नागपूर : केळी (banana) कोणत्याही हंगामातील सर्वोत्कृष्ट फळांपैकी एक मानली जाते. हे फळ आरोग्यासाठी एक रामबाण औषध आहे. पण, केळीच्या पानांच्या फायद्यांबद्दल (health benefits of banana leaves) तुम्हाला माहिती आहे काय? दक्षिण भारतात आजही बरेच लोक केळीच्या पानांवरच खाणे पसंत करतात. कारण केळीच्या पानांचे आरोग्यास अनेक फायदे आहेत. केळीची पाने औषधी गुणांनी समृद्ध असतात. प्राचीन काळापासून पाने आयुर्वेदात वापरली जात आहेत. केळीच्या पानांच्या फायद्यांविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (health benefits of banana leaves)
त्वचेसंबंधी समस्यांवर रामबाण उपाय -
उन्हाळ्यात आणि पावसाळ्याच्या दिवसात स्त्रियांमध्ये त्वचेच्या आणखी काही समस्या दिसून येतात. कधीकधी समस्या टाळण्यासाठी ते महागड्या क्रीम देखील वापरतात. अशा परिस्थितीत केळीची पाने त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यास मदत करू शकतात. केळीच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट्सचे गुणधर्म त्वचेवरील गडद डाग, सुरकुत्या आणि मुरुमांची समस्या दूर करण्यास मदत करतात.
तापासाठी फायदेशीर -
बदलत्या हंगामात कोणालाही ताप येणे ही सामान्य समस्या आहे. अशा परिस्थितीत केळीची पाने या समस्येवर मात करण्यास मदत करतात. त्यामध्ये उपस्थित अँटीऑक्सिडंट गुणधर्म शरीराचे तापमान द्रुतगतीने कमी करण्यास मदत करू शकतात. ताप आणि घसा खवखवणे यावर केळीचे पानं अगदी रामबाण उपाय आहे.
जखमा लवकर भरण्यास मदत -
जर शरीराच्या कोणत्याही भागावर कट किंवा जखम असतील तर केळीची पाने उपयुक्त ठरू शकतात. केळीच्या पानांपासून पेस्ट बनवून जखमेवर लावा. यामुळे वेदनेसह जखमा त्वरित बरे होण्यास मदत होऊ शकते. चिडचिड कमी करण्यात देखील मदत करू शकते. पाने जळजळ कमी करण्यास देखील मदत करतात. याशिवाय केळीची पाने केसांची समस्या दूर करण्यास तसेच वाढण्यासही मदत करतात.
वजन कमी करण्यात मदत -
चुकीच्या आहारामुळे वजन वाढल्याने प्रत्येकजण त्रस्त आहे. तुमचेही वजन वाढले असेल तर केळीची पाने तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. यासाठी केळीच्या पानांपासून तयार केलेला चहा किंवा काढा तुम्ही पिऊ शकता. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती देखील चांगली राहील.
(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.