fracture e sakal
health-fitness-wellness

काय आहे पॅथॉलॉजीक फ्रॅक्चर? वाचा कारण, लक्षणं अन् उपाय

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : कुठल्याही आजारामुळे हाड तुटणे याला पॅथॉलॉजीक फ्रॅक्चर (what is pathologic fracture) म्हणतात, तर अपघातामुळे झालेल्या फ्रॅक्चरला सामान्य फ्रॅक्चर म्हणतात. ज्यांची हाडे कमकुवत असतील त्यांना देखील पॅथॉलॉजीक फ्रॅक्चर होऊ शकतो. या आजारानं त्रस्त असलेल्या व्यक्तींना दररोज चालणे, वाकणे आदी काम करण्यास त्रास जातो. जास्त जड कामे केल्यास त्यांचे हाड देखील मोडू शकते. (know about pathologic fracture symptoms causes treatment in marathi)

पॅथोलॉजिक फ्रॅक्चरची लक्षणे -

सामान्य फ्रॅक्चर आणि पॅथोलॉजिकल फ्रॅक्चर या दोन्हीमध्ये तसा जास्त फरक नाही. मात्र, काही लक्षणं वेगळी जाणवतात, ते ओळखणे देखील कठीण आहे.

  • तुटलेल्या हाडात तीव्र वेदना होणे

  • तुटलेल्या हाडांच्या सभोवती सूज येणे

  • तुटलेल्या हाडाभोवतीचा भाग सुन्न होणे

पॅथॉलॉजीक फ्रॅक्चर का होतो?

ऑस्टियोपोरोसिस हा हाडांचा आजार असून हा आजारा ज्या व्यक्तीला असेल त्यांना पॅथॉलॉजीक फ्रॅक्चरचा धोका असतो. तसेच कर्करोगाने ग्रस्त असणाऱ्या व्यक्तींना देखील पॅथॉलॉजीक फ्रॅक्चर होऊ शकतो. कर्करोगाच्या अनेक रुग्णांमध्ये हाडे कमजोर होत असतात.

पॅथोलॉजिक फ्रॅक्चर कसे ओळखले जाते? -

पॅथोलॉजिकल फ्रॅक्चर शोधण्यासाठी डॉक्टर एक्स-रे, एमआरआय, सीटी-स्कॅन, न्यूक्लियर बोनचे स्कॅनिंग करतात. हाड कशामुळे तुटले हे तुम्हाला माहिती नसल्यास डॉक्टर कॅल्शियम चाचणी, रक्त तपासणी, ट्युमर किंवा संसर्ग शोधण्यासाठी बायोप्सी करू शकतात.

उपचार -

पॅथोलॉजिक फ्रॅक्चरचा उपचार हा व्यक्तीनुसार बदलू शकतो. असे बरेच आजार आहेत ज्यात हाडांचा विकार बरा होत नाही. अशावेळी डॉक्टर हाडात रॉड किंवा स्टंट घालतात. काही प्रकरणांमध्ये, डॉक्टर आपल्याला विश्रांती घेण्याचा सल्ला देतात आणि भारी काम करण्यास नकार देतात. जेणेकरून आपल्या तुटलेल्या हाडांना ताण येऊ नये. बरे होण्यासाठी काही आठवडे किंवा काही महिने लागू शकतात, काही लोकांमध्ये हा आजार बरा होत नाही. जर एखाद्या आजारामुळे फ्रॅक्चर असेल तर हाडे बरे करणे कठीण काम आहे. अशा परिस्थितीत आपल्याला शस्त्रक्रिया करावी लागू शकते.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : 'हे इथे चालणार नाही..' अजित पवार कडाडले, योगींना दिलं रोखठोक प्रत्युत्तर

Latest Maharashtra News Updates : फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट सर्वात जास्त महाराष्ट्र मध्ये झाली - नरेंद्र मोदी

सुरज चव्हाण नेमकं कुणाच्या सांगण्याप्रमाणे वागतोय? अंकिताच्या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनाही पडला प्रश्न, म्हणाले- त्याच्या आजूबाजूला

Beed Assembly Election 2024 : ‘आरक्षणाची लढाई लढले नाही, तर विनायकरावांचे नाव लावणार नाही’

CM Eknath Shinde: ''एक हैं तो सेफ हैं! पंतप्रधानांच्या वाक्याचा चुकीचा अर्थ घेतला'' मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला अर्थामागचा अर्थ

SCROLL FOR NEXT