method of eating sakal
health-fitness-wellness

Healthy Diet : जेवण्याची पद्धत, खाण्याची कला!

जेवण हे फक्त तुम्ही काय खाता त्याबद्दल नसते. तुम्ही काय खात आहात हे महत्त्वाचे आहेच, परंतु तुम्ही कसे खाता हे अधिक महत्त्वाचे आहे.

सकाळ वृत्तसेवा

जेवण हे फक्त तुम्ही काय खाता त्याबद्दल नसते. तुम्ही काय खात आहात हे महत्त्वाचे आहेच, परंतु तुम्ही कसे खाता हे अधिक महत्त्वाचे आहे.

- डॉ. रोहिणी पाटील

जेवण हे फक्त तुम्ही काय खाता त्याबद्दल नसते. तुम्ही काय खात आहात हे महत्त्वाचे आहेच, परंतु तुम्ही कसे खाता हे अधिक महत्त्वाचे आहे. जेवण करणे ही एक कला आहे, एक शिस्त आहे, एक विज्ञान आहे, अगदी अनेक घटकांसह बनलेले एक फ्रेमवर्क आहे, जे तुमचे शरीर आणि मन कसे प्रक्रिया करते आणि तुम्ही जे खाता ते शरीर कसे शोषून घेते यावर प्रभाव टाकतात.

कोणतेही अन्न पूर्णपणे वाईट किंवा पूर्णपणे चांगले नसते. फोन, टीव्ही, नेटफ्लिक्स न पाहता तुमचे अन्न खा. प्रत्येक जेवणापूर्वी ‘धन्यवाद’ म्हणा. प्रत्येक घास २५ ते ३० वेळा चावा. तुमच्या शरीरावर अन्नाचा उत्तम परिणाम होण्यासाठी जेवणानंतर देखील ‘धन्यवाद’ म्हणा.

अन्न चावण्याची कला

  • जेवणाला एक विधी म्हणून बघा. आपले अन्न चांगले चावणे ही या विधीतील सर्वात महत्त्वाची पायरी आहे.

  • खाण्याच्या विधीबद्दल बोलायचे झाल्यास, सामान्यतः 3 प्रकारचे लोक असतात, जे पटकन खातात आणि तोंडातला घास जेमतेम चावतात, जे मध्यम गतीने खातात आणि घास चांगल्या पद्धतीने चावतात आणि जे खूप हळू खातात.

  • एखादी व्यक्ती खूप जलद खात असेल, तर त्याच्या पोटावर नेहमीच ताण येतो. जे काम मजबूत दातांनी व्हायला हवे होते ते मऊ आतड्याला करावे लागते. जेव्हा तुमच्या पोटाला अन्नाचा मोठा भाग पचवावा लागतो, तेव्हा न पचलेले तुकडे जास्त काळ त्यात राहतात. ते तुकडे पचवण्यासाठी तुमच्या शरीराने अधिक एन्झाईम्स तयार केले पाहिजेत. ज्यामुळे तुमच्या पोटातील वातावरण अत्यंत आम्लीय बनवते व तुम्हाला सुस्ती येते किंवा थकवा जाणवतो. न पचलेले अन्न शरीरात विषारी द्रव्ये निर्माण करतात आणि ते अपचन, मायग्रेन आणि जडपणाचे मुख्य कारण आहे. झोप तुम्हाला ताजेतवाने आणि टवटवीत करेल असे मानले जाते, परंतु जे लोक खूप जलद खातात त्यांना झोपून उठल्यावर ही थकवा जाणवतो.

  • आपले अन्न चांगले चावून खाणे देखील सजग खाण्याच्या प्रक्रियेतील एक महत्त्वाची पायरी आहे. अन्न चांगले चावल्याने पोटाला अन्न पचवणे सोपे होतेच पण त्यासह अन्नातील अधिक पोषक द्रव्ये शोषण्यास देखील मदत होते. जेव्हा तुम्ही अन्न चावता तेव्हा लाळेतील एन्झाईम्स अन्नात मिसळतात. तुम्ही अन्न जितके जास्त चावता तितके जास्त एन्झाईम्स अन्नात मिसळतात. जेव्हा असे एन्झाईम्स-समृद्ध, चांगले चघळलेले अन्न तुमच्या पोटात जाते; तुमची सिस्टिम सहजतेने त्यावर प्रक्रिया करते.

‘माइंडफुलनेस’ची कला

1) खाणे ही एक कला आहे. आपल्यापैकी प्रत्येकजण त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने सराव करतो. एखादी व्यक्ती आनंदी, शांत आणि समाधानी असल्यास त्या व्यक्तीला खाल्लेल्या पदार्थांचे फायदे खूप वाढतात.

2) बहुतेक लोक आपल्या शरीराला गरजेपेक्षा जास्त खात आहेत हे समजून न घेता जास्त प्रमाणात खातात. तुम्हाला किती खाण्याची गरज आहे हे जाणून घेण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे मन लावून खाणे. तुमचे शरीर तुम्हाला सांगेल की ते पुरेसे आहे. आपल्या अन्नातील ऊर्जा शोषून घेण्यासाठी, आपले अन्न खाताना जागरूकता बाळगणे आवश्यक आहे.

3) तुम्ही कोणत्याही दिवशी या सिद्धांताची चाचणी घेऊ शकता. फक्त तुमच्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये तुमचे तुम्ही जा आणि जेवणाची ऑर्डर द्या. तुम्ही नेहमीपेक्षा कमी खाता. याचे कारण असे की तुम्ही जेवताना संभाषण करत नाही तुम्ही फक्त तुमच्या जेवणावर लक्ष केंद्रित करता, ज्यामुळे तुम्हाला अन्नातून सर्वाधिक फायदे मिळतात. आजच खाण्याच्या या पद्धती सुरू करा आणि तुम्हाला तुमच्या आरोग्यामध्ये आणि शरीरात फक्त २५ दिवसांत अद्‍भुत बदल दिसून येतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT