Lassa fever Sakal Digital
health-fitness-wellness

Lassa Fever कसा ओळखायचा? जाणून घ्या काय आहेत लक्षणं

कोरोनानंतर लोकांच्या मनात आजारांविषयी भिती निर्माण झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

आता नव्या विषाणूने (Virus) चिंता वाढवली आहे.उत्तर नायजेरियामध्ये 1969 मध्ये येऊन गेलेला लासा फिव्हर १३ वर्षानंतर पुन्हा आला आहे. त्या देशात आतापर्यंत तीन रूग्ण मिळाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. हा विषाणू इबोलाच्याच कुटुंबातील आहे. उत्तर नायजेरियातील लासा शहराच्या नावावरून त्याला नाव देण्यात आले आहे. नवीन रोगाविषयी माहिती कळल्यावर, तो पसरू लगाल्यावर लोकांमध्ये भीती निर्माण होऊ शकते. कोरोनानंतर (Corona) लोकांच्या मनात अशा आजारांविषयी बऱ्यापैकी भिती निर्माण झाली आहे. कोरोना लोकांच्या संपर्कात आल्यावर पसरू शकतो. पण लासा हा मिठी मारणे किंवा एकमेकांच्या दैनंदिन संपर्कातून पसरत नाही. उदरांची लघवी- विष्ठेमुळे किंवा त्यांनी दुषित केलेल्या खाद्यपदार्थांच्या संपर्कामुळे लासाची लागण होण्याची शक्यता वाढते. मात्र, भारतात या रोगाची लक्षणे असलेले रूग्ण अद्याप आढळलेले नाहीत. (Lassa Virus)

अशी आहेत लक्षणे (Symptoms of Lassa fever)

मसिना हॉस्पिटलचे सल्लागार डॉ. मनीष वाधवानी यांनी याविषयी हिंदुस्तान टाईम्सला माहिती दिली आहे. ते म्हणाल, लासा तापामध्ये क्लिनिकल लक्षणे असतात. एक ते तीन आठवड्यांदरम्यान त्याची ठळक लक्षणे दिसायला लागतात. बहुतेक संक्रमित लोकांना (८० टक्के) कमी प्रमाणात थकवा, अशक्तपणा, डोकेदुखी अशी मध्यम लक्षणे जाणवतात. अशावेळी ते वैद्यकीय मदत घेत नाहीत. पण २० टक्के लोकांना रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. याशिवाय गंभीर लक्षणांमध्ये चेहऱ्यावर सूज येणे, कंबर, छाती, पोटात दुखायला लागते. श्वसनक्रिया बंद पडते, फिट होणे, बेशुद्ध होणे, रक्तस्त्राव (तोंड, नाक, योनीमार्ग किंवा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टमधून) आणि ब्लड प्रेशरमध्ये कमी होते. तसेच महत्वाचे अवयव निकामी होतात, असेही वाधवानी यांनी सांगितले. या आजारामुळे कायमस्वरूपी बहिरेपण येऊ शकतं.आतापर्यंत जवळपास एक तृतीयांश लोकांना बहिरेपणा आलेला आहे.(Lassa Virus)

लासावरील उपचार (Lassa fever treatment)

लासा तापावर Ribavirin हे औषध वापरले जाते. ताप सुरू झाल्यावर पहिल्या सहा दिवसात हे औषध घेतल्यास प्रभाव पजतो. रिबाविरिन व्यतिरिक्त रक्तदाब आणि ऑक्सिजन पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक काळजी घेणे गरजेचे असते. त्यासाठी डॉक्टरांनी सुचविलेले द्रव पदार्थ (appropriate fluids) घेणे गरजेचे आहे.(Lassa Virus)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: हा ऐतिहासिक विजय, जनतेचे आभार- शिंदे

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT