Kidney Stone Symptoms esakal
health-fitness-wellness

Kidney Stone Symptoms : मूतखडा कसा तयार होतो? कोणती आहेत लक्षणे, हे टाळण्यासाठी काय करावे?

kidney stone symptoms : मूतखडा (Kidney Stone) हा अतीव यातना देणारा रोग आहे. मुतखड्याचा असह्य त्रास थांबण्यासाठी काही वेळा शस्त्रक्रिया करावी लागते.

सकाळ डिजिटल टीम

मूतखडा तयार होण्याची प्रकिया लघवीचे प्रमाण कमी झाल्याने किंवा लघवीतील मूतखडा तयार करणाऱ्या घटकांचे प्रमाण वाढल्याने मूतखडा तयार होतो.

-डॉ. अभिजित पाटील, जनरल व लॅप्रोस्कोपिक सर्जन

Abhijeet४५५@yahoo.co.in

कामाच्या गडबडीत तर कधी दुर्लक्षामुळे तासन् तास पाणी पिण्याचे लक्षात येत नाही. मग, अचानक ओटीपोट किंवा पाठीत दुखायला लागते. निदान झाल्यानंतर मुतखडा झाल्याचे लक्षात येते. का होतो मूतखडा, त्याची लक्षणे कोणती, जाणून घेऊया मुतखड्याविषयी...!

मूतखडा (Kidney Stone) हा अतीव यातना देणारा रोग आहे. मुतखड्याचा असह्य त्रास थांबण्यासाठी काही वेळा शस्त्रक्रिया करावी लागते. मात्र, पुन्हा-पुन्हा मूतखडा होऊ नये, यासाठी औषधे अधिक गुणकारी असतात. मूत्रपिंडात किंवा लघवीच्या मार्गात तयार होणाऱ्या कठीण स्फटिकजन्य पदार्थाला मूतखडा म्हणतात. लघवीतील न विरघळलेले स्फटिकजन्य पदार्थ ज्यावेळी एका ठिकाणी जमा होतात त्यावेळी मूतखडा तयार होतो. मूतखडा तयार होण्याचा धोका असणारे, ८० टक्के रुग्ण पुरुष असतात.

वारंवार लघवीचा जंतुसंसर्ग होणारे रुग्ण, २० ते ४९ वर्षांच्या व्यक्ती कुटुंबातील लोकांना मूतखडा होण्याचा इतिहास असणाऱ्या व्यक्ती, ज्या व्यक्तींमध्ये रक्तातील युरिक अॅसिडचे प्रमाण अधिक असते त्यांना युरिक अॅसिडपासून मूतखडे तयार होण्याची शक्यता जास्त असते. गर्भारपणात प्रोजेस्टेरॉनचा स्राव वाढल्याने लघवीचा वेग कमी होतो, त्याने खडे तयार होतात. गर्भारपणात कॅल्शियम मूत्रात उत्सर्जित होण्याने मूतखडे होण्याचे प्रमाण वाढते.

मूतखडा तयार होण्याची प्रकिया लघवीचे प्रमाण कमी झाल्याने किंवा लघवीतील मूतखडा तयार करणाऱ्या घटकांचे प्रमाण वाढल्याने मूतखडा तयार होतो. पाणी अथवा पातळ पदार्थ कमी घेण्याने किंवा श्रम, व्यायाम, जुलाब या कारणांनी पाण्याचे शरीरातील प्रमाण कमी झाल्याने मूतखडा तयार होण्याचे प्रमाण वाढते. मूत्रमार्गात होणाऱ्या जंतुसंसर्गामुळे नायडस तयार होतो व त्याचे क्षार जमा झाल्याने त्याचे मूतखड्यात रूपांतर होते.

मूतखड्याचे प्रकार :

  • कॅल्शियमपासून कॅल्शियम ऑक्झॅलेटचे किंवा कॅल्शियम फॉस्फेटचे खडे तयार होतात.

  • रक्तातील व लघवीतील युरिक अॅसिडचे प्रमाण वाढल्याने युरिक अॅसिडचे मूतखडे तयार होतात.

लक्षणे :

सामान्यतः मूतखडा झाल्याची लक्षणे दिसत नाहीत. परंतु, जेव्हा मूत्रमार्गात त्याची हालचाल होते किंवा अचानक अडथळा निर्माण होतो त्यावेळी तीव्र वेदना होतात. वेदना ज्या बाजूला मूतखडा असेल त्या बाजूला पाठीत, पोटात किंवा ओटीपोटात वेदना होतात. मूतखडा मूत्राशयाच्या जवळ पोहोचल्यावर लघवी पुन्हा-पुन्हा आल्याची संवेदना होते किंवा लघवी होताना जळजळ झाल्याची जाणीव होते. त्यामध्ये जंतूसंसर्ग झाल्यास ताप व थंडी वाजून येते.

तपासणीच्या पद्धती

लघवीची तपासणी करणे, त्यात लघवीतील रक्तपेशी व जंतूंच्या प्रादुर्भावाचे निदान होते. सोनोग्राफी केल्यास मूतखड्याचे आकारमान, स्थान समजते. सोनोग्राफीमुळे जंतूंच्या प्रादुर्भावाची लक्षणे, किडनीला त्याचा कितपत त्रास आहे, या सर्वांची उत्तरे मिळतात. रक्त तपासून किडनीचे कार्य कमी झालेले नाहीना, हे तपासावे लागते. पोटाच्या क्ष-किरण तपासणीमध्ये मूतखड्याचे आकारमान व घनता जाणता येते.

मूतखड्यावरील शस्त्रक्रिया :

दुर्बिणीद्वारे किडनी स्टोन काढणे-किडनी स्टोन उपचारात गेल्या दोन दशकांत अनेक सुधारणा आणि बदल झाले आहेत. लिथोट्रिप्सी नावाची आधुनिक शस्त्रक्रिया मूत्रपिंडातील दगड फोडण्यास मदत करते. ज्यामुळे सामान्य लघवीद्वारे काढले जाऊ शकते. मूतखडा या वेदनादायक अरिष्टावर उपचार करण्यासाठी एक आधुनिक पद्धत म्हणजे लिथोट्रिप्सी.

लिथोट्रिप्सी म्हणजे काय?

मूत्रपिंडातील दगडांवर सर्वांत सामान्य आणि प्रभावी उपचार म्हणून ओळखले जाणारे, लिथोट्रिप्सी मूत्रमार्ग, मूत्रपिंड आणि मूत्राशयातील दगडांचे तुकडे करण्यासाठी शॉक वेव्ह वापरते. शरीराच्या बाहेरून दगडांवर शॉक वेव्ह लक्ष्य केले जातात म्हणून चिराची गरज नाही. जेव्हा युरोलिथियासिस (मूत्राशय आणि मूत्रमार्गात दगड निर्मिती) उपचारांचा विचार केला जातो तेव्हा कोणत्याही वेदनाशिवाय, एक्स्ट्राकॉर्पोरियल शॉक वेव्ह लिथोट्रिप्सी आणि यूरेटरोस्कोपिक लिथोट्रिप्सी या आधुनिक काळातील दोन सर्वांत प्रभावी आणि यशस्वी प्रक्रिया आहेत.

एक्स्ट्राकॉर्पोरियल शॉक वेव्ह लिथोट्रिप्सी (ESWL)

लिथोट्रिप्सीचा सर्वांत सामान्य प्रकार म्हणून ओळखले जाणारे, एक्स्ट्राकॉर्पोरियल शॉक वेव्ह लिथोट्रिप्सी ही कमी आक्रमक आणि वेदनारहित किडनी स्टोन काढण्याची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया मूत्रपिंडातील दगडांना लक्ष्य करण्यासाठी उच्च वारंवारता, इलेक्ट्रोमॅग्नेटिक ध्वनी लहरी वापरते. अल्ट्रासाऊंड शॉक वेव्ह मोठ्या दगडांना लहान धुळीसारख्या कणांमध्ये मोडतात ज्यामुळे ते मूत्रमार्गे मूत्रपिंडातून बाहेर टाकू शकतात. या प्रक्रियेदरम्यान अॅनेस्थेसियाचा वापर केला जात नाही.

एक्स्ट्राकॉर्पोरियल शॉक वेव्ह लिथोट्रिप्सीचे फायदे

  • या प्रक्रियेत कोणताही कट किंवा चीरा केला जात नाही. वरचा मूत्रमार्ग आणि मूत्रपिंडातील दगडांवर उपचार करण्यासाठी सर्वांत प्रभावी.

  • १०-२० मिमी पर्यंतचे दगड लक्ष्य केले जातात. यामध्ये संसर्गाचा कमी धोका असतो. तसेच त्याच दिवशी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळतो.

  • किमान अस्वस्थता वगळता कोणतीही तीव्र वेदना होत नाही.

मूतखडा होणे टाळण्यासाठी काय करावे?

  • पाणी भरपूर पिणे.

  • लघवी तुंबवून न ठेवणे.

  • काढलेला स्टोन किंवा पडलेले स्टोन तपासून घेऊन ते कुठच्या प्रकारचे आहे, ते जाणून त्याप्रमाणे पथ्य करावे.

  • काही मूतखडे निदान झाल्या-झाल्या लगेच काढावे लागतात. काही मूतखडे एकाद-दुसरा महिना थांबले तरी त्रास देत नाहीत. पण, त्यावर लक्ष ठेवावे लागते. ते विरघळले का? हे अधूनमधून बघावे लागते. तर काहींना काही करावे लागत नाही. या सगळ्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक ठरतो.

(लेख चिरायु हॉस्पिटल येथे जनरल व लॅप्रोस्कोपिक सर्जन आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT