जागतिक आरोग्य संघटनेनुसार(World Health Organization), दरवर्षी जागतिक पाताळीवर 2.8 मिलीयन लोकांच्या आरोग्यावर लट्ठपणामुळे (Obesity) गंभीर परिणाम होतात. ग्लोबल ओबेसिटी ऑब्झर्व्हेटरीद्वारे 34,648 विषयांच्या नमुन्यांचे विश्लेषण केल्यानंतर असे आढळून आले की 2019-20 मध्ये भारतातील प्रौढांमध्ये (adults) लठ्ठपणाचे प्रमाण 18.7 टक्के होते. (is Calorie count model beneficial For Obesity)
हा रोग टाइप 2 मधुमेह (diet-related non-communicable diseases), विशिष्ट प्रकारचे कर्करोग(cancers), हृदयविकार (heart diseases), पक्षाघात( stroke) आणि इतर आहार-संबंधित असंसर्गजन्य रोगांसाठी (diet-related non-communicable diseases) एक प्रमुख जोखीम घटक (major risk factor) म्हणून ओळखला जातो.
अलीकडेच, यूएसच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांनी नमूद केले आहे की, लठ्ठपणामुळे कोविड -19 संक्रमित लोकांमध्ये हॉस्पिटलायझेशनचा धोका तिप्पट होऊ शकतो, कारण जास्त वजन हे रोगप्रतिकारक शक्तीच्या कमतरतेशी संबंधित आहे. युनायटेड स्टेट्समध्ये कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळात आणि 18 नोव्हेंबर 2020 दरम्यान, कोरोना संक्रमित 9,00,000 हून अधिक प्रौढांना (Adults) हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागत होते, त्यापैकी 30 टक्के लठ्ठ होते, असा अहवाल जर्नल ऑफ द अमेरिकन हार्ट असोसिएशनने दिला आहे.
संशोधनामध्ये स्पष्ट झाले आहे की, अल्प प्रमाणामध्ये वजनामध्ये घट झाल्यास ह्रदयासंबधित आरोग्य समस्यांचा धोका मोठ्या प्रमाणामध्ये कमी होऊ शकतो. जागतिक लोकसंख्या योग्य जीवनशैलीत बदल करून शाश्वतपध्दतीने वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करुन असून ज्यामध्ये पारंपारिक 'कमी खाणे-जास्त खर्च(‘eating less- spending more)' या दृष्टिकोनाचा समावेश आहे. पण. लठ्ठपणाचे कारण आणि व्यवस्थापन स्पष्ट करण्यासाठी शतकानुशतके जुने मॉडेल 'कॅलरीज इन, कॅलरीज आउट' किंवा
एनर्जी-बॅलन्स मॉडेल (EBM) यांना अलीकडेच हार्वर्ड मेडिकल स्कूलचे प्राध्यापक डॉ. डेव्हिड लुडविग यांनी सादर केलेल्या 'कार्बोहायड्रेट-इन्सुलिन' मॉडेल (CIM) स्वरूपात पर्यायी मॉडेलद्वारे आव्हान दिले होते. त्यानंतर बोल्ड हायपॉथेसिस मांडून असा दावा केली की, सध्या निर्माण झालेला लठ्ठतेचा साथरोग हा मोठया प्रमाणामध्ये ग्लायसेमिक लोड ( glycemic load (GL)डाएट, विशेषत: अल्ट्रा प्रोसेस (ultra-processed) केलेल्या पदार्थांमध्ये असलले परिष्कृत कार्बोहायड्रेट्स (refined carbohydrates) , सहज पचविता येणारे कार्बस् जसे की साखर, परिष्कृत गहू (refined carbohydrates), स्टार्च फ्लोअर, केक, पेस्ट्री, आणि चिप्सायामुळे वाढत आहे.
अभ्यासामध्ये, डॉ. डेव्हिड लुडविग आणि त्याच्या टीमने सांगितले की, वजन वाढण्याची जैविक(Biologocal) कारणे EBM स्पष्ट करत नाही. यामध्ये न्युट्रीशअन् सायन्स कम्युनिटी (nutrition science community) समोर दोन मुख्य अडचणी होत्या त्या म्हणजे, वैज्ञानिक पुराव्यांद्वारे योग्य कार्बोहायड्रेट-इन्सुलिन हायपोथेसिसमागील तर्क शोधूणे व समर्थन करणेआणि शाश्वत पध्दतीने वजन कमी करण्यासाठी पारंपारिक ऊर्जा संतुलन मॉडेलची विश्वासार्हता निर्माण करणे.
कार्बोहायड्रेट-इन्सुलिन मॉडेल अधिक प्रभावी (Carbohydrate-insulin model gets it better)
कार्बोहायड्रेट-इन्सुलिन मॉडेल अन्नाची गुणवत्ता बदलल्यामुळे वजन वाढत असल्याचे स्पष्ट करतो. सोप्या शब्दात सांगायचे झाले, आपला काय खातो आणि किती खातो यामुळे शरीरामध्ये हॉर्मोनल आणि मेटबॉलिक बदल होतात. हे मॉडेलद्वारे इंसुलिन-ग्लूकागन इंटरप्लेमार्फत ग्लायसेमिक लोड ( glycemic load (GL) पदार्थांमुळे शरीरात मोठ्या प्रमाणात मेद कसे साठते हे स्पष्ट होते. आपण असे पदार्थ खातो तेव्हा इन्सुलिनचा स्राव वाढते आणि ग्लुकागचे स्राव कमी होतो. उच्च इन्सुलिन पातळीमुळे चरबी पेशींना अधिक कॅलरी संचयित करण्याचा संकेत मिळतो, ज्यामुळे ऊतींना कमी संख्येत उर्जा उपलब्ध होते.या घटनेमुळे मेंदूला असे वाटते की शरीराला कार्य करण्यासाठी पुरेसे उर्जा मिळत नाही, ज्यामुळे भूक लागते. सीआयएमचे वकिल अन्नाच्या स्वरूपाच्या प्रतिसादात हार्मोनल प्रतिसाद आणि चयापचय बदल समजून घेऊन लठ्ठपणाचे व्यवस्थापन करतात आणि CIM हे केवळ कॅलरीचे प्रमाण नाही तर अन्नाचे स्वरुप लक्षात घेऊन प्रतिसादात हार्मोनल आणि चयापचय बदल समजून घेऊन लठ्ठपणाचे व्यवस्थापन करते. तेच EBM मॉडेल हे विविध खाद्यपदार्थांच्या रचनात्मक फरकाची नोंदणी करण्यात अयशस्वी ठरते आणि केवळ त्यांच्या कॅलरी मूल्यांवर लक्ष केंद्रित करते.
बायोलॉजिकल दृष्टिकोनानुसार, वजन कमी करण्यासाठी कॅलरीज कमी कमरता होणे गरजेचे आहे. अन्नामधूम मिळणारा जास्त कॅलरीज एकतर मसलस्मध्ये साचते किवा चरबीच्या स्वरुपात शरीरात मोठ्या प्रमाणावर मेद कसे साठते. अतिरिक्त कॅलरीजचे सतत सेवन केल्यामुळे आणि त्यांचे सेवन न केल्याने वजन वाढते, मग तो जगातील सर्वात आरोग्यदायी पदार्थ असला तरीही कॅलरी सेवन (Calories ‘in’) - खाद्यपदार्थांद्वारे कॅलरी घेणे हे आपल्या माहित आहे पण कॅलरीज ‘आउट’ म्हणजे विश्रांतीच्या वेळी शरीराच्या मूलभूत चयापचय, शारीरिक क्रियाकलाप आणि अन्नाचा थर्मल इफेक्ट (TEF) किंवा आहार-प्रेरित थर्मोजेनेसिससाठी आवश्यक ऊर्जा म्हणून परिभाषित केलेल्या रेस्टींग एनर्जी एक्सपेंडिचर(REE) संयोजन करणे आहे.
अभ्यासामध्ये सातत्याने नोंदवले आहे की मुळे स्त्रोताकडे दुर्लक्ष करून कॅलरीची घट झाल्यास वजन कमी होते. 2017 च्या सर्वसमावेशक पुनरैवलोकनात, स्कॉट हॉवेल आणि रिचर्ड कोन्स यांनी अत्यंत काटेकोरपणे केलेल्या दोन चयापचय वॉर्ड अभ्यासातून स्पष्ट केले आणि निष्कर्ष काढला की, हे दोन्ही अभ्यास CIM गृहीतकांना समर्थन देण्यात अयशस्वी ठरले, ज्याने भाकीत केले की, आहारातील कर्बोदक (CHO) कमी केल्याने इन्सुलिनची पातळी लक्षणीयरीत्या कमी होते, ज्यामुळे चरबी वाढते. शरीरात मोठ्या प्रमाणावर साचलेले मेद कमी झाल्यास चरबी जलद कमी होते.
एंडोक्राइन सोसायटी सायंटिफिक स्टेटमेंटनुसार असा युक्तिवाद करण्यात आला की, एनर्जी एक्सपेडिंचरमध्ये किंवा अंतर्गत चयापचय वातावरण बदल करण्याऐवजी कॅलरी सेवन करणे मोठ्या प्रमाणात जबाबदार असून डाएटमुळे परिणामी लठ्ठपणाचा धोका वाढतो. 2021 च्या पुनरावलोकनात, यवेस शुट्झ आणि सहकाऱ्यांनी नमूद केले की, कमी-कार्बोहायड्रेट, किटोन-डाएट हे व्यावहारिकपेक्षा अधिक 'शैक्षणिक' आहेत, कारण हे आहार पौष्टिकदृष्ट्या असंतुलित आहेत आणि दीर्घकाळासाठी गंभीर आरोग्य धोके निर्माण करतात.
वजन कमी करण्यासाठी EBM महत्त्वाचे आहे. तथापि, सर्व कॅलरींचा हार्मोन्स आणि चयापचयवर एकसारखा प्रभाव पडत नाही. उदाहरणार्थ, दोन साध्या शर्करा, ग्लुकोज आणि फ्रक्टोज, प्रति ग्रॅम समान प्रमाणात कॅलरीज देतात परंतु दोन वेगवेगळ्या मार्गांनी चयापचय होतात. हाय फ्रक्टोजयुक्त आहारामुळे इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता वाढते आणि ट्रायग्लिसराइडची पातळी वाढते. तृप्ति, भूक आणि परिपूर्णता देखील पोषक तत्वांच्या प्रकारावर अवलंबून असते. साध्या कार्बोहायड्रेट्सपेक्षा प्रथिने आणि फायबर जास्त आढळतात. ‘कॅलरी इन-कॅलरी आउट’ सिद्धांत पोषक घनता लक्षात घेण्यात अयशस्वी ठरतो आणि त्यामुळे एकूणच चांगल्या आरोग्याला चालना देण्यासाठी त्यात विश्वासार्हतेचा अभाव दिसतो.
चांगले पोषण मुल्य हे वजन कमी करणे आणि कोणत्या थेअरीपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. वैविध्यपूर्ण डाएट मध्ये भरपूर न्युट्रीएशन, व्हिटमिन्स, मिनरिल्स आणि अॅन्टऑक्सडिटेंडचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. लठ्ठपणा आणि वजन कमी करण्यासाठी थेरापीटिक अॅप्रोच मांडणाऱ्या कित्येक थेअरी आणि मॉडेल असतील, पण उपलब्ध आहार, आहाराची निवड, अयोग्य आहार, मेडिकल आणि सायकोलॉजिकल परिस्थितीचे परिक्षण आणि शाश्वत पध्दती हे घटक आहे जे डाएट प्लॅन करताना महत्त्वाचे ठरतात. लो कॅार्ब डाएट हे वजन कमी करण्यासाठी किंवा रक्तातील साखरेचे प्रमाण निंयत्रित करण्यासाठी चांहवी न्यट्रीशन थेरपी निर्माण करते. पण या प्रकारच्या डाएटचे अल्ट्रो लो फॉर्म मिक्स रिझल्ट देतात तसेच ते पटकन वजन कमी करण्यासाठी कार्यरत असातात आणि त्यासाठी कठोर परिक्षण आणि नेहमी वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवणे गरजेचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.