आयर्नची कमतरता भरुन काढा Esakal
health-fitness-wellness

शरिरातील Iron कमी होणं पडू शकतं महागात, वेळीच घ्या काळजी

आयर्न शरिरातील हीमोग्लोबिनची कमतरता भरून काढण्यास मदत करतं. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती बूस्ट होते. तसचं आयर्नमुळे शरिरातील थकवा नाहिसा होवून एक्टीव राहण्यास मदत होते

Kirti Wadkar

मानवी शरीर हे अनेक तत्वांनी तयार झालं आहे. या शरिराची योग्य निगा राखण्यासाठी त्याला पुरेसा प्रोटीन, मिनरल्स आणि विटामिनस् असलेला आहार पुरवणं गरजेचं आहे. ही सगळी पोषक तत्व मानवी शरीरासाठी अत्यंत गरजेची आहेत. यातीलच एक महत्वाचं म्हणजे लोह Iron शरीरातील नसानसांमधून वाहणाऱ्या रक्ताची पातळी योग्य प्रमाणात राहण्यासाठी तसंच रक्त तयार कऱण्यासाठी आयर्न महत्वपूर्ण भूमिका बजावतं. Health Tips in Marathi Boost Iron in Body

आयर्न शरिराला ऑक्सिजनचा Oxygen पुरवठा करण्याचं काम करतं. आयर्नची Iron कमतरता म्हणजे रक्ताची कमतरता निर्माण झाल्याचं एक लक्षण आहे. शरिरात रक्ताची कमी म्हणजे अनेक आजारांना आमंत्रण म्हणता येईल. रक्तातील Blood रेड ब्लड सेल्स म्हणजेच रक्त पेशी कमी झाल्या आणि पांढऱ्या पेशी वाढल्यास रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. परिणामी कोणत्याही आजाराचा सामना करण्यासाठी शरीराकडे पुरेशी ताकद राहत नाही.

अलिकडे जंक फूड आणि तळलेले पदार्थ खाण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. याचा शरिरावर विपरीत परिणाम होत आहे. लोकांकडे पुरेसा वेळ नसल्याने पौष्टिक आहार आणि व्यायामाकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी शरिराला हवे असलेल्या विटामिन Vitamin. आयर्नसह अनेक पोषक तत्वांची कमतरता निर्माण होवू लागली आहे. Iron deficiency

आयरन शरीरासाठी का गरजेच

आयर्न शरिरातील हीमोग्लोबिनची कमतरता भरून काढण्यास मदत करतं. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती बूस्ट होते. तसचं आयर्नमुळे शरिरातील थकवा नाहिसा होवून एक्टीव राहण्यास मदत होते. आयर्नची कमतरता निर्माण झाल्यास एनिमिया, त्वचा पिवळी पडणे, थकवा, चक्कर येणं तसचं लक्ष केंद्रीत करण्यात अडचणी निर्माण होवू शकतात.

त्याचसोबत आयरनच्या कमतरतेने छातीत धडधड वाढणे, छातीत दुखणे, श्वास घेण्यास अडचण, केसांचं गळणं, घसा खवखवणे अशा समस्या उद्भवू शकतात. गरोगर महिलांना वाढत्या गर्भासाठी आणि स्वत:साठी अधिक रक्त तयार करण्यासाठी अधिक आयर्नची गरज असते. अन्यथा त्याचा गर्भातील बाळाच्या वाढीवर आणि मेंदूवर परिणाम होवू शकतो. Iron deficiency problems 

शरिरासाठी आयर्न किती असावं

शरिरातील आयर्नचं प्रमाण हे व्यक्तीचं वय, लिंग आणि पूर्ण आरोग्य यावर अनलंबून असतं. नवजात आणि लहान मुलांना मोठ्यांच्या तुलनेत जास्त आयरनची आवश्यकता असते. लहान असताना मुलं आणि मुली दोघांना समान प्रमात आयर्न गरजेचं असतं. ४ते ८ या वयोगटातील मुलांना रोज १० मिलीग्रॅम तर ९ते १३ वयोगटातील मुलांना दररोज ८ मिलीग्रॅम आयर्न गरजेचं असतं.

तर महिलांना अधिक आयर्नची आवश्यकता असते. मासिक पाळीमध्ये जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने महिलांना अधिक आयर्न गरजेचं असतं. तज्ञांच्या मते १८ ते ५० वयोगटातील महिलांना दररोज १८ मिलग्रॅम आयर्नची गरज भासते. तर या वयोगटातील पुरुषांना केवळ ८ मिलीग्रॅम आयर्न पुरेसं असतं.

आयर्नयुक्त पदार्थांचं पुरेश्या प्रमाणात सेवन न केल्यास शरीरात आयरनची कमतराता निर्माण होवून रक्ताचं प्रमाणही कमी होतं. यासाठीच शरिराला पुरेस आयर्न मिळावं म्हणून रोजच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे. 

१. बीट- बीट हे शरीरातील आयर्न वाढवण्यासाठी सर्वात उत्तम पर्याय आहे. आयरनचा स्त्रोत असलेल्या बीटचा आहारात समावेश केल्यास हीमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. आयर्नची कमतरता निर्माण झाल्यास डॉक्टर सर्वप्रथम बीट खाण्याचा सल्ला देतात. Beetroot for iron 

२. पालक- पालकमध्येही आयर्न मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं. त्याचप्रमाणे पालकचा आहारात समावेश केल्यास आयर्नसोबतच कॅल्शियम, सोडियम, क्लोरिन आणि प्रोटीन सारखे पोषक तत्वही शरिराला मिळतात. 

३. डाळिंब- शरिरात आयर्नचं प्रमाण कमी झाल्यास डाळिंबाचा रस फायदेशीर ठरू शकतो. एनिमिया सारख्या आजारांमध्य डाळिंबाचा ज्युस गुणकारी आहे. 

४. पेरू- शरिरातील आयर्नची पातळी वाढवण्यासाठी पेरूचं सेवन फायदेशीर ठरतं. पेरू खाण्याआधी तो पिकलेला असेल याची खात्री करून घ्या. Food for Iron deficiency

५. अंडी- अंड्यामध्ये प्रोटीन, विटामिन्स, मिनरल्स, कॅल्शियम आणि भरपूर प्रमाणात आयर्न असतं. त्याचसोबत विटामिन डी देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं. त्यामुळे खास करून लहान मुलांच्या आहारात उकडलेल्या अंड्यांचा समावेश करावा. यामुळे वाढत्या वयात त्यांच्या शरीरासाठी आवश्यक असलेली सर्व पोषक तत्व मिळण्यास मदत होईल. 

६. रेट मीट- आयर्नची कमतरता भरून काढण्यासाठी आणि हाडं मजबूत करण्यासाठी तुम्ही आहारात रेट मीट समाविष्ट करू शकता. 

७. ड्रायफ्रूटस्- शरीराला पुरेस आयर्न मिळावं यासाठी तुम्ही डाएटमध्ये सुकामेवा घेऊ शकता. खजूर, अक्रोड, बदाम आणि मनुके यांचा तुम्ही आहारात समावेश करू शकता. सकाळी उपाशीपोटी मनुका किंवा रात्रभर भिजत घातलेल्या काळ्या मनुका चावून खाव्या तसचं मनुक्याचं पाणी प्यायल्याने आयर्नचं प्रमाण वाढण्यास मदत होते.

यासोबतच आहारात हिरव्या पालेभाज्या, लाल रंगाची फळं आणि डाळींचा समावेश करून आयर्नचं प्रमाण वाढवण्यास मदत मिळेल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: डोंबिवलीत रवींद्र चव्हाण आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT