक संशोधनातून सिद्ध झाले आहे की, खोलवर गेलेल्या स्ट्रेसवर काम केले गेल्यास या विकारांवर आपण मात करू शकतो.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पायाखालच्या खड्यांना दूर करत बसण्यापेक्षा चांगले बूट घालणे जास्त शहाणपणाचे ठरते. तसेच योग सूत्रात (भारतीय मानसशास्त्र) पतंजली मुनी म्हणतात तसे -
हेयं दुःखमनागतम् ।
जे दुःख अजून झालेले नसते त्यांचा नाश करता येणे शक्य आहे. कारणाचा नाश झाला म्हणजे कार्याचा नाश होतोच. जे त्रास भविष्यात होणार आहेत ते म्हणजे ‘कार्य’. या कार्याचे कारण समजले म्हणजे त्रास होण्याआधीच कारणांना नष्ट करता आल्यास भविष्यात संभाव्य त्रास होणार नाहीत. योग आपल्या शरीर-मनाच्या नैसर्गिक क्षमतेला वृद्धिंगत करून, अडथळ्यांवर मात करण्यास सक्षम करतो. तसेच झालेली झीज भरून काढण्याचे कामही करतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.