hair fall 
health-fitness-wellness

केस गळणे थांबवायचे असतील तर या टिप्स नक्की वाचा

सकाळ वृत्तसेवा

अनेक स्त्री-पुरुषांमध्ये केस गळण्याची समस्या दिसून येते. अगदी कमी वयात डोक्याची केसं गळू लागल्याने तरुण-तरुणींमध्ये न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. केस गळणे थांवण्यासाठी अनेक उपाय केले जातात. मोठमोठ्या ट्रिटमेंट करुन पैसा पाण्यासारखा खर्च केला जातो. मात्र, त्याचा काही फायदा झालेला दिसून येत नाही. मात्र, घरातल्या घरात काही साध्या गोष्टी केल्याने आपण केस गळणे थांबवू शकतो. 

केसं गळण्याची अनेक कारणे असू शकतात. होर्मोन्समध्ये बदल, योग्य आहाराचा अभाव, केस थांबवणे कमी करण्यासाठी केलेले  वेगवेगळे प्रयोग आणि बाजारातील वेगवेगळ्या तेलांचा जास्तीचा केलेला वापर यामुळे केस गळण्याची शक्यता असते. केस  गळण्याची समस्या सर्वसाधारण असेल तर काही उपायांनी आपण केस गळती थांबवू शकतो.

पुढील उपाय केल्याने केस गळती कमी केली जाऊ शकते...

-कांद्याचा रस करुन तो 10-15 मिनिटांसाठी डोक्याला लावा. अर्ध्या तासानंतर शाम्पूने आपले डोके धुऊन घ्या.

-आठवड्यातून किमान एकदा कोरफडाने डोक्याची मालिश करुन घ्या. त्यानंतर साध्या पाण्याने डोके धुऊन घ्या.

- कमकुवत केसांसाठी मेथी दाणे फायदेशीर ठरु शकतात. रात्री दोन चमचे मेथी दाणे पाण्यात भिजवत ठेवा. त्यानंतर सकाळी त्याचा लेप करुन डोक्याला लावा.

-ऑलिव्ह तेलाने डोक्याची मालिश करा. या तेलामुळे मुळातील कोरडेपणा नष्ट होऊन केस मजबूत होतात.

- भृंगराज तेलाने डोक्याची केलेली मालिश फायदेशीर ठरु शकते. भृंगराज तेलाने केसांची वाढ होण्यास मदत होते. 

- लिंबू केसांसाठी उपायकारक ठरु शकतो. लिंबू हलक्या हाताने कवटीवर रगडा, काही दिवसात फरक नक्की जाणवेल.

- अंडे केस गळणे थांबवण्यासाठी फायदेशीर ठरतात. अंड्यातील पांढऱ्या भागात दोन चमचे दही टाकून डोक्याला लावल्याने केस  मुलायम आणि मजबून बनतात.

भारत भारत भारत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kangana Ranaut: महाराष्ट्राचा निकाल लागताच कंगनानं उद्धव ठाकरेंना दैत्य संबोधलं! म्हटलं...

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: पहिला दिवस संपला! स्टार खेळाडूंनी भाव खाल्ला; अनेक खेळाडू झाले मालामाल

Nilesh Rane : आमदार होताच निलेश राणेंची धमकी, म्हणाले, ...तर त्याचा जागेवरच बंदोबस्त करु

IND vs AUS 1st Test: ४ बाद, १७ धावा! टीम इंडियाचा दरारा; ऑस्ट्रेलियात मोडला ११३ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम

Latest Maharashtra News Updates : हेमंत रासने यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

SCROLL FOR NEXT