health-fitness-wellness

हाडं मजबूत ठेवायची आहेत, अशी घ्या काळजी

केल्शिअम, व्हीटामिन डीचे सेवन करणे फायद्याचे ठरते.

सकाळ डिजिटल टीम

तुमच्या शरीराचे संतुलन योग्य राखण्यासाठी हाडं मजबूत ठेवणे गरजेचे असते. लहानपणापासूनच त्यासाठी योग्य काळजी घेतली तर ही काळजी घेणे शक्य होते. पौष्टीक, संतुलित आहार घेणे, हे त्यापैकीच. केल्शिअम, व्हीटामिन डीचे सेवन करणे हे फायद्याचे ठरते, असे मानले जाते. पण त्याव्यतिरिक्तही इतर अनेक पोषक घटकांचे दररोज सेवन करणे हेही फायद्याचे ठरते. हे सांगणारा एक व्हिडिओ आहारतज्ज्ञ लवनीत बात्रा यांनी नुकताच इंन्स्टाग्रामवर शेअर केला. त्यात त्यांनी पोषकतत्वांची यादीच दिली आहे.

Vitamin

बात्रा यांच्या यादीनुसार, केल्शिअम, व्हीटामिन यांच्याबरोबरीने योग्य प्रमाणात व्हीटामीन के, मेग्नेशिअम, झिंक, ओमेगा ३, प्रोटीन ए आणि सी या पोषक घटकांचे सेवन करणे हाडं मजबूत राखण्यासाठी फायद्याचे ठरते. तुमच्या आहारात भरपूर भाज्यांचा समावेश असणे गरजेचे आहे. या भाज्या खाल्याने तुम्हाला मुबलक प्रमाणात व्हिटामिन ए आणि सी मिळू शकते. व्हिटामिन सी घेतल्याने हाडं ठिसूळ होत नाहीत.

benefits of morning exercise

त्याचप्रमाणे नियमित व्यायाम केल्याने हाड आणि स्नायू मजबूत राखण्यास मदत होते. आठवड्यातून ३ ते ४ वेळा शक्ती वाढविण्यासाठी वेळ द्या. जर तुम्ही दिवसातला १५-२० मिनिटांचा वेळ दिलात तरी चालेल. मात्र जड वजन उचलण्याची अजिबात गरज नाही. हाय प्रोटिन घेणे टाळा. त्यांनी तुनच्या शरीरातील केल्शिअमची क्षमता कमी होते. जर तुनच्या शरीराला हाय प्रोटिन घेणे गरजेचे नसेल, तर ते घेऊ नका. जर तुम्ही १०० ग्रेमपेक्षा जास्त प्रोटीन घेतले तर तुमच्या शरीराला केल्शिअमची गरज लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे शिवाजी कर्डिले १४९८४ मतांनी आघाडीवर.

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT