awala_20fal.j 
health-fitness-wellness

हृदय रोगापासून केस गळती कमी करण्यापर्यंत, जाणून घ्या आवळ्याचे फायदे

सकाळन्यूजनेटवर्क

सर्दीच्या दिवसांमध्ये लोकांकडे खाण्या-पिण्याचे अनेक पर्याय उपलब्ध असतात. मोसंबी, फळ-फाज्या केवळ चविष्ट नसतात तर पोषकही असतात. थंडीच्या दिवसामध्ये आवळ्याच्या सेवनाला खूप महत्व आहे. काही लोक याची चटनी बनवून, लोणचं बनवून किंवा वाळवून खातात. विटॅमिन सी आणि अँटी ऑक्सीडेंट्सने भरपूर असलेला आवळा सर्दींच्या दिवसांमध्ये होणाऱ्या अनेक आरोग्य समस्यांपासून आपल्याला दूर ठेवू शकतो. जाणून घ्या याचे फायदे-

व्हायरल फ्लूपासून बचाव- 
थंडीच्या दिवसांमध्ये फ्लू होण्याचा धोका असतो. आवळा विटॅमिन ए आणि सीचा चांगला स्रोत मानला जातो. यात पॉलीफेनॉल आणि फ्लेवनॉइड्स पुष्कळ प्रमाणात असते. आयुर्वेदातही आवळ्याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. असं म्हटलं जातं की याच्या सेवनाने शरीरात WBC (पांढऱ्या पेशी) ची संख्या वाढते. यामुळे आजार होण्यापासून बचाव होतो. 

हृद्य रोगाचा धोका कमी- 
आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की आवळ्याच्या सेवनाने हृदयाच्या मांसपेशी मजबूत होतात. त्यामुळे हृद्यासंबंधी आजार होण्याचा धोका कमी होतो. थंडीच्या दिवसाॆमध्ये हृद्याचा आजार असणाऱ्या रुग्णांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो. आवळा खाल्याने शरीरातील ब्लड फ्लो सुरळीत राहतो. कॉलेस्टोरॉलचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यातही आवळा महत्वाची भूमिका बजावतो. 

माझा फिटनेस : मन आणि शरीरात हवे आरोग्यदायी संतुलन!

हाय ब्लड शूगर राहते नियंत्रणात- 
आवळ्यामध्ये क्रोमियम असतो जो डायबिटीज रुग्णांसाठी फायदेशीर असते. एका शोधानुसार आवळा अँटी- हाइपरग्लाइसेमिक प्रक्रियेला चालना देतो, ज्याने शरीरातील ब्लड शूगरची लेव्हल नियंत्रणात राहते. 

त्वचेसाठी फायद्याचे- 
थंडीच्या दिवसामध्ये कोरडी त्वच्या अनेकांसाठी त्रासाची असते. अशात आवळा खाल्याने कोरड्या त्वचेची समस्या दूर होऊ शकते. यामध्ये अँटी-ऑक्सिडेंट आणि विटॅमिन सी असते, जे फ्री रेडिकल्सशी लढतात. यामुळे त्वचा खराब होण्याचा धोका कमी होतो आणि त्वचा तजेलदार दिसते. 

केळ गळती कमी होते- 
केसांसाठी आवळा खूप फायद्याचा आहे. भरपूर पोषण देण्याबरोबरच केसांना सुंदर ठेवण्यासाठी आवळा महत्वाचा आहे. याच्या वापरामुळे केस मजबूत होता आणि केस गळणे कमी होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivajinagar Assembly Election 2024 Result: सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी; सलग दुसऱ्यांदा आले निवडून

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT