health-fitness-wellness

तरुणांनो,अकाली टक्कल पडतंय? मग ऐका डॉक्टरांचा सल्ला

९० टक्के स्त्री व पुरुष अकाली केस गळण्याच्या समस्येने त्रस्त आहेत.

शर्वरी जोशी

गेल्या काही काळापासून अनेक तरुण अकाली टक्कल पडण्याच्या समस्येने त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे दिवसेंदिवस या समस्येमध्ये वाढ होत आहे. यात जवळपास ९० टक्के स्त्री व पुरुष अकाली केस गळण्याच्या समस्येने त्रस्त आहेत. त्यामुळेच तरुणांचे अकाली केस का गळतात, त्यामागची कारणे कोणती व उपाय कोणती करावेत याविषयी त्वचाविकार तज्ज्ञ डॉ. रिंकी कपूर यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

अनेक तरुण मुलं केस गळणे किंवा टक्कल पडणे याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे कालांतराने डोक्यावरील केस विरळ होत जाऊन पूर्णपणे टक्कल पडते. यात 25% पुरुषांमध्ये गुणसूत्र दोषांमुळे केसगळती सारखी समस्या आढळून येते. तर, वयाच्या २१ व्या वर्षापूर्वीच ही केस गळतीची समस्या दिसून येते. काही किशोरवयीन मुलांमध्ये तर 15 ते 16 वयोगटतही केस गळण्यासारखी समस्या पहायला मिळते. ३० टक्के स्त्रियांमध्ये चाळीशीमध्ये टक्कल पडण्यासारखी समस्या दिसून येते. तर, बदलत्या जीवशैलीमुळे हल्ली विशीतील तरुणींमध्येही टक्कल पडण्यासारखी गंभीर समस्या आढळून आल्याचे वक्तव्य डॉक्टरांनी केले आहे.

वाढती स्पर्धा, भिती, चिंता, ताणतणाव आणि चूकीच्या आहार पद्धती या सवयींमुळे केस गळतीची समस्या निर्माण होतांना दिसून येते. तर थायरॉईड हार्मोन्सची पातळी कमी होणे किंवा विशिष्ट औषधांचा दुष्परिणाम, केसांसाठी केमिकलयुक्त सौंदर्यप्रसाधनांचा अतिवापर,केस रंगविण्याकरिता रासायनिक उत्पादनांचा अति जास्त प्रमाणात वापर, जेल यांचा वापर आणि कौटुंबिक इतिहास पाहता अनुवंशिकरित्यादेखील केस गळतीची समस्या उद्भवू शकते. या समस्येकडे दुर्लक्ष न करता उपचार सुरू करण्यासाठी त्वचारोगतज्ज्ञांना भेट देणे आणि त्यांच्या सल्ल्यानुसार अचूक उपचार करणे योग्य राहिल.

तरुणांमध्ये न्यूनगंड -

गेल्या काही वर्षापासून सुरु असलेल्या वर्क फ्रॉम होम कल्चरमुळे व्हर्च्युअल मिटींग्स, व्हिडिओ कॉल सारख्या पर्यायांचा वापर केला जातो. यावेळी आपल्या सहका-यांसोबत बोलताना विशेषतः व्हिडिओ कॉल दरम्यान दिसून येणारे टक्कल अनेक तरुणांमध्ये न्युनगंड निर्माण करत असून या साथीच्या काळात अनेक तरुण ही समस्या घेऊन त्वचारोग तज्ज्ञांची भेट घेत असल्याचे आढळून आले. आपण सुंदर दिसावे असे प्रत्येकाला वाटत असते. आपले केस हे सौंदर्यात नेहमीच भर घालणारे ठरतात, मग अशा वेळी टक्कल पडण्यासारखी समस्या तुम्हाला चिंताग्रस्त करू शकते. मात्र अशा वेळी घाबरुन न जाता त्वचाविकार तज्ञांचा सल्ला घ्या आणि वेळीच उपचाराला सुरुवात करा.

काय आहेत त्यामागची कारणे -

१. नियमितपणे केस न धुणे आणि टाळू स्वच्छ न ठेवणे

२. आहारात पोषणमुल्यांचा अभाव

३. गर्भधारणा

४. हार्मोनल असंतुलन

५. एंड्रोजेनेटिक अलोपेशिया म्हणजे आनुवंशिक कारणांमुळे अकाली टक्कल पडणे

६. तणावपूर्ण जीवनशैली

७.थायरॉईड आणि मधुमेह सारखे दीर्घकालीन रोग

८. कर्करोग

उपाय -

१. तणावमुक्त रहा

२. योग्य आहार घ्या.

३. सौम्य शाम्पूची निवड.

४. कोमट पाण्याने केस धुवा.

५. कोवळ्या उन्हात बसा.

६. केसांमधील गुंता टाळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसरमध्ये इमारतीला भीषण आग

Winter Skincare: हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी आणि निस्तेज वाटते? मग हे ६ उपाय वापरून घेऊ शकता तुमच्या त्वचेची काळजी

Instagram Reels: इंस्टाग्राम रील्सवर 1 मिलियन व्ह्यूजसाठी किती पैसे मिळतात? रक्कम जाणून तुम्हीही व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT