Harmons and Physical Changes Sakal
health-fitness-wellness

घडण-मंत्र : हॉर्मोन्स आणि शारीरिक बदल

एका विशिष्ट वयात आपल्या मुलांमध्ये खूप वेगाने बदल घडतात. शारीरिक वाढ वेगाने होते आणि लैंगिक वाढसुद्धा होते.

सकाळ वृत्तसेवा

एका विशिष्ट वयात आपल्या मुलांमध्ये खूप वेगाने बदल घडतात. शारीरिक वाढ वेगाने होते आणि लैंगिक वाढसुद्धा होते.

- डॉ. भूषण शुक्ल

एका विशिष्ट वयात आपल्या मुलांमध्ये खूप वेगाने बदल घडतात. शारीरिक वाढ वेगाने होते आणि लैंगिक वाढसुद्धा होते. मुलांना दाढी-मिशा उगवणे, मुलींची पाळी सुरू होणे. दोन्ही गटात शारीरिक बदल होऊन त्यांचे शरीर हे पूर्ण वाढीच्या दिशेने वेगाने जाणे, हे दोन तीन वर्षाच्या काळात वेगाने होते हे आपण बघतो.

काही मुलामुलींच्या बाबतीत हे बदल खूप लवकर, म्हणजे १०-११ वर्षातच घडतात तर काहींचे शरीर निवांत १६-१७ वर्षे होईपर्यंत वाट बघते. दोन्ही गटांत पालकांना आणि त्या मुला-मुलींनासुद्धा खूप काळजी वाटते, ते साहजिकच आहे. आपले डॉक्टर या बाबतीत काळजी असल्यास योग्य तो सल्ला देतीलच. या शारीरिक बदलांबरोबर मोठ्या प्रमाणात मानसिक बदल घडतात. अनेक घरांमध्ये हे बदल खूप संघर्ष घडवून आणतात.

पौगंडावस्था व संघर्ष

या पौगंडावस्थेत मुलांचे आपल्या कुटुंबावरचे लक्ष कमी होऊन घराबाहेरच्या जगावर लक्ष वाढते. मित्रमंडळी खूप महत्त्वाची बनतात. त्यांची मते, त्यांचा संपर्क सारखा हवाहवासा वाटतो. समवयस्क मंडळींच्या नजरेत आपण कसे दिसतो आणि ते आपल्याशी कसे वागतात हे फार महत्त्वाचे होते आणि त्यात होणारी चढ-उतार ही मानसिक स्वास्थ्य बिघडवून टाकू शकते. विशेषतः मुलींच्या बाबतीत ही मैत्रिणींची नाती खूप मोठी वाटतात आणि त्या गटांची भांडणे, मतभेद, रुसवे-फुगवे याशिवाय दुसरे काही जणू महत्त्वाचे नाही असा समज होतो.

प्रेमात पडणे आणि टोकाचे आकर्षण निर्माण होणे हा सुद्धा या वयाचाच गुणधर्म. मुलांच्या शरीरात, मनात आणि सामाजिक आयुष्यात अशी सर्व उलथापालथ होत असताना पालकांना वेगळी काळजी असते. आठवी ते बारावी ही शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाची वर्षे. या चार-पाच वर्षात अभ्यासात जोर लावला नाही तर आपले मूल कायमचे मागे पडणार अशी भीती पालकांना असते. आणि तीसुद्धा रास्तच आहे. ‘‘आम्ही तुझ्या भल्यासाठीच हे सगळे सांगतो आहे,’’ विरुद्ध ‘‘तुम्हाला काही कळत नाही. जग किती बदलले आहे ते तुम्हाला समजत नाही,’’ असा दोन पिढ्यांचा संघर्ष उभा राहतो.

वागणुकीत बदल

मुलांना या वयात आदर्श वाटणाऱ्या व्यक्ती म्हणजे - खेळाडू, अतिश्रीमंत उद्योगपती, पडद्यावरचे कलाकार, सोशल मीडिया स्टार्स आणि यू-ट्यूब तारे. त्यांचे राहणीमान, सवयी, कपडेलत्ते, लकबी सगळ्याच लोभस आणि हव्या हव्याशा वाटणाऱ्या. ‘मला सुद्धा असेच व्हायचे आहे,’ असा अट्टहास सुद्धा. पालकांना या सर्व गोष्टी डोळ्यासमोर सुरू झाल्या, की पायाखालची जमीनच सरकल्यासारखे वाटते. हे मूल काय बोलते आहे, कशाच्या मागे पळत आहे, याचे काय होणार, अशी चिंता सुरु होते. दोन वर्षापूर्वी सालस आणि गोड असलेले आपले मूल एकदम काय भूत झाले आहे, हा धक्का अवघड असतो. शिवाय या सर्व उद्योगात अभ्यासाकडे लक्ष कमी झाले तर एक वेगळीच धार येते. दिसण्यावर, कपड्यांवर इतका भर देणारी मुले घरात मात्र उकिरडा करतात. कमालीचा गलिच्छपणा दाखवतात. हा सर्व त्या वाढत्या वयाचा गुण असतो, पण नीटनेटक्या आई-वडिलांना त्याची किळस आणि टोकाचा राग येतो.

अशा कात्रीत सापडलेली नाती अनेकदा डॉक्टरांकडे पोहोचतात. ‘जरा हॉर्मोन्स तपासून बघा,’ असा काळजीयुक्त आग्रह होतो. पण अशा तपासण्याचा आग्रह करणे म्हणजे पैसे वाया घालवणे आणि सामाजिक परिवर्तनाचे उगाच वैद्यकीकरण आहे. नात्यांचा हा गुंता तोडफोड न करता कसा सोडवायचा ते पुढच्या लेखात बघुया.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Vidhansabha: विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचा 'कलरकोड' प्लॅन, जाणून घ्या आतल्या गोटातील बातमी

Swiggy IPO: स्विगीचा 11,327 कोटी रुपयांचा IPO उघडला; गुंतवणूक करावी का? काय आहे तज्ज्ञांचे मत?

Latest Marathi News Updates live : पुण्यात मित्र पक्षाला एकत्र घेत महायुतीची रणनीती ठरली

IPL Mega Auction 2025: ऋषभ पंत, श्रेयस अय्यर यांच्यासह २३ भारतीय खेळाडू २ कोटींच्या ब्रॅकेटमध्ये; कोणाला हाय डिमांड?

Raj Thackeray: मुंबईत मनसे फॅक्टर ठरणार निर्णायक; बदललेली भूमिका वाढवतेय महायुतीची डोकेदुखी

SCROLL FOR NEXT