health-fitness-wellness

नियमितपणे गूळ खा अन् मिळवा रोगांपासून सुटका

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : पूर्वी घरी आलेल्या पाहुण्यांना गूळपाणी देण्याची पद्धत होती. पूर्वी म्हणजे हे चहाचे प्रस्थ माजण्यापूर्वी. आता तर काय आल्या गेल्यालाच नव्हे तर घरातल्यालांनाही सकाळी उठल्याबरोबर व घडोघडी चहा लागतो. प्राचीन काळात साखरेऐवजी गुळाचा वापर जास्त केला जायचा. कारण, गूळ हा साखरेपेक्षा स्वस्त आणि फायदेशीर आहे. यासोबत जेवणातही गोडी आणण्यासाठी अनेक घरांमध्ये गुळाचा वापर केला जातो. चला तर गुळाचे फायदे जाणून घ्या.

प्राचीन काळापासून आयुर्वेदिक औषध म्हणून गुळाचा वापर होत आहे. काही लोक जेवणानंतर गूळ खातात. अस केल्याने पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. थंडीच्या दिवसांत गूळ खाणे गरजेचे आहे. कारण, गुळामुळे थंडीपासून संरक्षण होते. गुळामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते. परंतु, आपण त्याला दूर केले आहे. चहाचे आणि खास करून साखरेचे इतके तोटे सांगितले जातात. तरीही साखरेचा मोह काही सुटत नाही.

आहारात फार प्राचीन काळापासून गुळाचा वापर केला जातो. लाडू, पुरणपोळी असे विविध गोड पदार्थ हे पूर्वी गुळापासूनच बनवले जायचे. मुख्यतः सणावारांनाच त्यांचा आहारात समावेश असायचा. आता आहारातील गुळाची जागा हळूहळू साखरेने घेतली. त्यामुळे शरीराला गुळापासून मिळणारी पोषणतत्त्वे मिळेनाशी झाली आहे.

साखर आहारातून कमी करण्याचा सल्ला अनेकांना मिळतो. अशावेळी गुळाचा वापर करणे कधीही चांगले. गूळ खाल्याने गोडी येण्याबरोबर बऱ्याच रोगांपासून मुक्तीदेखील मिळते. यामुळेच गूळ खाण्याचा सल्ला देत असतात. नियमितपणे गूळ खाल्ल्याने मासिक पाळी, गुडघे दुखणे आणि दमा आदींपासून आराम मिळतो. खूप थकल्यावर पाण्याबरोबर गुळाचा एक खडा सेवन करा तुम्हाला नक्की आराम मिळेल.

गूळ खाण्याचे फायदे

  • ॲनिमियावर फायदेशीर

  • पचनक्रिया मजबूत राहते

  • रोग प्रतिकारक शक्ती वाढते

  • त्वचा उजळते

  • सांधेदुखीपासून आराम मिळतो

  • मधुमेहावर गुणकारी

  • रक्ताचे शुद्धीकरण करते

  • पोटाचे त्रास कमी करतो

  • गुडघ्यांचा त्रास कमी होतो

  • मासिक पाळीच्या वेदना कमी होतात

  • घसा खवखवत असल्यास गुळाचा खडा खाल्ल्याने आराम मिळतो

  • गूळ-शेंगदाणे खाल्ल्याने हिमोग्लोबिन लवकर वाढते

  • शारीरिक अशक्तपणा आल्यानंतर गूळ खाल्ल्यास जास्त फायदा होतो

  • शरीरातील धातूंची झीज भरून काढण्याचे महत्त्वाचे कार्य गूळ करतो

  • रोजच्या आहारात गुळाचा समावेश केल्यास चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर होते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: 'ईडीपासून मुक्ती मिळावी, यासाठी भाजपसोबत गेलो' भुजबळांचा खुलासा; राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात दावा

निवडणुकीत मोलाची कामगिरी; Donald Trump यांचं 'त्या' महिलेला मोठं बक्षीस, White House Chief of Staff म्हणून नियुक्ती

Gold Price Today: सोने 2000 रुपयांनी झाले स्वस्त; भावात मोठी घसरण का झाली?

Latest Maharashtra News Updates : नाशिकमध्ये आज पंतप्रधान मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी तब्बल 1 लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन

आज Narendra Modi यांचा महाराष्ट्र दौरा, 'या' दोन जिल्ह्यात तोफ धडाडणार, जाहीर सभांचं आयोजन

SCROLL FOR NEXT