oxygen nurse 
health-fitness-wellness

International Nurses Day ची सुरुवात कधीपासून झाली माहित आहे?

Nurses Day का साजरा केला जातो? जाणून घ्या, रंजककथा

शर्वरी जोशी

एखाद्या रुग्णाचे प्राण वाचवणं जितकं गरजेचं असतं. तितकीच त्याची काळजी घेणंसुद्धा गरजेचं असते. रुग्णालयात डॉक्टर रुग्णांचे प्राण वाचवतात. परंतु, या शस्त्रक्रियेनंतर किंवा उपचारांनंतर त्या रुग्णाची सेवा-सुश्रुषा करण्याचं काम परिचारिका म्हणजेच नर्स (nurses) करत असतात. उपचारांसोबतच रुग्णाला मानसिक आधार, त्याचं पथ्यपाणी सांभाळणंदेखील तितकंच गरजेचं असतं आणि हेच काम परिचारिका बखुबीने पार पाडत असतात. अगदी ऑपरेशन थिएटरपासून ते जनरल वॉर्डमध्ये रुग्णाला शिफ्ट करेपर्यंत नर्स (nurses) कायम त्यांच्या सोबत असतात. त्यांची काळजी घेत असतात. म्हणूनच खरं तर या परिचारिकांना मानाचा मजुराच करावा लागेल. त्यातच आज जागतिक परिचारिका दिन (international nurses day) आहे. म्हणजे, थोडक्यात सांगायचं झालं तर परिचारिकांचा गौरव, त्यांचं कौतुक करण्याचा दिवस. परंतु, हा दिवस नेमका कधी सुरु झाला त्यामागची नेमकी कथा काय ते अनेकांना ठावूक नाही. म्हणूनच ती आज जाणून घेऊयात.(international nurses day 2021 significance and-history of international nurses day)

जागतिक स्तरावर आपण अनेक वेगवेगळे दिन साजरे करत असतो. त्याच पद्धतीने नि:स्वार्थपणे रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारिकांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी आज म्हणेजच १२ मे रोजी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा केला जातो. आजच्या दिवशी जगभरात विविध पद्धतीने हा दिवस सेलिब्रेट केला जातो.

आधुनिक नर्सिंगच्या फाऊंडर लेडी फ्लोरेन्स नायटिंगल यांचा जन्म १२ मे रोजी झाला होता. त्यामुळे याच दिवशी म्हणजे १९७१ मध्ये आंतरराष्ट्रीय परिचारिका परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेमध्ये तो दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून घोषित करण्यात आला. तेव्हापासून हा दिवस संपूर्ण जगात साजरा केला जातो.

फ्लोरेन्स नायटिंगल यांनी क्रिमिअन युद्धच्या वेळी रात्री जागून सैनिकांची सेवा केली होती. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी हातात कंदिल घेऊन त्या सातत्याने जखमी रुग्णांची सुश्रुषा करत होत्या. त्यामुळे त्यांना लॅम्प लेडी असंही म्हटलं जातं.

कोणत्याही रुग्णालयातील रुग्ण हा डॉक्टरांपेक्षा अधिक काळ परिचारिकेच्या देखरेखीखाली असो. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची परिचारिका या अहोरात्र सेवा करीत असतात. रुग्णाला सकारात्मकता प्रदान करण्याचे, त्यांना आनंद देण्याचे महत्त्वाचे कार्य त्या करीत असतात. आताच्या घडीलाही करोनासारख्या महाभयंकर संकटकाळात परिचारिकांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. कुटुंबांची, मुलांची, प्रसंगी आपल्या जीवाची पर्वा न करता दिवस-रात्र झटून परिचारिका आपली सेवा अत्यंत चोखपणे बजावत आहेत. अनेक रुग्णालयातील परिचारिकांनी तर गेले कित्येक दिवस आपल्या घरीदेखील गेल्या नाहीत. वैद्यकीय क्षेत्रात परिचारिकांचे योगदान अमूल्य असेच आहे. त्यांच्याशिवाय वैद्यकीय क्षेत्र पूर्णत्वास जाऊ शकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपाचे उमेदवार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांना ५१७८ मतांची आघाडी घेतली

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT