health-fitness-wellness

ऑफिसमध्ये Night Shift करत असाल तर ही घ्या काळजी

सामान्यतः दिवसाची वेळ कामासाठी आणि रात्रीची वेळ शरीराला झोपण्यासाठी महत्वाची असते

सकाळ डिजिटल टीम

साधारणपणे सकाळी ९ ते ६ ही ऑफिसची वेळ असायची. पण ग्लोबलायझेशनमुळे अनेक परदेशी कंपन्यांनी भारतात आल्या. परिणामी नोकरीची वेळही बदली. सकाळ, दुपार, संध्याकाळ अशा तीन शिफ्टमध्ये कामं होऊ लागली. ते कमी की काय गेल्या काही काळापासून नाईट शिफ्टमध्येही काम करायला सुरूवात झाली आहे.

सामान्यतः दिवसाची वेळ कामासाठी आणि रात्रीची वेळ शरीराला झोपण्यासाठी महत्वाची असते. पण, विशिष्ट प्रकारच्या कामांसाठी लोकांना वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करावे लागते. डॉक्टर, परिचारिका, अग्निशामक, ड्रायव्हर, हवाई वाहतूक नियंत्रक आणि इतर काही अत्यावश्यक कामे असलेल्या लोकांना रात्री काम करावे लागते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रात्री काम करणे गरजेचे असले तरी आरोग्याच्या दृष्टीने त्यात अनेक आव्हाने असू शकतात. अभ्यासानुसारही रात्री काम करणे आरोग्याच्या दृष्टीने अयोग्य असल्याचे मानले जाते.

अनेक समस्यांचा धोका- नॅशनल स्लीप फाउंडेशनच्या मते, जे लोक रात्री शिफ्टमध्ये जास्त वेळ काम करतात त्यांना विविध समस्यांचा धोका निर्माण होतो. यातचयापचय समस्या, हृदयरोग, पचन समस्या, लठ्ठपणा तसेच कर्करोगाचा धोका वाढतो. रात्री काम करणाऱ्या लोकांना अनेकदा पुरेशी झोप मिळत नाही, त्यामुळे त्याचे दुष्परिणाम आरोग्यावर होतात. त्यामुळे काही काळजी घेणे गरजेचे आहे.

Sleeping

झोप पूर्ण करण्याचा प्रयत्न करा- रात्री झोप न मिळाल्याने थकवा आणि चिडचिडेपणा वाढतो. नाईट शिफ्ट करणाऱ्यांना अशा समस्या जास्त दिसून येतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रात्री जागरण केल्याने सर्कॅडियन रिदमवर परिणाम होतो, ज्यामुळे वर्तणूक तसेच शारीरिक समस्या उद्भवू शकतात. म्हणून काम सुरू करण्यापूर्वी एक लहान डुलकी घेऊ शकता.

food

आहारावर लक्ष ठेला- संशोधनानुसार जे कर्मचारी रात्री शिफ्टमध्ये काम करतात त्यांना मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोका जास्त असतो. तसेच अयोग्य आहार आणि झोपेत अडथळा आल्यामुळे लठ्ठपणाचा धोका 23 टक्क्यांनी वाढतो. अशा लोकांनी आहाराकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. सकस आणि पौष्टिक पदार्थ खाणे गरजेचे आहे. रात्री उशीरा खाण्याची सवय मोडावी.

Tea

खूप चहा, कॉफी पिऊ नका- रात्री जागण्यासाठी लोक अनेकदा कॉफी आणि चहा पितात. यामध्ये आढळणारे कॅफीन उत्तेजक असते, ते शरीर सक्रिय ठेवण्यास मदत करते. खूप जास्त कॅफीन शरीरावर नकारात्मक परिणाम करते. यामुळे अनेक समस्या निर्माण होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT