infection in the middle part of the ear Learn the causes symptoms and prevention tips marathi news 
health-fitness-wellness

कानाच्या या भागामध्ये का वारंवार होते इन्फेक्शन जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

अर्चना बनगे

कोल्हापूर : आपण नेहमीच ऐकू न येणे कानामध्ये इन्फेक्शन होणे किंवा कानाच्या अन्य आजाराबाबत ऐकत असतो. परंतु आपण कधी कानाच्या मिडल इन्फेक्शन बाबत ऐकलं आहे का? ही एक सामान्य समस्या आहे जे लहान मुलांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात दिसते.   ही एक अशी अवस्था आहे जी कानाच्या मध्यभागी होते. यामुळे सूज येणे आणि मोठ्या प्रमाणात वेदना होणे असे प्रकार घडतात. परंतु अन्य कारणांनी ही आपल्या कानामध्ये अनेक वेळा वेदना होऊ शकतात. कानाच्या मध्ये यूस्टेएशियन या नावाची एक वहिनी असते जी  घसा आणि नाकाला जोडलेली असते. याच वाहिनी दारे आपल्या नाकातील द्रव आणि त्याचे प्रेशर जमा होत असते.

ज्यावेळी बॅक्टेरिया आणि व्हायरल याचे मधले इन्फेक्‍शन होते त्यावेळी  हा आजार लहान मुलांना होतो. लहान मुलांच्या मध्ये नेहमीच कानामध्ये वेदना होत असतात.  आई-वडील या लहान मुलांच्या या वेदनेकडे फारसे लक्ष देत नाहीत. त्याला सर्वसाधारण दुखणे समजून घरगुती उपचार जसे कानामध्ये तेल घालने असे करतात. परंतु याबाबत योग्य वेळी उपचार नाही केले तर भविष्यात बहिरेपणाचा धोका संभवतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते भारतासह काही देशांमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणात आहे.
 

मिडल ईयर इंफेक्शन चे तीन प्रकार जाणून घ्या


1)एक्यूट ओटाइटिस मीडिया :
या प्रकारामध्ये आपल्या कानाच्या मागील बाजूस सूज येते व त्याठिकाणी तो भाग लालसर व तो यामुळे अंगामध्ये ताप येतो तसेच कानामध्ये ही वेदना सुरू होतात

2)ओटाइटिस मीडिया विद इफ्यूजन: 
या प्रकारात कानावर उपचारानंतरही त्यामध्ये मूळ साचून राहतो त्याचबरोबर काहीवेळ कान गच्च झाल्यासारखे वाटते


3)क्रोनिक ओटाइटिस मीडिया विद इफ्यूजन यूस्टेशियन:
या प्रकारात आपल्या कानातील इन्फेक्शन कमी झाल्यानंतर सुद्धा बराच वेळ मळ साचून राहतो त्यामुळे आपणास व्यवस्थित ऐकू येत नाही. त्याचबरोबर नवीन इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.

जाणून घ्या कारणे 
जन्मा वेळीच मुलाच्या मध्ये यूस्टेशियन ट्युब मध्ये वाढ व्यवस्थित होत नाही त्यामुळे मुले संक्रमण अवस्थेत येतात.
 नाक किंवा घशामध्ये झालेल्या ऍलर्जीमुळे इन्फेक्शन होते यामुळे यूस्टेशियन ट्यूब ब्लॉक होते व कानामध्ये सूज येण्यास सुरुवात होते.रोगप्रतिकारक शक्ती क्षमता कमी झाल्यामुळे या समस्येचे अनेक जण शिकार बनतात.अनेक वेळा सर्दी व खोकला अशा छोट्या आजारातून ही समस्या मोठी होते.जर कोणी व्यक्ती जास्त वेळ अस्थमा आजाराने असेल तर त्यालाही हा आजार होतो.
 धूर आणि प्रदूषण यामुळेही हा आजार होतो.लहान मुलांना पाठीवर झोपून बाटली दूध देत असेल तर अशावेळी दूध पोटात न जाता यूस्टेशियन ट्यूबमध्ये जाते व यामुळे हि ट्यूब ब्लॉकेज होण्याचा धोका होतो.

ही आहेत मिडल इयर इन्फेक्शन ची लक्षणे
 कान आणि डोक्यामध्ये वेदना.
 कानाच्या मागील बाजूस सूज येणे.
 खोकला येणे आणि काना मधून पाणी येणे.
 

अनेक मुलांच्या मध्ये अशा समस्या वेळी तापही येतो. ऐकण्या मध्ये अडथळा येणे.
 कान गच्च झाल्यासारखे वाटणे.
 अस्वस्थ वाटणे व उलटी होणे.
जाणून घ्या यापासून रक्षण कसे करावे 
लहान मुलांना दूध पाजताना पोटावर झोपून दूध पाजू नये. अशा वेळी दूध यूस्टेशियन ट्युब मध्ये जाते व या आजाराची शक्यता वाढते. शक्यतो उभे राहूनच दूध पाजावे. आईच्या दूध मधून अँटीबॉडी ची मात्रा जात असते जे लहान मुलांचे प्रतिकारशक्ती वाढवते. त्यामुळे लहान मुलांना सहा ते आठ महिन्यात पर्यंत स्तनपान करावे. 

लहान मुलांना अंघोळ घालताना त्याच्या कानात पाणी जाऊ नये याची दक्षता घ्यावी. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय लहान मुलांच्या कानामध्ये तेल घालू नये. प्रदूषणापासून दूर राहा आणि कान स्वच्छ करतेवेळी योग्य ती खबरदारी घ्या. दुसर्‍या व्यक्तीच्या धुम्रपाना वेळी  त्यांचा धूर आपल्या पर्यंत येऊ देऊ नका.
 इन्फेक्शन ही एक सामान्य समस्या आहे. परंतु याकडे आपण जर योग्य वेळी पाहिले नाही तर लहान मुले संवेदनशील होतात व ते या आजाराने ग्रस्त होतात. या लेखामध्ये दिलेली कारणे आणि लक्षणे ओळखून या आजारापासून  रक्षण करा.

डिस्क्लेमर : ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे शिवाजी कर्डिले १४९८४ मतांनी आघाडीवर.

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT