Dragon Fruit esakal
health-fitness-wellness

Dragon Fruit : 'या' गावातील 'ड्रॅगन फ्रुट'ची चवच न्यारी! आरोग्यासाठी लाभदायी अन् रिकाम्या पोटी खाल्ल्यास शरीरात होतात 'हे' बदल

विनायक जाधव

‘ड्रॅगन फ्रुट’ हे तसे विदेशी फळ आहे. डायटसाठी आणि पोषक घटकांसाठी म्हणून भारतीय त्याचा अधिक वापर करू लागले आहेत.

आरोग्य उत्तम राहावे, याकरिता बहुतांश जण डाएटमध्ये ‘ड्रॅगन फ्रुट’चा (Dragon Fruit) आवर्जून समावेश करतात. या फळामध्ये आरोग्यास (Health) पोषक असणाऱ्या कित्येक घटकांचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. त्यामुळे त्याची मागणी देखील वाढत आहे. ही शेतकऱ्यांना देखील लाभदायक ठरली असून, बेळगाव जिल्ह्यात कागवाडमध्ये ‘ड्रॅगन फ्रुट’ची शेती केली जाते. येथील भौगोलिक स्थिती आणि वातावरण लागवडीसाठी पोषक असल्याने ‘ड्रॅगन फ्रुट’ची चवच न्यारी ठरली आहे.

‘ड्रॅगन फ्रुट’ हे तसे विदेशी फळ आहे. डायटसाठी आणि पोषक घटकांसाठी म्हणून भारतीय त्याचा अधिक वापर करू लागले आहेत. ‘ड्रॅगन फ्रुट’मध्ये प्रोटीन, कार्ब्स, फायबर, लोह आणि मॅग्नेशियम (Magnesium) यांसारखे पोषक घटक आढळतात. शिवाय व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई यासारखे अँटी-ऑक्सिडंट्स देखील असतात. महत्त्वाचे म्हणजे यात फॅट्सचे प्रमाण खूप कमी आणि फायबरचे प्रमाण अधिक असते. यामुळेच वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी हे फळ खूप फायदेशीर आहे. ‘ड्रॅगन फ्रुट’ सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास शरीरास अनेक पोषक घटकांचा पुरवठा होतो.

जमिनीवर तसेच दुष्काळी भागात आणि कमी पाणी असलेल्या परिसरात हे पीक फायदेशीर ठरते. यातून चांगले आर्थिक उत्पादन मिळते म्हणून ड्रॅगन फ्रूट शेतीचा प्रयोग कागवाडमधील शेतकऱ्यांनी राबविला आहे. ज्याचा त्यांना चांगला फायदाही मिळाला आहे. ‘ड्रॅगन फ्रुट’ची वनस्पती मेक्सिकोच्या प्रदेशात आणि मध्य व दक्षिण अमेरिकेच्या इतर भागांमध्ये आहे. या फळाची लागवड भारतातील महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या राज्यांसह काही इतर राज्यांमध्येही केली जाते. त्यांनी या विशिष्ट फळाच्या शेतीवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. कर्नाटकात कागवाड येथे प्रामुख्याने हे पीक घेतले जाते.

‘ड्रॅगन फ्रुट’चा आरोग्यदायी आहारात समावेश केला जात आहे.‌ कारण ते शरीराला जीवनसत्त्वे, मौल्यवान खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स प्रदान करतात. त्यामुळे त्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. कालबाह्य होण्यापूर्वी या फळाचे शेल्फ लाईफ जास्त असते. त्यामुळे ते साठवले जाऊ शकते आणि बाजारात त्वरित नेले जाऊ शकते. ड्रॅगन फ्रूटचे उत्पादन आणि वापरासाठी वाढलेली मागणी लक्षात घेता, विशेषतः देशी आणि परदेशी बाजारपेठेत या फळाला चांगली मागणी असल्याने शेतकऱ्यांनी फळाच्या लागवडीवर भर दिला आहे. कागवाड येथील ड्रॅगन फ्रुटचे आणखी उत्पादन आणि लागवड क्षेत्र वाढविण्यासाठी सरकारकडून प्रयत्न होणे अपेक्षित आहे.

देश-विदेशात हे फळ पाठविण्यासाठी सरकारचे सहकार्य मिळणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना देखील यामुळे चांगला भाव मिळू शकतो. गावचे संपूर्ण अर्थकारण हे फळावर अवलंबून आहे. फळाच्या मुख्य हंगामामध्ये दर गडगडतो. त्यामुळे स्थिर आणि नियंत्रित दर हवेत. यासाठी सरकारकडून या ठिकाणी प्रयत्न होणे अपेक्षित आहेत. इतर पारंपरिक पिके घेऊन बदलत्या हवामानामुळे नेहमीच आर्थिक संकटात सापडलेल्या कागवाडमधील शेतकऱ्यांनी या फायदेशीर फळांच्या लागवडीवर भर दिला आहे. त्यामुळे त्यासाठी प्रोत्साहन देखील मिळणे आवश्यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT