Diabetic Retinopathy Symptoms esakal
health-fitness-wellness

Diabetes Symptoms : मधुमेहामुळे डोळ्यांवर कोणते विपरित परिणाम होतात? वेळीच सावध व्हा, अन्यथा..

सकाळ डिजिटल टीम

डायबेटिसमुळे पडद्याच्या रक्तवाहिन्या खराब होतात व त्यामुळे पडद्याला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा पुरेसा होत नाही.

-डॉ. पल्लवी यादव, नेत्रविकार तज्ज्ञ, चिरायु हॉस्पिटल, रत्नागिरी

chirayu.ratnagiri@gmail.com

पूर्वी पाश्चात्य देशातला मानला जाणारा रोग मधुमेह (Diabetes) हा अलीकडे १०-१५ वर्षांमध्ये भारतीय लोकांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढला आहे. याचे कारण म्हणजे बदलती जीवनशैली. बैठे काम जास्त प्रमाणात होत असल्याने शरीराला व्यायाम मिळत नाही. त्याचबरोबर आहारामध्ये होत असलेला बदल म्हणजेच जंकफूड खाण्याचे वाढते प्रमाण. त्यामुळे मधुमेहाचे प्रमाण भारतीयांमध्ये वाढत आहे.

मधुमेहामध्ये आपल्या रक्तातील साखर वाढते. त्यामुळे आपल्या शरीरातील सर्व अवयवांवर त्‍याचा परिणाम होतो. मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये जर रक्तातील साखर नियंत्रणात नसेल तर डोळ्यांवर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो. डायबेटिक रेटिनोपॅथी (Diabetic Retinopathy Symptoms) ही यातील एक महत्त्‍वाची समस्या आहे. आपल्या डोळ्यातील आंतरपटल (Retina) हा एक अतिशय नाजूक भाग आहे. या आंतरपटलावर पडणारी किरणे डोळ्यांच्या नसांमार्फत मेंदूला पोहोचवली जातात व त्यामुळेच आपल्याला दिसू शकते. या आंतरपटलातील सर्वांत संवेदनशील भाग असतो त्याला म्यॅकुला असे म्हणतात. या आंतरपटलामध्ये रक्तवाहिन्यांची एक विशिष्ट रचना असते.

दीर्घकाळ डायबेटिस असल्यामुळे आणि मधुमेहावर नियंत्रण नसल्यामुळे या आंतरपटलाच्या रक्तवाहिन्यांमधून रक्त पाझरते किंवा काहीवेळा कमकुवत रक्तवाहिन्यांचे वेडेवाकडे जाळे पसरते, या व्याधींना एकत्रितपणे डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणतात. सर्व मधुमेहींमध्ये हा आजार होण्याची शक्यता असते. सर्वसाधारणपणे जे लोक दीर्घ कालावधीपासून मधुमेही आहेत व ज्याच्यांमध्ये साखरेचे प्रमाण अनियंत्रित आहे त्यांना रेटिनोपॅथी होण्याची शक्यता जास्त असते. मधुमेह असणाऱ्या ३० टक्के रुग्णांमध्ये रेटिनोपॅथी आढळते.

मधुमेहामुळे आंतरपटलावर होणारे परिणाम म्हणजेच डायबेटिक रेटिनोपॅथी. याचे टप्पे खालीलप्रमाणे आहेत.

१) नॉनप्रोलिफेरेटिव्ह डायबेटिक रेटिनोपॅथी - यामध्ये पडद्यामधील रक्तवाहिन्या अवरोधित होतात. ज्यामुळे पडद्यामध्ये रक्तस्राव होतो. रक्तवाहिन्यांतून प्रथिने पडद्यावर पाझरून पिवळे डाग पडतात.

२) प्रोलिफेरेटिव्ह डायबेटिक रेटिनोपॅथी - डायबेटिसमुळे पडद्याच्या रक्तवाहिन्या खराब होतात व त्यामुळे पडद्याला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा पुरेसा होत नाही. हा पुरवठा वाढवण्यासाठी पडद्यावर नवीन रक्तवाहिन्या तयार होतात. या रक्तवाहिन्या अतिशय कमकुवत असतात. त्या फुटून डोळ्यामध्ये रक्तस्राव होतो. क्वचित प्रसंगी या रक्तवाहिन्यांचे जाळे तयार होते व ते आंतरपटलावर ओढ निर्माण करून (traction) आंतरपटल सरकू शकते. (Retinal detachment) व त्यामुळेही दृष्टी जाऊ शकते.

३) डायबेटिक मॅक्युलोपथी - रेटिनाच्या मध्यवर्ती भागात असलेल्या मॅक्युलामध्ये रक्तवाहिन्यांच्या गळतीमुळे सूज येते व त्यामुळे दृष्टी कमी होते. डायबेटिसमुळे पडद्यातील दोष निर्माण झाल्यास कमी झालेली दृष्टी परत मिळवणे फार कठीण असते. त्यामुळे पडद्यामध्ये दोष निर्माण होऊ नये, ही काळजी प्रत्येक मधुमेहाच्या रुग्णाने घेतली पाहिजे. यासाठी आपल्या रक्तातील साखरेवर नियंत्रण असणे अतिशय गरजेचे आहे. त्याकरिता वेळोवेळी आपल्या तज्‍ज्ञ डॉक्टरांकडे तपासणी करून त्यांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे नेत्रतज्ज्ञांकडून पडद्याची तपासणी होणे गरजेचे आहे. पडद्यामध्ये दोष निर्माण झाल्यास लेझर किरणांद्वारे उपचार केले जातात. पड‌द्याला सूज आल्यास Anti VEGF इंजेक्शनने डोळ्यातील सूज कमी करता येते व दृष्टीमध्ये सुधार होऊ शकतो.

(डॉ. चिरायु हॉस्पिटल रत्नागिरी येथे नेत्ररोगतज्ज्ञ आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs BAN, 1st T20I: हार्दिक पांड्या अन् नितीश रेड्डीने केलं भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब, मालिकेतही आघाडी

Palghar News: पालघरच्या किनारपट्टीवर संशयास्पद बोट दिसली, तटरक्षक दलाकडून शोध मोहीम सुरू

Viral Video : 'बुगडी माझी सांडली गं'वर सत्तरी ओलांडलेल्या आजींचा डान्स; नेटकरी म्हणाले, "एक लाख गौतमी पाटील..."

रिऍलिटी शो आहे की सिंपथी... मिताली मयेकरच्या त्या प्रश्नाचा रोख सुरज चव्हाणकडे? नेमकं काय म्हणाली?

Pune Crime : बोपदेव घाट तरुणीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्यास दहा लाखांचे बक्षीस जाहीर

SCROLL FOR NEXT