5 Homemade Conditioners For Curly Hair esakal
health-fitness-wellness

Hair Conditioner : महागड्या कंडिशनर्सना करा बाय-बाय; आता घरच्या घरी बनवा नॅचरल हेअर कंडिशनर!

केसांच्या चांगल्या गुणवत्तेसाठी आणि गळती रोखण्यासाठी ‘हेअर कंडिशनर’ खूप महत्वाचं आहे.

सकाळ डिजिटल टीम

केसांच्या चांगल्या गुणवत्तेसाठी आणि गळती रोखण्यासाठी ‘हेअर कंडिशनर’ खूप महत्वाचं आहे.

5 Homemade Conditioners For Curly Hair : केसांच्या चांगल्या गुणवत्तेसाठी आणि गळती रोखण्यासाठी ‘हेअर कंडिशनर’ खूप महत्वाचं आहे. त्यामुळं केस धुतल्यानंतर कंडिशनर वापरतात. परंतु, बाजारात मिळणाऱ्या या महागड्या कंडिशनर्सचा प्रभाव केवळ काही काळ केसांवर राहतो. त्यानंतर ते पुन्हा खराब होऊ लागतात.

केस सॉफ्ट करण्यासाठी आपण सर्वचजण बाजारातील हेअर कंडिशनर वापरतो. पण, त्यात केमिकल्स असतात. जे तुमच्या केसांना हानी पोहोचवू शकतात. यासाठी तुम्ही घरच्या घरी नैसर्गिक हेअर कंडिशनर वापरू शकता. हे बनवतं सोपं आहे. तुम्ही या पाच पद्धतीनं घरी नॅचरल कंडिशनर बनवू शकता.

केळी दूध आणि मध

या पदार्थांपासून नाश्ता बनतो. पण, आपण नाश्ता बनवत नाही. तर हे पदार्थ तूमच्या कुरळ्या केसांना चांगल्या प्रकारे कंडिशनिंग करू शकतात. त्यामुळं केळ दूध आणि मधाचे एकत्र मिश्रण तयार करून ते केसांना लावा. या तयार कंडिशनरमध्ये जीवनसत्त्वे, पोटॅशियम आणि नैसर्गिक तेल असते. चांगल्या परिणामासाठी हे कंडिशनर तुमच्या केसांना लावून अर्धा तास ते एक तासासाठी ठेवा.

अंडी आणि एरंडेल तेल

हे नैसर्गिक कंडिशनर तुम्हाला तुमचे केस गळणे आणि रूक्ष केसांची काळजी घेण्यास मदत करते. एरंडेल तेल केसांच्या वाढीस मदत करते. तूमचे केस यामुळे घनदाट आणि चमकदार बनतात. अंड्यांमध्ये प्रथिने आणि अमिनो अॅसिड असतात, जे तुमच्या केसांचे नैसर्गिक तेल टिकवून ठेवतात आणि तुमचे केस चमकदार बनवतात.

दही आणि नारळाचे दूध

दही आणि नारळाच्या दुधापासून तयार केलेले कंडिशनर केसांना मुलायम आणि चमकदार बनवते. केसांच्या मुळांवर मॉइश्चरायझ करण्यातही मदत करते. दही आणि नारळाचे दूध एकत्र करून केसांना लावा. 45 मिनिटांनंतर केस स्वच्छ पाण्याने धुवा.

ऑर्गन तेल आणि व्हिटॅमिन ई

जर तुमचे केस जास्त प्रमाणात कुरळे असतील तर हे कंडिशनर तुमच्यासाठी परफेक्ट आहे. हा कॉम्बो तुमच्या केसांमधील ओलावा टिकवून ठेवतो. अर्गन ऑइल केसांचे तुटणे आणि केसांना फाटे फुटणे कमी करते. तर, व्हिटॅमिन ई तुमच्या केसांची मुळे मजबूत ठेवतात. हे तयार कंडिशनर तुम्ही स्प्रे बाटलीत साठवून ठेवू शकता. आंघोळीच्या आधी किंवा आंघोळीनंतर हे मिश्रण तुमच्या केसांवर स्प्रे करू शकता.

कोरफड आणि बदाम तेल

कोरफडमध्ये अनेक पोषक घटक आणि खनिजे असतात. जे केस मजबूत करण्यास मदत करतात. त्यामुळं कोरफड आणि बदाम तेलापासून बनलेले हे कंडिशनर केसांना चांगले पोषण देते. कोरफड जेल आणि बदामाचे तेल एकत्र करून केस धुण्याआधी ते केसांना लावा. 20 मिनिटांनंतर केस धुवून टाका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar यांच्यावर टीका का करत नाही? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'मी विचलित...'

Latest Maharashtra News Updates : पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Sovereign Gold Bond: सरकारी योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट

Maratha Reservation: सरकारमुळेच माझ्या मुलाचा जीव गेला; आरक्षणासाठी जीव देणाऱ्या प्रतिकच्या आईचा जरांगेंसमोर टाहो

A Unique Hat trick: ऑस्ट्रेलियन फिरकीपटूची अनोखी हॅटट्रिक; ३६ वर्षांपूर्वी कर्टनी वॉल्श यांनी केली होती अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT