food  
health-fitness-wellness

ग्रुपबरोबर एकत्र खाल्ल्याने वाढते वजन, अभ्यासातील निष्कर्ष

कॅनडाच्या शास्त्रज्ञांनी 719 लोकांचा अभ्यास केला

सकाळ डिजिटल टीम

एक तीळ सात जणांत वाटून खावा म्हणतात. तसे आपल्याला घरातल्या मोठ्यांनी शिकवलेले असते. आपण शाळेत, ऑफिमध्ये जेवणाचा डबाही (Food) मित्र-मैत्रीणींसोबत वाटून खातो. पण असे केल्याने वजन वाढण्याची (Weight Gain) शक्यता असते. कॅनडाच्या शास्त्रज्ञांनी एका अभ्यासात हा दावा केला आहे.

इतरांसोबत अन्न शेअर करताना, लोकांना आपले वजन वाढणार नाही असे वाटते. कारण ते इतरांबरोबर खात असतात. याबाबत, कॅनेडियन शास्त्रज्ञ नखेत टेलर आणि थिओडोर नोजवर्डी यांनी सांगितले की, त्यांच्या निष्कर्षांवरून असे दिसून आले की रेस्टॉरंटमध्ये चिप्स किंवा इतर स्नॅकचे पदार्थ हे कुटुंब किंवा मित्रांसोबत शेअर केल्याने जास्त कॅलरी खाल्ल्या जाऊ शकतात. त्यामुळे अशाप्रकारे अन्नातून वाढणाऱ्या वजनाकडे दुर्लक्ष होते. पर्यायाने आरोग्यावर (Health) परिणाम होतो.

टेलरने सांगितले की, जेव्हा आपण आपल्या समोर प्लेटमध्ये अन्न (Food) ठेवतो तेव्हा आपण किती कॅलरीज वापरतो हे आपल्याला चांगले माहित असते. परंतु त्या कॅलरीजमुळे आपले वजन वाढणार नाही असे आपल्याला वाटते. जेव्हा इतरांबरोबर अन्न खाता, तेव्हा तुम्हाला वाटते की, ही प्लॅट फक्त आमचीच नाही, इतर लोकही त्यातून खातात. त्यामुळे सगळे त्या प्लॅटमधील पदार्थांचा आस्वाद घेत असल्याने वजन वाढणार नाही, असे वाटून जाते. ही विचारसरणी वजन नियंत्रणासाठी समस्या असू शकते, कारण जेव्हा आपण इतरांसोबत शेअर करून खातो -पितो तेव्हा अधिक कॅलरी वापरतो.

७१९ लोकांवर प्रयोग (Study Result)

या दोघा शास्त्रज्ञांनी संशोधनासाछी ७१९ लोकांवर प्रयोग केले. एका प्रयोगात, त्यांना आढळले की एका मित्रासोबत एकाच प्लेटमधील चिप्स खाल्ल्याने वेगवेगळ्या प्लेट्समध्ये चिप्स खाण्यापेक्षा 15 टक्के कमी वजन वाढते. तर केवळ चिप्स खाल्ल्याने वजन १८ टक्के कमी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज्यात मतमोजणीला सुरवात

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT