आपण जुलै महिन्यातील एका लेखात योगसाधनेसाठी योग्य जागा व वातावरण कसे असावे हे पाहिले. त्यात पाहिलेले आठ मुद्दे ‘हठ प्रदीपिका’ या हठ योगातील प्रमाण ग्रंथाच्या निर्देशानुसार आपण सविस्तर समजून घेतले. योगात सखोल जायची इच्छा असेल आणि तयारी आणखी पक्की व्हायला हवी असल्यास ते मुद्दे अतिशय कटाक्षाने पाळायला हवेत. आज थोडे प्रॅक्टिकल अंगाने व माझ्या रोजच्या अनुभवांचा आधार घेऊन पाहूया, की योग साधनेत व सरावात नक्की छोट्या-छोट्या चुका काय होतात आणि कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते.
हेही वाचा : कार्यक्षमता वाढवण्यासाठीचे चार पैलू
ही योग शिक्षकांची व गुरूंची जबाबदारी असते, तशीच विद्यार्थ्यांची व साधकांचीही आहे. योग किंवा ध्यान वर्गात यायचे म्हणून येणे, ऑनलाइन क्लासमध्ये उशिरा येणे, आपला माइक चालू राहिला असल्यास इतरांच्या सरावात व्यत्यय येतो याचे भानही नसणे, अशा वर्तणुकीने आपणच आपले नुकसान करून घेत असतो. शिस्त ही बाहेरून लावणे एका मर्यादेपर्यंत होऊ शकते त्यानंतर अनुशासन म्हणजे self discipline आणि self commitment हीच पुढे साथ देते.
गेल्या अनेक महिन्यांपासून ऑनलाइन योग, ध्यान वर्ग चालू आहेत. आपण आपल्या घरातही योगास पूरक वातावरण बनवले पाहिजे. जसे खोलीमधील नैसर्गिक प्रकाश असावा, हवा खेळती असावी. खिडक्या बंद करून, अंधार करून मन प्रसन्न राहणार नाही. आजूबाजूला पसारा असल्यास तो आवरून खोली स्वच्छ ठेवावी. योग हा प्रत्येक क्षणात-कणात-कर्मात उतरावा. घरातील आवाज, फोन सुरू होण्यापूर्वी किंवा संपूर्ण घरालाच वळण लावून सकाळची साधना शांत वातावरणात करावी. सकाळी झोपेतून उठल्यावर शुचिर्भूत होऊन योग साधनेपूर्वी व योग साधनेनंतर काही काळ मौनात राहावे. ऑनलाइन क्लासमध्ये आई-वडिलांबरोबर त्यांची छोटी मुलेदेखील व्हिडिओ पाहत सराव करत असतात. मूल कसे करत आहेत ते बघत व त्यांच्याकडून नीट करून घेण्यामध्ये आई-वडील इतके व्यग्र होतात, की त्यांची प्रॅक्टिस बाजूलाच राहते.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
योगात व्यत्यय आणणाऱ्या गोष्टी
आदल्या रात्री उशिरा झोपणे. याने सकाळी शरीर व मन दोन्ही जड राहतील व एकाग्र होणार नाही.
सकाळी पोट पूर्णपणे साफ न होणे. चोवीस तासांचा मल पोटात साठवून सकाळी अस्वस्थ व अस्वच्छ वाटत राहील. संध्याकाळी साधना करत असल्यास पोट हलके असावे.
जिभेवर कोणतीही चव नसावी. चहा-कॉफी, फळे, नाष्टा करून लगेच साधनेस बसू नये.
फोन लांब असावा. सायलेंट असला, तरी फोन जवळ असल्यास त्याच्याकडे बघावेसे वाटते. मनाला विचलित करणाऱ्या सर्व गोष्टी, उपकरणे, माणसे, प्राणी, विचार काही काळ दूर ठेवावेत. त्याचबरोबर फोनवर काही काळ घालवून लगेच साधनेस बसू नये. डोक्यात तेच विचार चालू राहतात. सकाळची किंवा संध्याकाळची साधना केल्याशिवाय हातात फोन घेऊच नये.
योगाप्रती-गुरुंप्रती पूर्ण विश्वास, श्रद्धा असावी आणि प्रामाणिकपणाने साधना व्हावी. शरीराच्या लवचिकतेबरोबरच मनाची लवचिकता आणि शरणागती खूप महत्त्वाची आहे.
सर्वांत शेवटी; पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे झटपट रिझल्ट दिसावा, या उद्देशाने व अपेक्षेने साधना करू नये. जितके आवश्यक आहेत, तेवढ्यापुरते प्रयत्न सीमित न ठेवता त्यापलीकडे प्रयत्न केले गेल्यास अनपेक्षित बदल घडून येऊ लागेल. Trust the Process!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.