health-fitness-wellness

लहान मुलांची उचकी घालवायची? तर करा या सोप्या पद्धतींचा वापर

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : उचकी येणे (hiccough) ही सामान्य गोष्ट आहे, ती कधीही येऊ शकते. तसेही उचकी येण्याची अनेक कारण आहेत. उचकी थांबण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. पाणी पितो किंवा इतर उपाय करून पाहतो. मात्र, लगोपाठ उचकी येणे हा एक प्रकारचा आजार आहे. सामान्य उपायांनंतरही उचकी थांबली नाही तर डॉक्टरांचा सल्ला (Doctor's advice) घेणे उपयोगी ठरते. लहान मुलांनाही याचा त्रास होतो. मात्र, त्यांना हा त्रास कशामुळे होतो हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. (know-about-home-remedies-for-child-hiccups)

भारतीय समाजात अशी मान्यता आहे की जेव्हा उचकी येते तेव्हा कोणता तरी प्रिय व्यक्ती आपली आठवण करीत आहे. आणखी एक मान्यता अशी आहे की लहान मुलाला उचकी आली म्हणजे मुलाला गॅस किंवा अपचन झाले आहे. अशा परिस्थितीत मुलाला अधिक त्रास होतो. कधीकधी ही एक मोठी समस्या देखील बनते.

उचकी लागण्याचे ठोस कारण सांगता येत नाही. परंतु, ती सुरू होणे किंवा बंद होणे हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते. डायफ्रामची मसल्स अचानक आकुंचन पावल्याने उचकी सारखी स्थिती निर्माण होते. अशात अनेक घरगुती उपायातून उचकी थांबता येते. ते कसे हे आपण आज पाहणार आहो...

ग्राइप वॉटरचा करा वापर

ग्राइप वॉटरच्या मदतीने तुम्ही लहान मुलांची उचकी घालवू शकता. ग्राइप वॉटरमध्ये बडीशेप, लिंबू आणि आले सारख्या बऱ्याच औषधी वनस्पतींचे मिश्रण आहे. जे सहजपणे उचकीवर मात करू शकते. याचा उपयोग केल्यास पोटात असणारी हवा सहज बाहेर काढता येते. अर्धा कप पाण्यात एक चमचा ग्राइप वॉटर टाकून मुलाला द्या.

मधाचा करा वापर

आयुर्वेदात अनेक वर्षांपासून मधाचा वापर केला जात आहे. त्याच्या वापरामुळे बऱ्याच गंभीर आजारांवर मात करता येते. मध वापरल्याने लहान मुलांची उचकी सहज बंद करता येते. यासाठी एक ते दोन चमचे मध कोमट पाण्यात मिसळून मुलाला पिण्यास द्या. यामुळे मुलाची पाचन प्रणाली देखील चांगली राहील.

साखर द्या खायला

साखरेच्या मदतीनेही उचकी दूर करू शकतो. कोमट पाण्यात साखर चांगली मिसळून चम्मच चम्मच मुलाला पाजा. किंवा अर्धा चम्मच साखर खाऊ घाला. यामुळे मुलाची उचकीची समस्या सहज कमी होईल. कारण, साखर स्नायूंना आराम देण्याचे काम करते.

खेळभांडूल्याचा करा वापर

लहान मुलांची उचकी घालवायची असेल तर तुम्ही खेळभांडूल्याचाही वापर करू शकता. यासाठी तुम्हाला मुलाचे लक्ष खेळण्यावर केंद्रित करावे लागले. मुलांचे लक्ष विचलित केले तरी उचकी मात केली जाऊ शकते.

संकलन व संपादन - नीलेश डाखोरे

(know-about-home-remedies-for-child-hiccups)

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: जिल्हा परिषद भरतीमध्ये घोळ? 19 नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे कोर्टाचे आदेश

इलेक्शन ड्युटी नाकारणाऱ्या ८७२ कर्मचाऱ्यांना नोटिसा! प्रशिक्षणालाही दांडी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काढली यादी; आता दाखल होणार गुन्हे अन्‌ शिस्तभंगाची कारवाई

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

Mumbai School : मुंबईत शाळा-महाविद्यालयांना तीन दिवस सुट्टी, काय आहे कारण? घ्या जाणून!

Sakal Podcast: जोगेश्वरी-गोरेगाव दरम्यान १२ तासांचा ब्लॉक ते विम्याचे पैसे लाटण्यासाठी युवक बनले अस्वल

SCROLL FOR NEXT