सकाळी घरातले काम करून ऑफिसमधे आल्यावर उत्साहाच्या भरात तुमच्याकडून चांगले काम केले जाते. पण जेवण झालं (After Lunch) की तुम्हाला झोप (Sleep) यायला लागते. अनेकजण तर जेवणानंतर जांभया द्यायला लागतात. त्यांना कामावर लक्ष देणे कठीण होऊन बसते. कधीतरी अनावर झाले की डेस्कवर (Work Desk) डोकं ठेवून झोपले तरी शांत वाटते. मोठमोठ्या कंपन्यांमध्ये तर लोकं अर्धा -एक तास स्पेशल स्लीप रूममध्ये ताणून देतात.
तुमची झोप अपुरी झाली असेल तर तुम्हाला दुपारी १ ते ३ दरम्यान झोप येऊ शकते. किंवा बदलत्या हार्मोन्सच्या पातळीचा तो परिणाम असतो. अशावेळी ही झोप उडवणे फार गरजेचे असते. नुसते तोंडावर पाणी मारून काही उपयोग नसतो. अशावेळी काही गोष्टी केल्यास तुम्ही दुपारची झोप नक्की टाळू शकता.
स्ट्रेचिंग (Stretching)
एका अहवालानुसार. "स्ट्रेचिंग करताना, रक्त तुमच्या मेंदू आणि शरीराच्या स्नायूंमध्ये सक्रियपणे फिरते. त्यामुळे तुम्ही , तणावमुक्त(Stress Free) होता. तुम्हाला पुढे काम करण्यासाठी उत्साह वाढतो. अशावेळी साधी बॉडी स्ट्रेचिंग केल्याने तुमच्यातली उर्जा वाढू शकते. तुम्ही मान गोल फिरवणे, खांदे वर खाली करणे किंवा दोन्ही बाजूंनी पाठ वळवून बॉडी स्ट्रेच करू शकता. तुमच्याकडे जर वेगळी जागा असेल तर तिथे जाऊन तुमचे ग्लूट्स, क्वाड्रिसेप्स, हॅमस्ट्रिंग आणि लोअर बॅकला अधिक स्ट्रेच देऊ शकता. यामुळे तुम्हाला अधिक ताजेतवाने वाटेल.
डेस्कवरच सक्रीय राहा (Active workstation)
सतत बसून काम केल्याने तुमच्या अंगात सुस्ती येते. तसेच वजनही वाढण्याची शक्यता असते. झोप (Sleep) येते ती वेगळीच. अशा अनेक समस्या एकाच जागी बसून काम केल्याने येत असल्याने हे टाळण्यासाठी तज्ज्ञ प्रत्येक तासाला सुमारे 15 मिनिटे तुमच्या डेस्कवरच उभे राहण्याचा सल्ला देतात. कॅनडातील ओंटारियो येथील वॉटरलू विद्यापीठातील संशोधनानुसार, असे उभे राहण्याचे काय फायदे आहेत, ते पाहण्यासाठी तुम्हाला ३० मिनिटांपेक्षा जास्त उभे राहावे लागेल.. दुपारच्या झोपेवर मात करण्यासाठी, काही मिनिटे देखील उपयुक्त आहेत. चालणे किंवा बाईक डेस्कमुळेही तुम्हाला गती मिळू शकते, यामुळे हृदयाची गती वाढून तुमचा थकवा दूर झाल्याने तुमच्यात एनर्जी येऊ शकते.
बाहेर जा (Walk With Friends)
बाहेर गेल्याने तुमचा मूड सुधारू शकतो. तुमचा कंटाळा आणि थकवा दूर पळतो. म्हणून दुपारच्या वेळी १५-२० मिनिटं बाहेर फिरून आलात तरी तुम्हाला ताजेतवाने वाटेल. तुम्ही एकटे फिरण्यापेक्षा कलिग्जबरोबर फिरलात तर तुमच्यातल्या वेगळ्या चर्चेनेही तुम्हाला बरं वाटून पुढील काम करण्यास तुम्हाला उत्साह मिळेल. बाहेर गेल्याने मिळणारा सूर्यप्रकाश सेरोटोनिनाची पातळी वाढवतो. त्यामुळे तुम्ही अधिक उत्साही, आनंदी, शांत होता. झोप गेल्याने तुम्ही पुढे तुमच्या कामावर लक्ष केंद्रीत करू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.