कमी जेऊनही वजन कमी होत नाही? Esakal
health-fitness-wellness

Weight loss Diet: कमी जेवूनही वजन कमी होत नाहिय? 'हे' आहे कारण

डाएट करून किंवा जेवण कमी करूनही वजन कमी होत नसल्याने अनेकजण चिंताग्रस्त होत आहेत. यामुळे अनेकांना नैराश्याचाही सामना करावा लागतो. कमी खाऊनही वजन कमी का होत नाही? या प्रश्नाने अनेकांची चिंता वाढतेय.

Kirti Wadkar

अलिकडे बदलती जीवनशैली आणि चुकीच्या आहार पद्धतीमुळे वजन वाढण्याची समस्या निर्माण झाली आहे. अयोग्य वेळी अयोग्य आहार घेणं, दिवसभर सक्रिय नसणं किंवा अनेक तास एकाच जागी बसून काम, अपुरी झोप आणि व्यायामाचा आभाव अशा अनेक कारणांमुळे खास करून तरुणांमध्ये वाजन वाढण्याचं प्रमाण जास्त दिसून येतंय. Diet tips marathi why no weight loss by taking less mill

वाढत्या वजनाला नियंत्रणात Weight Control आणण्यासाठी विविध डाएटचे पर्याय यासाठी सुरू केले जातात. यातील काहींचं डाएट फॉलो केल्याने काही प्रमाणात वजन कमी होतं देखील. मात्र असे बरेच जण आहेत ज्याचं डाएट Diet करूनही किंवा जेवण कमी करूनही वजन कमी होत नाही. 

डाएट करून किंवा जेवण कमी करूनही वजन कमी होत नसल्याने अनेकजण चिंताग्रस्त होत आहेत. यामुळे अनेकांना नैराश्याचाही सामना करावा लागतो. कमी खाऊनही वजन कमी का होत नाही? या प्रश्नाने अनेकांची चिंता वाढतेय. खरं तर वजन कमी करण्यासाठी केवळ कमी खाण हा एकच पर्याय नाही. यामध्ये व्यायाम, पुरेशी झोप आणि पुरेस पाणी पिणं अशा अनेक गोष्टी महत्वाच्या ठरतात. वजन कमी करण्याबाबतच्या अशाच काही गैरसमजांबाबचचा उलगडा आज आपण इथे करणार आहोत. Diet tips for weight loss

उपाशी राहिल्याने वजन कमी होत नाही

उपाशी राहिल्याने वजन कमी होवू शकतं हा एक मोठा गैरसमज आहे. जास्तवेळ उपाशी राहिल्याने वजन कमी होत नसून उलट ते वाढण्याची दाट शक्यता असते. जास्त वेळ उपाशी राहिल्याने त्याचा परिणाम मेटाबॉलिसमवर होतो. आपली मेटाबॉलिक क्षमता कमी होते यामुळे आपल्या शरिराला कॅलरिज बर्न करण्यात अडचणी निर्माण होतात. तसचं जास्त वेळ उपाशी राहिल्यानंतर जेव्हा तुम्ही जेवता तेव्हा ते अनेकदा जास्त प्रमाणात खाल्ल जातं. त्यामुळे ठराविक तासांच्या अंतराने खाणं हे शरिरासाठी योग्य असतं.

योग्य प्रमाणात डाएट करा

वजन कमी करण्यासाठी डाएट करणं गरजेचं आहे. मात्र याचा अर्थ अगदी कमी आहार घेणं असा होत नाही. यासाठी जास्त तेलकट किंवा जंकफूट खाणं टाळलं पाहिजे. तुम्ही किती खाताय यापेक्षा तुम्ही काय खाताय यावर तुमचं वजन कमी होणं किंवा न होणं अवलंबून असतं.

योग्य तेल योग्य प्रमाणात वापरणं गरजेच

जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी डाएट करत आहात तर त्यात तुम्ही जेवणासाठी कोणत तेल वापरता हे देखील खूप महत्वाचं आहे. स्वयंपाकासाठी कोणतही ऱिफाइंड ऑइल वापरू नये. त्याएवजी तूप किंवा घाण्याचं शुद्ध तेल तसचं मोहरीचं तेल यांचा पर्याय निवडावा. याशिवाय स्वयंपाक हा अगदी कमी तेलातील असेल याची काळजी घ्यावी. 

हे देखिल वाचा-

अशी असावी वेटलॉस थाळी

कमी आहार घेऊनही वजन कमी न होण्यासाठी अनेकदा चुकीच्या पद्धतीचा आहार कारणीभूत ठरतो. आहार घेताना त्यात किती प्रोटीनची मात्र असावी? कार्बच्या पदार्थांचं किती प्रमाणात सेवन कराव? असे अनेक घटक महत्वाचे ठरतात. weight loss thali 

- तुमच्या थाळीचे चार भाग करा.

- यातील पहिल्या भागात वेज किंवा नॉव्हेज प्रोटीन सोर्स हवा. म्हणजेच डाळ, कडधान्याची आमटी किंवा चिकन, अंडाकरी इं.

- तर दुसऱ्या भागात कोणतीही भाजी तुम्ही घेऊ शकता. यामुळे तुम्हाला प्रोटीन आणि फायबर दोन्ही मिळेल.

- तर तिसऱ्या भागात कार्ब असावेत. म्हणजेच याच तुम्ही पोळी, भात किंवा भाकरी घेऊ शकता.

- चौथ्या भागात भरपूर प्रमाणात सलाड घ्या. ज्यामुळे तुम्हाला भरपूर प्रमाणात फायबर मिळण्यास मदत होईल.

- आहारात फॅबरयुक्त पदार्थांचं अधिक सेवन करणं वजन  कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. यात कॅलरीजचं प्रमाण अगदी कमी असतं. तर फायबरमुळे पोटही भरलेलं राहतं नाही सारखी भूक लागत नाही. 

- वजन कमी करण्यासाठी अनेक जण कमी जेवतात. मात्र यात प्रोटीनयुक्त पदार्थांचं देखील सेवन कमी केलं जातं. असं न करता कार्बचं प्रमाण कमी करून म्हणजेच भात किंवा चपाती प्रोटीन पुरेस असेल हे पहावं. यासाठी वाटीभर डाळ आणि भरपूर प्रमाणात भाज्या खा.

वजन कमी करण्यासाठी कमी खाण्यापेक्षा योग्य प्रमाणात आहार घेणं अधिक गरजेच आहे. अनेकजण कमी जेवतात मात्र त्या जेवणातील पदार्थांची निवड चुकीची असेल तर वजन कमी होण्याएवजी ते वाढू शकतं. वजन कमी करण्यासाठी आहारात सॅच्युरेटेड  फॅट आणि ट्रान्सफॅटचं सेवन अजिबात करू नये. तसचं भरपूर पाणी प्यावे, दिवसातून किमान ३ लिटर पाणी पिणे गरजेचं आहे. 

व्यायाम गरजेचा

केवळ कमी आहार घेऊन वजन कमी होत नाही. यासाठी आठवड्यातून ३-४ दिवस ३०-४० मिनिटे व्यायाम करणं गरजेचं आहे. त्याचसोबत तुमची शारीरिक हालचाल कमी असेल तर दररोज किमान ३० मिनिट चालणं फायदेशीर ठरू शकतं. त्यामुळेच जर तुम्ही योग्य पद्धतीने आहार येऊन त्याला व्यायामाची जोड दिल्यास पोटभर खाऊनही वजन कमी करणं शक्य आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूर आणि स्नेहा दुबेंमध्ये काट्याची टक्कर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Maharashtra Assembly 2024 Result : फडणवीस की पटोले; ठाकरे की शिंदे; काका की पुतण्या? इथे पाहा सर्वांत वेगवान आणि अचूक निकाल LIVE Video

SCROLL FOR NEXT