Eating eggs every day will strengthen the body Sickness will stay away 
health-fitness-wellness

रोज अंडे खाल्ल्याने शरीर होईल बळकट; आजार राहतील दूर, जाणून घ्या अंडे का फंडा

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : सध्या कोरोनामुळे अख्खे जगच बदलले आहे. कोरोनापासून बचावासाठी आपले आरोग्य सृदृढ राहावे यासाठी सर्व जण प्रयत्नशील आहेत. आपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची, याचाच अनेक जण विचार करतात. फास्टफूड सोडून आरोग्यवर्धक खाण्याकडे नागरिकांचा कल आहे. त्यामुळे शरीराला बळकटी प्रदान करणारी अंडी खाण्याकडे कल वाढला आहे. काही दिवसांत हिवाळा सुरू होत असल्याने आरोग्यवर्धक अंड्यांना मागणी वाढली आहे. जाणून घेऊया गुणकारी अंड्याविषयी...     

कोंबडी आधी की अंडे आणि अंडी शाकाहारी की मांसाहारी हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. अनेक जण अंड्याची चटणी, ऑमलेट, फ्राय, अंडा बिर्याणी इत्यादी पदार्थ आवडीने खातात. मात्र, याव्यतिरिक्त उकडलेल्या अंड्याचे सेवन करणेसुद्धा आरोग्यासाठी फायदेशीर आहे, हे फार कमी लोक जाणतात. अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात.  तसेच अंड्यामधील अमिनो अॅसिड शरीराला ऊर्जा देण्याचे कार्य करते. अंड्यातील प्रथिने आणि अमिनो अॅसिडव्यतिरिक्त इतर पोषक घटकसुद्धा शरीरासाठी फायदेशीर ठरतात. रोज सकाळी नाश्त्यामध्ये दोन अंड्यांचे सेवन केल्यास शरीराला जास्त फायदा होतो. 

अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फरस आणि ‘ड’ जीवनसत्व असते. या घटकांमुळे शरीरातील हाडं मजबूत होण्यास मदत होते. हाडांना दिवसेंदिवस मजबूत बनवायचे असल्यास त्यासाठी नियमितपणे अंड्याचे सेवन केल्यास चांगला फायदा मिळतो. दररोज दोन अंड्यांचे सेवन शरीरातील अपायकारक कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे काम करते. यामुळे शरीरासाठी चांगले ठरणाऱ्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढीस लागून हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. हृदयासंदर्भातील आजार असणाऱ्या व्यक्तीने नियमित अंड्यांचे सेवन केल्यास अशा आजारांपासून सुटका मिळण्यास मदत होते.

नियमित सेवनाने अॅनिमियासारखे विकार नष्ट

शरीरात रक्तवाढ करावयाची झाल्यास अंड्यांचे सेवन उत्तम आहे. शारीरिक कमजोरी किंवा रक्ताच्या कमतरतेमुळे उद्भवणारे अॅनिमियासारखे विकार अंड्याच्या सेवनाने नष्ट होऊ शकतात किंवा त्यांची तीव्रता कमी होऊ शकते. संडे असो वा मंडे, रोज खा अंडे! अशी जाहिरात केली जाते. मात्र, आपण किती अंडी खातो याचा विचार केला पाहिजे. अंडी शरीरासाठी अधिक ऊर्जा देणारा घटक आहे. तुम्हाला तंदुरुस्त राहण्यासाठी वर्षभरात किमात १८० अंडी खाण्याची आवश्यकता आहे. म्हणजेच महिन्याकाठी  १५ अंडी पोटात जाणे आवश्यक आहेत.

बहुगुणी उकडलेले अंडे 

उकडलेल्या अंड्यामध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन ए, डी, बी-६, बी-१२ असे घटक असतात. हे सर्व पोषक घटक शरीरासाठी ऊर्जा प्रदान करतात. उकडलेली अंडी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. रोजच्या श्रमाने आपल्या हाडांची झीज होते. उकडलेले अंडे खाल्ल्याने ही झीज भरून निघते. उकडलेले अंडे खाल्याने अंड्यामधील घटकामुळे त्वचा तजेलदार होण्यास मदत मिळते. उकडलेल्या अंड्यामध्ये व्हिटॅमिन ए असते जे केसांना मजबूत करते आणि डोळ्यांसाठी चांगले असते. आहारात उकडलेल्या अंड्याचा वापर केल्यास त्यातून भरपूर प्रथिने मिळतात. उकडलेल्या अंड्यातील पिवळ्या बलकामध्ये व्हिटॅमिन डी असते, जे हाडे मजबूत बनवते तसेच शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. गर्भवती महिलांनी त्यांच्या आहारात उकडलेल्या अंड्याचा समावेश करू शकता. परंतु ज्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयरोग आहे त्यांनी अंड्याचा पिवळा भाग खाऊ नये. कारण त्यामध्ये कोलोस्ट्रोलचे प्रमाण जास्त असते.

संकलन-संपादन  : अतुल मांगे  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: धंगेकरांवर रासने यांनी घेतली आघाडी, तिसऱ्या फेरी अखेर कसब्यात उलटफेर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंना फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT