health-fitness-wellness

हसण्यासाठी जगा : अपयशाचं ‘खापर’, यशाची ‘भाकर’!

हातातल्या तराजूप्रमाणे मनात तराजू घेऊन काही लोकं कायम जगतात. कोणत्याही गोष्टीला यश आणि अपयश या पारड्यात टाकतात.

मकरंद टिल्लू

हातातल्या तराजूप्रमाणे मनात  तराजू घेऊन काही लोकं कायम  जगतात.  कोणत्याही गोष्टीला यश आणि अपयश या पारड्यात टाकतात. यशस्वी झाले असतील, तर त्यांच्यात उत्साह संचारतो. पण अपयश आले असेल तर खांदे पडतात. अपयश सहजतेने स्वीकारता आलं तर माणूस पुन्हा प्रयत्न करतो.  मात्र, ते स्वीकारता आलं नाही तर नैराश्याच्या गर्तेत जातो. अपयशाला तुम्ही कोणत्या नजरेतून बघता त्यावरून जगणं ठरत.

  • लहान मुलांचे चिमुरडे हात मोठ्या माणसांची  बोटं पकडतात. ‘चाली चाली’ करूया असं म्हणत पहिली पावलं पडतात.  वारंवार केल्यावर लहान मुलाचं मन प्रेरणा घेतं. एक दिवस लहान मूल थरथरत उभं राहतं. पहिलं पाऊल टाकतं.  एक-दोन पावले चालल्यावर बद्कन पडतं, पण स्वतःहून उभं राहण्याचा अनुभव पडण्यापेक्षा श्रेष्ठ होतो. ते मूल पडण्याचं दुःख वाटून घेत नाही. अपयशी झालो अशी भावना मनात निर्माण करत नाही, तर उभं राहण्याच्या अनुभवाकडं जास्त लक्ष देतं. ते पुन्हा प्रयत्न करतं. म्हणून चालू शकतं.

  • शाळा कॉलेजमधली मुलं सहजतेनं एकमेकांना चिडवतात.  अनेक मुलं चिडवणं कमी होण्यासाठी अधिक कष्ट घेत, त्या विषयात पारंगत होतात.  बोलताना अडखळणारी मुलं मोठेपणी वक्ते होतात.  ‘कागदावर सारख्या का रेघोट्या मारतोस?’ असं म्हणून चिडवलेली मुलं मोठेपणी चित्रकार होतात.  ‘बदकासारखं काय पळतोस,’ असं हिणवलेली मुलं त्यावर मात करून मोठेपणी  राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरचे धावपटू होतात. कारण ते अपयशावर पाय ठेवून उसळी मारण्याचा विचार करतात. फुटबॉल, बास्केटबॉल खेळताना हवा गेलेल्या बॉलऐवजी हवा असलेला उसळी मारणारा बॉल वापरतात. स्वतःमध्ये उसळी मारण्याची क्षमता निर्माण करा!

  • कलाकारांपासून व्यावसायिकांपर्यंत विविध क्षेत्रातले मान्यवर, सत्कार समारंभात आयुष्यातल्या एका तरी अपयशाबद्दल बोलतात. ‘ठोकळ्या’सारखा अभिनय करता,’ असं म्हणून हिणवलेला अभिनेता किंवा अभिनेत्री त्यावर मात करून पुढं अनेक मानसन्मान मिळवतात. कारण ते त्यांच्यावरील टीकेला सकारात्मकपणे घेऊन स्वतःमध्ये बदल करतात. स्वत:वरील टीकेला खुल्या मनानं स्वीकारलं, तर यशाचा मार्ग सुकर होतो.

  • कोणी मिळालेल्या अपयशाबद्दल बोललं, की अपयशी व्यक्तीला त्याचा त्रास होतो. या त्रासावर मात करायची असेल, तर त्यानं स्वत:च्या अपयशाबद्दल स्वत:च बोलावं. स्वत:वर विनोद करावा.  असं केलं तर मानसिक त्रास कमी होतो. 

  • लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं चुका करू नका.  या ऐवजी ‘चुका बिनधास्त करा, फक्त तीच चूक पुन्हा करू नका,’ हे शिकवणं जास्त महत्त्वाचं आहे. ‘अपयशातून कोणता नवा अनुभव मिळाला,’ हे शिकता आलं तर ‘एडिसन’ होता येतं.

  • जगताना दोन पावलं पुढं जाण्याची उमेद प्रत्येकाला असते.  अपयशामुळं माणूस चार पावलं मागे येतो.  अशावेळी खचून जाण्याऐवजी विचार करा ‘आयुष्याच्या धनुष्यावर बाणाप्रमाणं असणारे तुम्ही चार पावलं मागं खेचले गेले आहात, पण लक्षात ठेवा प्रत्यंचा जेवढा मागं खेचला जातो, तेवढाच बाण पुढं जातो.’

    अपयशाच्या ‘ खापरा’वरच, यशाची ‘भाकर’ भाजली जाते!  अपयश योग्यप्रकारे हाताळता आलं, उसळी मारता आल्यास सगळी स्वप्नं नक्की ‘साकार’ होतात!!!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market: शेअर बाजार तुफान वाढणार; महाराष्ट्रात भाजपच्या विजयाचा होणार परिणाम, एक्स्पर्टने सांगितलं कारण

Latest Maharashtra News Updates : हेमंत रासने यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

IPL 2025 Mega Auction Highlights: मुंबई इंडियन्सपासून ते CSK पर्यंत, जाणून घ्या कोणत्या संघात कोणते खेळाडू

Maharasthra Vidansaha Election: ईव्हीएम गडबड नाही, निवडणुक आयोगाने फेटाळला आरोप

IND vs AUS 1st Test: अरे, आधी अम्पायरकडे बघ! Mohammed Siraj सेलिब्रेशन करत पळत सुटला, मग पुढे जे घडलं ते...; ड्रेसिंग रुममध्ये रोहितही दिसला

SCROLL FOR NEXT