कोल्हापूर - गेल्या वर्षभरापासून जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. दुसरीकडे प्रदुषणाने जगणे मुश्कील केले आहे. खासकरून ज्यांना श्वसनाचा त्रास आहे अशा व्यक्तींना तर हे खूप धोकादायक आहे.
हवामान बदलामुळे अनेक प्रकारचे आजार शरीरात घर करत आहेत. सर्दी, ताप, व्हायरल इन्फेक्शनसारखे अनेक आजार जडत आहेत. कोरोना आणि प्रदुषणापासून आपल्या फुफ्फुसाचे संरक्षण करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रतिकारशक्तीची खूप आवश्यकता असते. तर चला मग पाहूयात अशा धोकादायक वातावरणात आपले फपूस कसे मजबूत ठेवायचे याच्या काही टिप्स.
आले आणि तुळशीचे ओैषधी गुणधर्म फक्त आपली प्रतिकारशक्ती वाढवत नाहीत तर अनेक आजार बरे करते. आले आणि तुळशीचा ज्युस फुफ्फुसाचे संरक्षण करण्यास मदत करते. हे ज्युस बनविण्यासाठी प्रथम एक इंचाचे आले घ्या आणि ते कापा. त्याच प्रमामात हळद घ्या. काळ्या मिरीचे थोडे दाणे घ्या. तुळशीची चार पाने घ्या आणि दीड कप पाणी घ्या.
ज्युस बनविण्याची कृती
वरील सर्व वस्तूंना एकत्र करून ते गरम करा आणि पिण्यालायक होईपर्यंत थंड करा. हे ज्यूस रोज सकाळी आणि संध्याकाळी नियमित घ्या. फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी हे ज्युस खूप गुणकारी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.