मनुका मनुका
health-fitness-wellness

मनुकांमध्ये असतात औषधी गुण; हे आहेत फायदे आणि नुकसान

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : मनुका किंवा किशमिश हे फक्त खीर, शिरा, पुलावामध्ये स्वाद वाढवण्यापुरते वापरले जात नाही तर आयुर्वेदानुसार मनुकांमध्ये भरपूर मात्रेत औषधी गुण असतात. प्रत्येकाने रोज चार ते पाच मनुके खायलाच पाहिजे. मनुकांनी सर्दी-खोकला आणि कफ दूर करण्याचे सर्वांत उत्तम औषध मानले जाते. रोज मनुका खाल्ल्याने शरीरातील रक्ताभिसरण चांगले होते. हृदयविकाराचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी मनुकांचे सेवन करावे. मनुकांमध्ये कॅल्शिअम असते. त्यामुळे हाडं मजबूत होतात आणि जॉईंटपेनचा त्रास होत नाही.

झोपण्याच्या एक तास आधी उकळलेल्या दुधामधून मनुक्यांचे सेवन केल्यास पोटाशी संबंधित आजारांवर मात करता येते. खास करून बद्धकोष्ठतेवर हा उपाय करून पाहिल्यास नक्कीच फायदा होतो. यामुळे पचनक्रियाही सुधारते. मनुक्यामधील बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करण्याची क्षमता असते. त्यामुळेच ताप आल्यावर मनुके खावेत. ताप लवकर उतरण्यासाठी मनुक्याचे सेवन करणे फायद्याचे ठरते.

मनुका शरीरातील कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण मर्यादित ठेवण्यास मदत करते. मूठभर मनुका खाऊन त्यावर पाणी प्यायल्याने शरीरात ऊर्जा निर्माण करण्याचे काम मनुका करते. अशक्तपणा, ॲनिमियासारख्या आजारांवर मनुका गुणकारी आहेत. वजन वाढवण्यासाठी रोजच्या आहारात मूठभर मनुक्यांचा समावेश करावा. मनुकांमुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.

बद्धकोष्ठता होते दूर

मनुके खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होते. यासाठी पाण्यात भिजवलेले मनुके खावे. तुम्हाला बद्धकोष्ठता, पित्त आणि थकवा येण्याची समस्या असेल तर मनुके खाणे खूप फायदेशीर ठरते. नियमितपणे मनुके खाल्ल्याने खूप लवकर फायदा दिसून येईल.

रक्ताचे प्रमाण वाढते

मनुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन बी असते. त्यामुळे मनुके खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरात रक्ताचे प्रमाण वाढते. मनुक्यामधील अँटिऑक्सिडेंट शरीरातील पेशींसाठी घातक असणाऱ्या फ्री रॅडिकल्सचे प्रमाण कमी करतात. यामुळे कॅन्सरपासून बचाव होतो.

हे आहेत फायदे

  • रक्तदाबाच्या समस्येवर फायदेशीर

  • ऊर्जा प्रदान करते

  • रक्त निर्मितीस मदत

  • सुक्या खोकल्यावर लाभदायी

  • बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होईल

  • पोट साफ होण्यास मदत

  • पोटफुगीची समस्या होते दूर

  • आम्लपित्त होते कमी

  • हिमोग्लोबिन व रक्त वाढवते

  • कॅन्सरला ठेवते दूर

  • हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त

  • डोळ्यांसाठी उपयुक्त

हे आहेत नुकसान

  • उलटी आणि डायरिया

  • हृदय रोग ग्रस्तांनी खाऊ नये

  • ॲलर्जीची समस्या

  • अतिसार होते

  • वजन वाढते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: कोल्हापूरमध्ये क्षीरसागर-पाटील समर्थकांत बाचाबाची

Sharad Pawar: हाय होल्टेज ड्रामा! मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून शरद पवारांच्या नेत्याला जबर मारहाण; व्हिडीओ व्हायरल

Shrinivas Pawar: "भाऊ अन् मुलगा यांच्यामध्ये मी शरद पवारांच्या बाजूने..."; श्रीनिवास पवारांचं मत, दादांना धक्का बसणार?

विकासाचे मारेकरी कोण अन् वारकरी कोण? मतदानाच्या दिवशी सूचक ट्विट; 'भाईं'नी चेंडू जनतेकडे पाठवला, काय म्हणाले?

व्हा सज्ज! Lionel Messi १४ वर्षांनंतर पुन्हा भारतात येतोय, अर्जेंटिनाच्या फुटबॉल संघाचा दौरा

SCROLL FOR NEXT