सणाचा आहार हा ऊर्जा आणि मूड झटपट चांगला ठेवण्याचा एक सोपा, निरोगी आणि अल्पकालीन मार्ग आहे.
- डॉ. रोहिणी पाटील
सणाचा आहार हा ऊर्जा आणि मूड झटपट चांगला ठेवण्याचा एक सोपा, निरोगी आणि अल्पकालीन मार्ग आहे. सणासुदीच्या काळात बहुतेक लोक काम आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त असतात. यामुळे जंक फूडचा समावेश नसलेल्या खाण्याच्या सवयी राखणे कठीण होऊ शकते.
सणासुदीच्या काळात काटेकोर डाएटचे पालन करण्याऐवजी, या सणाच्या आहाराचा आपल्या दैनंदिन दिनक्रमात समावेश करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही असे केल्यास तुमच्या आवडत्या सर्व पदार्थांचा आनंद घेत तुम्ही वजन कमी करू शकाल!
पहाटे
१ ग्लास बार्ली पाणी + १ टीस्पून ऍप्पल सायडर व्हिनेगर + १ टीस्पून हळद + ५ भिजवलेले बदाम + ५ भिजवलेले अक्रोड
नाश्ता
तुपात शिजवलेले २ अंड्याचं ऑम्लेट + १ वाटी कोणतीही हंगामी ताजी फळे
सकाळी १०-११
१ ग्लास सेलरी रसामध्ये लिंबू आणि मिरपूड घालून प्या
दुपारचे जेवण
१ वाटी ब्रोकोली सूप + १ वाटी ग्रील्ड टोफू/पनीर + कच्ची काकडी, गाजर, मुळा, टोमॅटो आणि कांदा
स्नॅक्स
१ लहान वाटीभरून बिया (भोपळा, अंबाडी, सूर्यफूल, चिया, टरबूज) + १ कप नारळ कॉफी
रात्रीचे जेवण
१ वाटी शिजवलेले स्प्राउट्स (मटकी/चवळी /काळे चणे) मशरूम आणि कोशिंबीर
झोपण्यापूर्वी
१ ग्लास बार्ली पाणी + १ टीस्पून ऍप्पल सायडर व्हिनेगर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.