Indian Meal 
health-fitness-wellness

गडबडीत जेवण उरकण्याची सवय आहे धोकादायक; अनेक व्याधींना अकारण निमंत्रण

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : अनेकदा आपण गडबडीमध्ये फटाफट जेवण संपवण्याच्या नादात असतो. कामाच्या ताणामुळे जेवणालाही वेळ न मिळण्याइतपत लोक स्वत:ला व्यस्त बनवतात. त्यामुळे लोक 5 ते 10 मिनिटांतच जेवण उरकून टाकतात. मात्र, तुम्हाला हे माहितीय का, की नीट शांतपणे आणि चावून जेवण न केल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. तुम्हीही जर हाच प्रकार करत असाल तर हे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. हो, जर आपण अन्न नीट चावून नाही खाल्लं तर आपल्या शरीरावर त्याचा नकारात्मक प्रभाव पडतो. अन्नाला योग्यप्रकारे न खाल्ल्याने पचन प्रक्रियेमध्ये गडबड निर्माण होऊ शकते. ही समस्या पुढे जाऊन मोठं गंभीर रुप धारण करु शकते. गडबडीमध्ये जेवण उरकण्याने आपले हार्मोन्स बाधित होऊ शकतात. त्यामुळे आपली भूक किती आहे हे समजून घेण्यामध्ये आपलं शरीर कमकुवत होऊ शकतं. त्यामुळे आपण आवश्यकतेपेक्षा अधिक अन्नाचे सेवन करु लागतो. 

डायबेटीजचा धोका 
लवकर लवकर गडबडीत भोजन उरकण्याने इंश्यूलिन प्रतिरोधामध्ये वाढ होते. अशा परिस्थितीत ज्या लोकांना डायबेटीज नसतो त्यांनी जर लवकर लवकर जेवण उरकलं तर त्यांच्यामध्ये डायबेटीजचा धोका अधिक असतो. त्यामुळेच जेवण करताना ते शांतपणे आणि गडबड न करता खावं.

पचन प्रक्रियेत गडबड
लवकर लवकर जेवण करण्याने आपण अपचन, पोटदुखी, पोटात जळजळ अशा समस्यांनी त्रासू शकता. यामुळे पचन प्रक्रियेत गडबड तर होतेच  शिवाय पोटाच्या इतर व्याधी सुद्धा आपल्याला होऊ शकतात. जर आपण लवकर लवकर व्यवस्थित न चावता अन्न खात असाल तर वेळीच सावध व्हा आणि हा प्रकार बंद करुन सावकाशपणे अन्न सेवन करण्यास सुरवात करा. तशी सवय स्वत:ला लावून घ्या. अन्नाला चावून  आणि हळू हळू खाल्ल्याने मेटाबॉलिझम दरामध्ये वाढ होते, त्यामुळे आपली पचन प्रक्रिया अत्यंत सुस्थितीत राहते. 

छातीत जळजळ
लवकर लवकर अन्न सेवन केल्याने हार्ट बर्न अर्थात छातीत जळजळीसारखी समस्या उद्भवू शकते. तुम्ही या समस्येला छोटी समस्या म्हणून दुर्लक्ष करता. मात्र, आपल्याला हे माहिती हवं की, ही समस्या पुढे जाऊन मोठं रौद्ररुप धारण करु शकते. 

लवकर जेवण करणं होऊ शकतं भयावह
लवकर जेवण उरकल्याने अनेकदा खाद्य पदार्थ श्वास नलीकेमध्ये अडकू शकतात. आपलं हे छोटसं बेजबाबदार वर्तन अगदी लवकर मृत्यूस देखील कारण बनू शकतं. यासाठी जेवताना विशेष काळजी घ्या आणि व्यवस्थित सावकाशपणे, शांतपणेच अन्नाचे सेवन करा. 

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: 'ईडीपासून मुक्ती मिळावी, यासाठी भाजपसोबत गेलो' भुजबळांचा खुलासा; राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात दावा

निवडणुकीत मोलाची कामगिरी; Donald Trump यांचं 'त्या' महिलेला मोठं बक्षीस, White House Chief of Staff म्हणून नियुक्ती

Gold Price Today: गुंतवणुकीची सुवर्ण संधी! सोने 2000 रुपयांनी झाले स्वस्त; भावात मोठी घसरण का झाली?

Latest Maharashtra News Updates : नाशिकमध्ये आज पंतप्रधान मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी तब्बल 1 लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन

आज Narendra Modi यांचा महाराष्ट्र दौरा, 'या' दोन जिल्ह्यात तोफ धडाडणार, जाहीर सभांचं आयोजन

SCROLL FOR NEXT