Diet Tips top 4 foods esakal
health-fitness-wellness

Diet Tips: आयुर्वेदात सांगितलेले हे ४ पदार्थ खा आणि तंदुरुस्त राहा

Diet Tips : निरोगी (Healthy) राहण्यासाठी लोकांचा कल आयुर्वेदाकडे (Ayurveda) वळत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Winter Diet Tips :

हिवाळा चालू आहे. अशा परिस्थितीत आजारांपासून दूर राहण्यासाठी आहार (Diet) तसेच जीवनशैलीत (Lifestyle) काही बदल करणे आवश्यक आहे. शरीराची प्रतिकारशक्ती (Emunity) मजबूत ठेवण्यासाठी आणि शरीर उबदार ठेवण्यासाठी काही गोष्टींचा आहारात (Diet) समावेश करणे आवश्यक आहे, तसेच काही गोष्टींपासून अंतर राखणे आवश्यक आहे. आजकाल निरोगी (Healthy) राहण्यासाठी लोकांचा कल आयुर्वेदाकडे (Ayurveda) वळत आहे. प्रत्येकाचे शरीर वेगळे असते. वात, पित्त आणि कफ या तीन प्रकारच्या शक्तींनी ते बनलेले आहे. आपल्या सर्वांमध्ये या तीन ऊर्जा आहेत आणि त्यांचे संतुलन बिघडले की लगेच माणूस आजारी पडतो. आयुर्वेदात आहाराला प्राधान्य दिले आहे. जर तुमचा आहार चुकीचा असेल तर औषधे देखील काम करणार नाहीत, अन्न (Diet) योग्य असेल तर औषधांची गरज नाही. आयुर्वेदानुसार हिवाळ्यात काय खावे हे जाणून घ्या. (Top 4 food suggested by Ayurveda)

1. आले (Ginger)-

आल्याला आयुर्वेदात (Ayurveda) औषध (Medicine) मानले जाते. हे भारतीय जेवणात चव वाढवणारा पदार्थ म्हणून काम करते. हिवाळ्यात आपण चहापासून ते जेवणापर्यंत आल्याचा वापर करता येऊ शकतो. हिवाळ्यात, कोणत्याही प्रकारे आपल्या जेवणात आल्याचा समावेश करा. यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते. याउलट महिलांमध्ये मासिक पाळीदरम्यान वेदना होत असतील तर त्यातही आराम मिळतो.

2. तूप (Ghee)-

हिवाळ्यात आपण इतके सक्रिय नसतो. त्यामुळे पचनशक्ती कमजोर होऊ लागते. त्यामुळे पचनशक्तीची तीव्रता टिकवण्यासाठी तूप आणि नैसर्गिक तेलांचा आहारात समावेश करावा. या ऋतूत तूप किंवा पांढरे लोणी खूप फायदेशीर आहे.

3. सूप आणि उकडलेले अन्न (Soup)-

हिवाळ्यात (Winter) भरपूर भाज्या येतात. त्यांना उकळवा आणि सूप प्या. हे तुम्हाला उबदार ठेवेल, प्रतिकारशक्ती मजबूत ठेवेल आणि शरीरात निर्जलीकरण होऊ देणार नाही. हिवाळ्यात गरम जेवण फायदेशीर ठरतं.

4. सुका मेवा (Dry Fruits)-

हिवाळ्यात काही ड्रायफ्रुट्स आणि नट्सचा आहारात नक्कीच समावेश करा. ते तुम्हाला फक्त उबदार ठेवत नाहीत तर ऊर्जा देखील देतात. काजू, अक्रोड, पिस्ता, खजूर, बदाम, काहीही खाऊ शकता. बाकी काही नसेल तर स्नॅक्स म्हणून शेंगदाणे खा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly: आला, आला, आला...पाटील आला! सरकार कुणाचेही असो; रुबाब 'पाटलां'चाच! राज्यातून २४ 'पाटील' पोहोचले विधानसभेत

IND vs AUS 2nd Test: रोहित आला पण... टीम इंडियाचा युवा फलंदाज दुसऱ्या कसोटीला मुकणार, दुखापतीचे ग्रहण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टीची सपाट सुरुवात; मिडकॅप शेअर्समध्ये खरेदी, अदानी समूहाचे शेअर्स कोसळले

Karad Accident : मलकापुरात दुचाकीच्या धडकेत तरुण ठार; कुटुंबीयांच्या डोळ्यासमोरच अपघात

Bike Accident : भरधाव टेम्पोच्या धडकेत शरद पवार गटाचे शहराध्यक्ष जागीच ठार; डोक्याला गंभीर मार लागला अन्..

SCROLL FOR NEXT